World Top 10 Currency: युनायटेड नेशन्सने नुकतेच जगभरातील 180 चलनांना (Currencies) अधिकृत चलन (Legal Tender) म्हणून मान्यता दिली. या 180 चलनांपैकी टॉप 10 चलनांमध्ये कोणत्या देशाचे चलन येते. यामध्ये भारतीय चलनाचा कितवा क्रमांक लागतो. हे आपण जाणून घेणार आहोत.
साधारणपणे व्यवहारातील वापरानुसार सोशल मिडिया आणि न्यूज चॅनेलमधून मिळणाऱ्या माहितीनुसार, अमेरिकन डॉलर आणि युरो या दोन चलनांची माहिती आपल्याला बऱ्यापैकी आहे. पण याचा अर्थ असा नाही की, अमेरिकन डॉलर ही जगातील सर्वात मजूबत किंवा टॉपची करन्सी आहे. कोणत्याही देशाच्या करन्सीची स्थिती ही त्या देशातून होणारी व्यापाराची देवाण-घेवाण, देशातून बाहेर जाणाऱ्या वस्तू व सेवा आणि त्या तुलनेत इतर देशांच्या चलनाची स्थिती यावरून ठरत असते.
Table of contents [Show]
चलनाचे मूल्य कसे ठरते?
कोणत्याही देशाच्या चलनाचे मूल्यमापन करायचे झाल्यास म्हणजे त्याचे मूल्य ठरवायचे झाल्यास एक सोपा नियम वापरला जातो. तो म्हणजे आपल्या देशाच्या चलनातून आपण बाहेरून किती वस्तू आणि सेवा विकत घेतो आणि त्या तुलतनेत इतर देशांच्या चलनात किती वस्तू व सेवा आल्या असत्या. हे तपासले जाते. तसेच आपल्या चलनाच्या बदल्यात दुसऱ्या देशाचे किती चलन आपल्याला मिळते. याद्वारे चलनाचे मूल्य ठरवले जाते.
युनायटेड नेशन्सने नुकत्याच मागील महिन्यात जवळपास 180 देशांच्या चलनांना अधिकृत चलन म्हणून मान्यता दिली आहे. ही मान्यता देताना युनोने (United Nations Organisation-UNO) जगभरातील टॉप 10 मजूबत चलनांची यादी सुद्धा जाहीर केली आहे. या यादीमध्ये कोणत्या देशाच्या चलनाला स्थान मिळाले आहे. तसेच अमेरिकन डॉलर आणि युरोपमधील युरोचा क्रमांक कितवा आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला भारतीय रुपयाचे या यादीत काय स्थान आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.
जगातील सर्वाधिक महाग चलन
कुवैती दिनार (Kuwaiti Dinar-KWD) हे जगातील सर्वांत महागडं चलन आहे. एका कुवैती दिनारचे मूल्य 3.25 डॉलर आहे आणि याचे भारतीय रुपयांत रुपांतर केलं तर त्याची किंमत 269.25 रुपये इतकी आहे. 1960 मध्ये कुवैती दिनार चलन वापरात आलं होतं. तेव्हापासून ते जगातील सर्वात मौल्यवान चलन म्हणून ओळखलं जात आहे. कुवैतमध्ये टॅक्स-फ्री सिस्टिम असून, तिथली अर्थव्यवस्था ही तेलावर अवलंबून आहे. त्यामुळे कुवैती दिनारला खूप मागणी आहे.
टॉप 10 यादीतील दहावे चलन
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकेचे अमेरिकन डॉलर (USD) हे टॉप 10 यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिकन डॉलरला जगभरात मान्यता आहे. डॉलरमध्ये अनेक गोष्टींची खरेदी-विक्री होते. त्यामुळे अनेक देशांच्या गंगाजळीत अमेरिकन डॉलरचा मोठ्या प्रमाणात साठा केला जातो. लोकप्रिय चलनाच्या यादीत डॉलर पहिल्या क्रमांकावर आहे आणि जगातील टॉप 10 महागड्या चलनात दहाव्या क्रमांकावर आहे.
चलनांच्या दुनियेत 'रुपया'चा रुबाब!
अमेरिकन डॉलरप्रमाणे भारतीय रुपया लोकप्रिय चलनात नक्कीच एका चांगल्या क्रमांकावर आहे. पण World's Strongest चलनात मात्र रुपया खूप मागे आहे. उदाहरणासह सांगायचे झाले तर, सर्वांत महागडे चलन कुवैती दिनार (Kuwaiti Dinar-KWD) आहे. 1 कुवैती दिनार म्हणजे 3.25 अमेरिकन डॉलर आणि 1 कुवैती दिनारसाठी 269.25 रुपये मोजावे लागतात. यावरून महागड्या चलनात रुपया खूपच मागे आहे. तो अमेरिकन डॉलरसारख 10 व्या क्रमांकावर देखील नाही. पण लोकप्रिय चलनात मात्र भारतीय रुपया अमेरिकन डॉलर, युरो आणि पाउंड नंतर चौथ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक महागड्या कुवैती दिनारनंतर बहरीन दिनार (Bahraini Dinar-BHD) दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर ओमान रियाल (Omani Rial-OMR) आहे. रुपयामध्ये यांचे मूल्य सांगायचे झाले तर यांची अनुक्रमे 219 रुपये 87 पैसे आणि 215 रुपये 26 पैसे इतकी किंमत आहे. डॉलरमध्ये यांची किंमत अनुक्रमे 2.65 आणि 2.60 अमेरिकन डॉलर आहे. त्यानंतर जॉर्डन दिनार (JOD), ब्रिटिश पाऊंड (GBP), जिब्राल्ट पाउंड (GIP), केमन आयलॅण्ड डॉलर (KYD), स्विस फ्रॅन्क (CHF) आणि युरो (EUR) या चलनांचा अनुक्रमे 4 ते 9 मध्ये क्रमांक लागतो.
Source: www.forbesindia.com