World Saving Day 2023: जगभरात 30 ऑक्टोबर हा दिवस जागतिक बचत दिन (World Saving Day) म्हणून साजरा केला जातो. यालाच World Thrift Day असंही म्हटलं जातं. आर्थिक नियोजनातील पहिला टप्पा हा बचत आहे. अनेकवेळा फायनान्शिअल प्लॅनिंगबद्दल सांगितलं जातं. पण छोट्याछोट्या बचतीकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे आजच्या जागतिक बचत दिनाच्या निमित्ताने बचतीच्या काही चांगल्या सवयींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. मागील वर्षी रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू होते. तर यावेळी इस्त्राईलमध्ये युद्धाची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे अनेक गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. अशावेळी जास्तीत बचत करून आगामी काळात पुरेशी जमापुंजी आपल्याकडे राहील. यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यापूर्वी आपण या बचत दिनाबाबतचा इतिहास जाणून घेऊ.
Table of contents [Show]
बचत दिनाचा इतिहास
जागतिक बचत दिनाची सुरुवात ही 1934 मध्ये सुरु झाली होती. 24 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर, 1924 मध्ये पहिली जागतिक बचत परिषद इटलीमध्ये झाली होती. त्यावेळी बचतीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करून लोकांमध्ये बचतीचे महत्त्व सांगण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला या दिवसाला World Thrift Day असे म्हटले जात होते. Thrift म्हणजे खर्च कमी करणे. पण कालांतराने Thrift या शब्दाऐवजी बचत (Saving) या शब्दाचा वापर होऊ लागला. त्यामुळे आता हा दिवस World Saving Day आणि World Thrift Day अशा दोन्ही नावांनी ओळखला जातो. चला तर मग या दिनाच्या निमित्ताने बचतीच्या काही बेसिक गोष्टी पुन्हा एकदा जाणून घेऊ.
बचत खाते ओपन करा
आर्थिक नियोजनचा पहिला टप्पा हा बचतीपासून सुरू होतो. बचत ही भविष्यातील तरतूद मानली जाते. त्यामुळे उत्पन्नातील बराचसा भाग हा वेगवेगळ्या पद्धतीने बचत करणे गरजेचे आहे. यासाठी लवकरात लवकर बचत खाते (Saving Account) सुरू करणे गरजेचे आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत बचत खाते ओपन केले नसेल तर ते सुरू करा किंवा तुमच्या मुलांना बचतीचे महत्त्वा कळावे. यासाठी त्यांना सेव्हिंग अकाऊंट सुरू करून द्या.
सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा
बचत करण्याचे विविध पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण त्यापैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य किंवा फायदेशीर ठरू शकतो. याची तुम्हाला माहिती नसेल तर सर्वप्रथम सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्या. या योजनांमधून तुमची फसवणूक होणार नाही. तसेच तुम्हाला सरकारकडून निश्चित असे त्यावर व्याजदेखील मिळेल. तोपर्यंत इतर बचतीच्या योजनांची माहिती घेऊन तुम्ही तुमचे बचतीचे ज्ञान वाढवू शकता.
एसआयपी सुरु करा
एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यालाच मराठीत पद्धतशीर गुंतवणूक म्हणतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास एसआयपीला खूप महत्त्व आहे. म्युच्युअल फंडमध्ये थेट गुंतवणूक करण्यापूर्वी एसआयपी ही गुंतवणूक पद्धत समजून घ्या. यामुळे तुम्हाला बचतीची आर्थिक शिस्त तर लागतेच. पण त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्यास मदत होते. एसआयपीची ही गुंतवणूक पद्धत इतर योजनांसाठीही वापरता येऊ शकते.
मुलांना बचतीच्या सवयी लावा
मुलांमध्ये आर्थिक साक्षरतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांना सुरुवातीपासून बचतीचे विविध पर्याय उदाहरणासह समजून सांगा. त्यांच्या नावाने बँकेत बचत खाते सुरू करा. घरातील पिगी बँक आणि बँकेतील बचत खाते यामध्ये नेमका काय फरक आहे. हे बँक खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून समजावून सांगा. बचतीमागे फक्त पैशांची बचत अपेक्षित नसून, बचतीच्या पैशातून चांगली गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीतून भविष्यात चांगला परतावा कसा मिळवायचा हे सांगणे सुद्धा गरजेचे आहे.
अशाप्रकारे आजच्या जागतिक बचत दिनाच्या निमित्ताने तुम्ही स्वत: किंवा तुमच्या परिचयातील, कुटुंबातील व्यक्तींना बचतीचा संदेश देऊन आजचा World Saving Day साजरा करू शकता.