Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea : कमीत कमी खर्चात सुरू करू शकता नर्सरी व्यवसाय, झालेल्या खर्चाच्या दुप्पट होऊ शकते कमाई

Nursery business

Nursery business: कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने आता निसर्गाविषयी प्रेम आणि जागरूकता वाढली आहे. वृक्ष लागवडीकडेसुद्धा लोकांचा कल वाढायला लागला आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही नर्सरी व्यवसाय सुरू करू शकता.

Business Idea : कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने लोकांमध्ये निसर्गाविषयी प्रेम आणि जागरूकता वाढली आहे. वृक्ष लागवडीकडे सुद्धा लोकांचा कल वाढायला लागला आहे. काही झाडांची रोपं ही दुर्मीळ असतात तर, काही रोपे बीज प्रसाराने आपोआप तयार होतात. शेतातील अनेक झाडे ही अशीच वाढलेली आपल्याला दिसतात. पण, बाग तयार करायची असेल, एखाद्या गावात रस्त्याच्या कडेला झाडे लावायची असतील, कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तर विशिष्ट प्रकारच्या झाडाचे रोप लागते. जे रोप आपल्याला रोपवाटिका म्हणजेच नर्सरीमध्ये मिळते. मग यावरून तुम्हाला आयडिया सुचली का? वाढती रोपांची मागणी लक्षात घेता तुम्ही सुद्धा नर्सरी व्यवसाय सुरू करू शकता.

तुम्हाला नर्सरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर वनस्पती वाढवण्यासाठी, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. वनस्पतींचे प्रकार, कोणत्या औषधी वनस्पती आहेत, कोणत्या शोभेच्या आहेत, वास्तूनुसार वनस्पतींची माहिती सर्वात आधी जाणून घ्यावी लागेल. याबाबत असलेले क्लासेस किंवा सेमिनारसुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. त्याचबरोबर या व्यवसायाबद्दल माहिती घेणे सुद्धा महत्त्वाचे ठरते.

नर्सरी व्यवसाय सुरू करण्यासाठी काय महत्त्वाचे आहे? 

नर्सरी व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी सुपीक जमीन आवश्यक आहे. सुपीक जमिनीमध्ये रोप लवकर वाढते त्यामुळे फायदा होऊ शकतो. जागा फार मोठी नसेल तरी चालेल, किंवा तुम्ही शेतात सुद्धा हा प्रयोग करू शकता. जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही भाड्याने घेऊ शकता. महामार्गावरील जागा सरकार नर्सरीसाठी भाडेतत्त्वावर देतात.

narasara-vayavasayasatha-aavashayaka-bb.jpg

नर्सरीमध्ये लावलेल्या रोपांचे तीन भाग केले जातात. पहिली म्हणजे स्ट्रेच प्लांट नर्सरी, ज्यामध्ये सजावट म्हणून वापरल्या जाणार्‍या झाडांचा समावेश केला जातो. दुसरा प्रकार म्हणजे लॅण्डस्केप प्लांट नर्सरी, ज्यामध्ये बागकामासाठी अधिक चांगली झाडे समाविष्ट केली जातात. तिसरा प्रकार म्हणजे व्यावसायिक नर्सरी, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणार्‍या सर्व बियाणे किंवा वनस्पतींचा समावेश होतो. 

नर्सरी व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. कारण त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आधुनिक यंत्रांची गरज नाही. तसेच सुरुवातीला अधिक कामगारांची गरज भासणार नाही. बियाणे किंवा रोपं तयार करण्यासाठीच खर्च लागेल. तो तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर करता त्यावर अवलंबून आहे. सरकारकडून अनेक योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी अनुदान दिले जाते. फळबाग लागवड योजनेअंतर्गत सुद्धा नर्सरीसाठी अनुदान दिले जाते

प्रॉफिट किती मिळू शकते? 

नर्सरी व्यवसायातील कमाई खर्चाच्या दुप्पट होऊ शकते. अगदी लहान रोपाची किंमत 50 रुपयांपासून सुरू होते. रोपांचा आकार वाढवण्याचा खर्च 10 ते 15 रुपयांपर्यंत येतो. हा व्यवसाय तुमच्या मेहनतीवर आणि मागणीवर अवलंबून असतो. महामार्ग आणि नवीन कार्यालयांमध्ये झाडे लावण्यासाठी सरकारने अनेक प्रोजेक्ट हाती घेतले आहे. याबाबत तुम्ही माहिती जाणून घेतली तर चांगली कमाई करू शकता. सरकारी योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या ऑर्डरने या व्यवसायातून साधारणपणे 5 ते 10 हजार रुपयांची कमाई होऊ शकते. इतरही ऑर्डर मिळाल्यास दिवसाला 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत कमाई सहज होऊ शकते.