Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How Many Types of Demat Accounts: डिमॅट खात्याच्या विविध प्रकाराविषयी जाणून घ्या

How Many Types of Demat Accounts

Demat Accounts Types: डिमॅट खाते म्हणजे शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन पैसे गुंतवण्याचे खाते होय. प्रत्यक्षात हे खाते बॅंकेसारखेच काम करते. फरक एवढाच असतो की, हे खाते ऑनलाईन असते. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून हे खाते चालवू शकतात. या खात्याचे साधारण किती प्रकार आहेत, याबाबत जाणून घेवुयात.

Demat Accounts Types: डिमॅट खाते हा शब्द शेअर्स मार्केटशी संबंधित आहे.  ज्याप्रमाणे बॅंकेत पैसे ठेवले जातात, त्याचप्रमाणे या खात्यात ऑनलाईन शेअर्स ठेवले जातात. खात्याच्या मदतीने कोणत्याही स्टॉकचे शेअर्स तुम्ही ऑनलाईन पध्दतीने खरेदी-विक्री करू शकता. तसेच विकत घेतलेले शेअर्स हे डिमॅट खात्यात पाहतादेखील येतात. त्याचबरोबर त्या शेअर्सची विक्री केल्यावर ते डिमॅट खात्यातून हटविलेदेखील जातात. यापूर्वी ही प्रक्रिया करण्यात खूप वेळ जायचा, आता ही प्रक्रिया करणे एकदम सोपी झाली आहे. विशेष म्हणजे या खात्याचा आणखी एक फायदेदेखील आहे, या खात्यामुळे शेअर्सची कागदपत्रे सांभाळून ठेवण्याची गरज भासत नाही. ही सर्व प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे, तुम्ही हा सर्व शेअर्सचा व्यवहार घरबसल्या मोबाईल व इंटरनेटव्दारे करू शकता. या खात्याव्दारे फसवणूकीची शक्यता नसते. कारण येथे बनावट व बोगस शेअर प्रमाणपत्रांचा सामना करावा लागत नाही. या खात्यात सर्व शेअर्सचे रेकार्ड अधिकृत असतात. हे खाते प्रत्यक्षात बॅंक खात्याप्रमाणेच काम करते, याचे प्रत्यक्षात किती प्रकार आहेत, हे सविस्तर जाणून घेवुयात.

रेग्युलर डिमॅट खाते (Regular Demat Account)

रेग्युलर डिमॅट खाते हे फक्त भारतीय नागरिकांसाठी लागू आहे. ज्या भारतीय नागरिकांना गुंतवणूक करायची आहे, ते डिमॅट खात्याचा उपयोग करू शकतात.

प्रत्यावर्ती डिमॅट खाते (Repatriable Demat Account) 

प्रत्यावर्ती डिमॅट खाते हे अनिवासी भारतीय नागरिकांसाठी आहे. या खात्याव्दारे पैशांची रक्कम परदेशात हस्तांतरित करता येते. यासाठी हे खाते सक्षम असते. हे खाते NRI Bank Account च्या खात्याशी जोडणे अनिवार्य आहे.

नॉन प्रत्यावर्ती डिमॅट खाते (Non-Repatriable Demat Account)

Non-Repatriable Demat Account हे खाते सुद्धा अनिवासी भारतीयांसाठीच लागू आहे. मात्र या प्रकारच्या डिमॅट खात्याव्दारे परदेशात निधी हस्तांतरण करता येत नाही. या प्रकारातील डिमॅट खाते हे NRO Bank Account शी जोडणे अनिवार्य आहे.