Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Xiaomi 13 Ultra Launch: 1 टक्का बॅटरीवर 1 तास चालतो शाओमीचा स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Xiaomi 13 Ultra Launch

Image Source : www.smartprix.com

Xiaomi 13 Ultra Launch: शाओमी कंपनीने मंगळवारी (18 एप्रिल 2023) 'Xiaomi 13 Ultra' हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला. हा फोन चीनसह इतर प्रदेशात लॉन्च करण्यात आला आहे. या निमित्ताने त्याचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

नामांकित स्मार्टफोन कंपनी शाओमीने मंगळवारी (दि. 18 एप्रिल) 'Xiaomi 13 Ultra' हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला. हा फोन चीनसह इतर प्रदेशात लॉन्च करण्यात आला आहे. Snapdragon 8 Gen 2 SoC आणि 2K 12-बिट डिस्प्लेसह या फोनमध्ये ग्राहकांना 50MP चे चार कॅमेरे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फोनमध्ये Hibernation मोड देण्यात आलाय. ज्यामुळे फोनचे चार्जिंग 1 टक्का उरल्यानंतर हा फोन 1 तास सहज वापरता येतो. चला तर, शाओमीच्या या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

Xiaomi 13 Ultra चे फीचर्स जाणून घ्या

या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना दोन सिमकार्ड वापरता येणार आहेत. या फोनचा डिस्प्ले हा 6.73-इंचाचा असून 2K AMOLED प्रकारातील आहे. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन (Dolby Vision), P3 कलर गॅमट आणि 2600nits पर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट ग्राहकांना मिळणार आहे.

Xiaomi 13 Ultra स्मार्टफोनच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलच्या चार कॅमेऱ्यासोबत सोनी सेन्सर लेन्स देण्यात आली आहे. यामुळे DSLR कॅमेऱ्यामधील सर्व सुविधा फोनमध्येच मिळणार आहेत. याशिवाय फ्रंट कॅमेरा हा 32 मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे.

या फोनची रॅम आणि स्टोरेज तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये देण्यात आले आहेत. 16 GB रॅम आणि 1TB स्टोरेज हा टॉप व्हेरियंट आहे. याशिवाय 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज, तसेच 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC प्रोसेसरवर काम करतो.

या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 5000mAh आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये Hibernation मोड देण्यात आलाय. त्यामुळे फोनचे चार्जिंग 1 टक्का उरल्यानंतर हा मोड ऑटोमॅटिक सुरु होतो. हा मोड सुरु झाला की, फोन 1 तास सहज चालतो.

स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी कंपनीने 90W ची वायर दिली आहे. याशिवाय 50W चे  वायरलेस चार्जिंग सपोर्टही दिले आहे.  

कलर आणि किंमत जाणून घ्या

Xiaomi 13 Ultra  हा स्मार्टफोन सध्या चीन आणि इतर प्रदेशात लॉन्च करण्यात आला आहे. ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन अशा तीन रंगांमध्ये हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या फोनच्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजसाठी ग्राहकांना 5,999 युआन, म्हणजेच भारतीय चलनात 71,600 रुपये मोजावे लागणार आहेत.

तर 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेजसाठी 6,499 युआन, म्हणजेच भारतीय चलनात 77,500 रुपये मोजावे लागणार आहेत. या फोनचा टॉप व्हेरियंट 16 GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह उपलब्ध आहे. त्यासाठी ग्राहकांना 7,299 युआन म्हणजेच भारतीय चलनात 87,000 रुपये मोजावे लागतील. चीन नंतर इतर देशात हा स्मार्टफोन कधी लॉन्च होईल हे अजून समजलेले नाही. हा स्मार्टफोन अँपलला तोडीसतोड देईल असेही बोलले जात आहे. 

Source: abplive.com