Shares of Zomato are falling: फूड डिलिव्हरी कंपनी झोमाटोच्या (Zomato) स्टॉकमध्ये सतत घसरण होत आहे. गेल्या सहा दिवसांपासून कंपनीचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. झोमाटोच्या शेअर्समध्ये मंगळवारी, 17 जानेवारी रोजी मोठी घसरण झाली होती. बीएसईवर (BSE: Bomaby Stock Exchange) शेअर 4.93 टक्क्यांनी घसरून 50.15 रुपयांवर बंद झाला. गेल्या 6 दिवसात झोमाटोचे शेअर 10.45 टक्क्यांनी घसरले आहेत.
काउंटरवरील उलाढाल 42 हजार 887 कोटी रुपयांच्या मार्केट कॅप, मिडियम-कॅपसह 40.14 कोटी रुपये होती. विश्लेषक विवेक नाडकर्णी यांनी सांगितले की तांत्रिक तक्ते हे दर्शवित आहेत की काउंटरवरील कमजोरी अद्याप संपलेली नाही. म्हणजेच समभागातील (Shares) घसरण कायम राहू शकते.
सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये झोमाटो कंपनीला 22 टक्के, अर्थात 250.8 कोटींचा तोटा झाला होता. यानंतर, कंपनीचे सीईओ आणि को-फाऊंजर मोहित गुप्ता यांनी राजिनामा दिला. त्याच दरम्यान कंपनीतील प्रमुख कंपनी फाऊंडेशनच्या काळातील मुख्य पदांवर असलेल्या कर्मचाऱ्यांनीदेखील राजिनामे दिले. कंपनीला झालेला तोटा आणि राजिनाम्याचे सत्र यामुळे झोमाटोचे शेअर्स सातत्याने खालावत आहेत. या सर्व घटनाक्रमामुळे गुंतवणुकदारांचा कंपनीवरील विश्वास कमी होत आहे, यामुळे शेअर्समध्ये घट होत आहे.
शेअर बाजार तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? (Opinion of stock market experts)
एंजेल वनमधील विश्लेषकांनी आपल्या पोर्टलवरील ब्लॉगमध्ये, झोमॅटो डाउनट्रेंडमध्ये आहे, दैनंदिन चार्टवर त्याच्या सर्व प्रमुख सामान्य हालचाल सरासरींच्या (SMA: Simple Moving Average) खाली आहे, जे बाजारातील कमकुवतपणा दर्शविते. समभाग 56 रुपयांच्या पातळीच्या जवळ मजबूत प्रतिकार करत आहे.
दैनिक सापेक्ष शक्ती निर्देशांक (RSI: Relative Strength Index) आणि दैनिक मूव्हिंग अॅव्हरेज कन्व्हर्जन्स किंवा डायव्हर्जन्सवर (MACD: Moving Average Convergence/Divergence) आधारित, असे दिसते की डाउनट्रेंड अद्याप संपलेला नाही. तसेच झोमाटो त्याच्या 12-, 26- आणि 50- वर व्यापार करत आहे. हे डबल एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेजच्या (DEMA: Double Exponential Moving Average) खाली चांगले ट्रेड करत आहे, जे येत्या सत्रात उतरती कळा दर्शवते. एंजल वनवर असे नमूद केले आहे की, टॉप लॉस 39 रुपये ठेवून, पुढे 55 च्या टार्गेट प्राईजसाठी 45 ते 46 रुपयांच्या स्तरावर खरेदी करता येऊ शकते.