Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Demat account: 2023 वर्ष सुरु झाल्यापासून, डिमॅट अकाऊंट उघडण्याचे प्रमाण घटले, कारण?

Reduction in demat account openings

Reduction in Demat account openings: 2022 वर्षात डिमॅट अकाऊंट उघडून गुंतवणूक करण्यात 2021 वर्षाच्या तुलनेत 27.5 टक्के घट झाली होती. तर, 2023 वर्ष सुरु झाल्यापासून केवळ 0.3 टक्के व्यक्तींना खाते सुरू केले आहे. या वर्षातही नवीन खाते उघडण्यात घट दिसू शकते का? संपूर्ण तपशील पुढे वाचा.

What are the reasons for decrease in demat account opening rate?:  2022 हे वर्ष शेअर बाजार आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चांगल्या गतीने भरलेले होते. या कालावधीत 2.8 कोटी डिमॅट खाती उघडण्यात आली. ज्यामुळे, एकूण सक्रिय डिमॅट खात्यांची संख्या 10.3 कोटींवर पोहोचली, तर एकूण खात्यांची संख्या 10.83 कोटी होती. मात्र ही संख्या 2021 च्या तुलनेत 27.5 टक्क्यांनी घटली आहे. तर 2023 वर्ष सुरू झाल्यावर डिमॅट खात्यांच्या संख्येत नगण्य अशी 0.3 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी 2020 मध्ये डिमॅट खाती उघडण्याच्या संख्येत 26.7 टक्क्यांची वाढ झाली. 2021 मध्ये हा विकास दर 61.8 टक्के होता. या वर्षात साधारण नवीन 3 कोटी खाती उघडण्यात आली होती. तर, नुकत्याच सरलेल्या 2022 वर्षात खाते उघडण्याच्या विकास दरात 27.5 टक्क्यांची घट होत, 34.3 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. येत्या 2023 वर्षात आणखी घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. शेअर बाजारातील उच्च अस्थिरता, कमी परताव्याचा दर, स्मॉल कॅप समभागांमध्ये तीव्र घसरण यामुळे लहान गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला आहे, यामुळे नवे गुंतवणूकदार काही अंशी शेअर बाजाराकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे, असे शेअर बाजार तज्ज्ञ विवेक नाडकर्णी यांनी महामनीला सांगितले.

खात्यांच्या संख्येत वाढ होण्याचे कारण (Reason for increase in accounts)

कोरोनानंतर डीमॅट खात्यांची संख्या दुप्पट झाली आहे. पर्यायी उत्पन्नासाठी लोकांनी शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली. कोरोनापूर्वी देशात फक्त 4.9 कोटी डिमॅट खाती होती. परंतु 2020 च्या सुरुवातीपासून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत, भारतीय शेअर बाजाराने जगभरातील शेअर बाजारांच्या तुलनेत चमकदार कामगिरी केली. या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये डिमॅट खात्यांची संख्या 7.4 कोटी होती, जी यावर्षी 10.83 कोटी झाली आहे. म्हणजेच नवीन खाती जोडण्याचा वेग कमी होत असला तरी एकूण खात्यांची संख्या सतत वाढत आहे. याबाबत नाडकर्णींचे म्हणणे आहे की, स्मार्ट फोन, शेअर बाजारांशी डिजिटल पद्धतीने लोकांची सहज कनेक्टिव्हिटी आणि बाजाराचा चांगला परतावा ही या वेगवान वाढीची प्रमुख कारणे आहेत.

खाते उघडण्याचा वेग मंदावण्याचे कारण? (Reason for the low propensity to open an account?)

नाडकर्णींच्या मते, 2021 च्या तुलनेत यावर्षी बाजारात येणार्‍या आयपीओची संख्या देखील कमी आहे. याशिवाय, रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे जानेवारीपासून नवीन खात्यांची संख्या कमी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये नवीन खात्यांच्या संख्येत कमी वाढ होण्याचे एक कारण म्हणजे सप्टेंबरमध्ये 22 दिवसांच्या तुलनेत या कालावधीत उत्सवाने केवळ 18 कामकाजाचे दिवस दिले. मात्र, सध्या शेअर बाजारात लोकांना सामील होण्यासाठी भरपूर वाव आहे आणि मार्केटच्या बळावर डिमॅट खाती उघडण्याचा वेगही परत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डीमॅट खाते काय आहे? (What is a demat account?)

शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते अनिवार्य आहे. यामध्ये तुमचे सर्व शेअर्स आणि सिक्युरिटीज डिजिटल स्वरूपात ठेवल्या जातात. जेव्हा तुम्ही एखादा व्यवहार खरेदी करता किंवा विकता तेव्हा या डिमॅट खात्याद्वारे व्यवहार करणे शक्य होते आणि लिंक केलेल्या बँक खात्यात पैशांचे डिजिटल हस्तांतरण होते.