Mutual Fund: मुलीच्या जन्मापासूनच आपल्याला तिच्या भविष्याची काळजी वाटू लागते. तिचे लग्न आणि शिक्षण लक्षात घेऊन पालक खूप आधी बचत करू लागतात. साधारणपणे, बहुतेक पालक हे बचतीचे पैसे बँकेत जमा करतात किंवा त्यांची एफडी करून घेतात. मुलीच्या लग्नाबरोबरच तिच्या शिक्षणाचा प्रश्नदेखील तेवढाच महत्वाचा आहे. जर तुमच्या घरात मुलगी जन्माला आली आणि तुम्ही तिचे भविष्य सुरक्षित (Secure the future) करण्यासाठी चांगली योजना शोधत असाल. तर SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ या योजनेबद्दल माहित करून घ्या.
SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ (SBI Technology Opportunities Fund Direct Growth)
SBI च्या या म्युच्युअल फंड (Mutual funds) योजनेत गुंतवणूक करून तुम्ही बंपर परतावा मिळवू शकता. त्या योजनेचे नाव आहे SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ (SBI Technology Opportunities Fund Direct Growth). गेल्या तीन वर्षांत, SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेने 27.78 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेत दहा हजार रुपये गुंतवून 76.5 लाख रुपयांचा निधी जमा करायचा असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला SBI च्या या स्कीममध्ये संपूर्ण 18 वर्षे दरमहा 10 हजार रुपये गुंतवावे लागतील.
योजनेत गुंतवणूक (investment) करताना, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे 12 टक्के परतावा मिळू शकतो. दरवर्षी हा अंदाजित परतावा मिळत राहिला तर 18 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्ही 76.5 लाख रुपये जमा करू शकता. मॅच्युरिटीच्या वेळी मिळालेल्या या पैशातून तुम्ही तुमच्या मुलीला उज्ज्वल भविष्य देऊ शकाल. याशिवाय तुम्ही हे पैसे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी वापरू शकता. देशातील अनेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (Long term investment) म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय असू शकतो.