आज जागतिक पर्यटन दिवस आहे. हा दिवस पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी साजरा केला जातो. पर्यटनाची आजची भाषा काहीशी बदललेली पाहायला मिळते. पूर्वी ट्रेन किंवा फ्लाइटने पर्यटन केलं जात होतं. आजदही ते केलं जात असलं तरीही सध्या आपल्या वाहनाने अपेक्षित पर्टनस्थळी जाण्याकडाही लोकांचा कल वाढता पाहायला मिळत आहे. अशात आज अनेक कार अशा आहेत ज्या तुमच्या खिशाला परवडणाऱ्य तर आहेतच पण सुरक्षेच्या आणि मायलेजच्या दृष्टीकोनातूनही अत्यंत उपयुक्त अशा आहेत. आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं टॉप फाईव्ह कार्स ज्यांना पसंती दिली जाते आणि ज्या दहा लाख रुपयांच्या इकॉनॉमी श्रेणीत मोडतात अशा गाड्यांबद्दल आपण बोलणार आहोत.
दहा लाख रुपयांच्या श्रेणीत मोडणाऱ्या टॉप फाईव्ह कार
रेनॉ ट्रायबर, किंमत: 6.33 लाख रूपये
रेनॉ ट्रायबर भारतातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या सात आसनी कारमध्ये मोडली जाते.कारची मॉड्युलॅरिटी आणि कारचं डिझाइन यासाठी या गाडीचं विशेष कौतुक झालं होतं. ऐसपैस आसनव्यवस्था हे या गाडीचं वैशिष्ट्य आहे. या विभागातल्या कार्समध्ये सर्वात जास्त बूटस्पेस म्हणून ही कार मिरवते. या कारचं बूटस्पेस 84 लीटर असतं जे सीट फोल्ड केल्यास 625 लीटर पर्यंत वाढवलं जाऊ शकतं. सुरक्षेच्या दृष्टीनं या कारला ग्लोबल एनसीएपीकडून 4 स्टार रेटींगही मिळालं आहे.
महिंद्रा एक्सयूव्ही 300, किंमत: 7.99 लाख रूपये
महिंद्रा म्हटलं की दणकट गाड्या हे समीकरण जुळलेलं आहे. महिंद्राने एक्सयूव्ही 300 हे मॉडेल बाजारात आणलं आहे. यात सनरुफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स व वायपर्स, स्टीअरिंग मोड्स, रिअर पार्किंग कॅमेरा, फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स अशा सुविधांची भरमार आहे. या कारमध्ये 1.2 लीटर एमस्टेलियन टीजीडीआय पेट्रोल इंजिन आहे. कारमध्ये ऐसपैस जागा आहे आणि सर्व प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळेल याची काळजीही घेण्यात आली आहे.
ह्युंदाई व्हेन्यू , किंमत: 7.77 लाख रूपये
ह्यूंदाई व्हेन्यू स्पोर्टी लुक असलेली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. या कारमध्ये अँड्रॉईड ऑटो, अॅप्पल कार प्ले, रिक्लायनिंग रिअर सीट्स, ऑनबोर्ड वॉईस कमांड्स आणि स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. ही कार पेट्रोल व डिझेल व्हेरिएण्ट्ससह आयएमटी ट्रान्समिशन पर्यायासह येते.व्हेन्यूमध्ये प्रिमिअम इंटीरिअर पाहायला मिळतो आणि या कारचा डॅशबोर्डही कायम चर्चेत असतो.
रेनॉ कायगर, किंमत- 6.47 लाख रूपये
जागतिक दर्जाचे 1.0 लीटर टर्बो पेट्रोल व 1.0 लीटर एनर्जी पेट्रोल इंजिनची शक्ती असलेली ही कार उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते आणि आरामदायीप्रवासाबाबतही या गाडीला पसंती मिळाली आहे. रेनॉ कायगरमध्ये एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी व 5 स्पीड ईजी-आर एएमटी ट्रान्समिशन आहे. तसेच या व्हेईकलमध्ये 20.62 किमी/लीटरची बेस्ट-इन-सेगमेंट इंधन कार्यक्षमता आहे.सुरक्षिततेसंदर्भात रेनॉ कायगरला ग्लोबल एनसीएपीने अडल्ट प्रवाशी सुरक्षिततेसाठी 4 स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहेत.
मारूती सुझुकी ब्रेझा, किंमत: 8.29 लाख रूपये
ब्रेझा मारूतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये अव्वलस्थानी आहे. या कारमध्ये 7 इंच स्मार्ट प्ले स्टुडिओ टचस्क्रिनसह अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कारप्लेसाठी सपोर्ट. ब्रेझामधील एैसपैस केबिन, अधिक स्टोरेज जागा आणि आरामदायी राइड अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. कुटुंबासह रोड ट्रीप करायची असल्यास या गाडीलाही पसंती देण्यात येते.
तेव्हा या पाच कार तुमच्या बजेटमध्ये येतात आणि तुम्हाला उत्तम मायलेज देऊन आरामदायी सफरही घडवतात. तेव्हा पर्यटनाला जायचं आणि रोड ट्रीप करायची असेल तर या पाच गाड्या तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.