वाढत जाणारी गरिबी ही जगभरातील अनेक देशापुढिल समस्या आहे. गरिबीच्या समस्यावर दूर करण्यासाठी जागतिक बँकेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. या वर्षी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)च्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत गरिबी निर्मूलन करण्यासाठी उपयोजना करण्या संदर्भातील मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. ही बैठक 9 ते 15 ऑक्टोबर या दरम्यान मोरोक्कोच्या (Morocco) मराकेश या शहरात पार पडणार आहे.
गरिबी निर्मूलनासाठी श्वासत उपाय-
जागतिक बँकेच्या मते, गरिबी निर्मुलनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय सहयोग आणि चर्चेसाठी अशा प्रकारच्या बैठका एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरतात. या बैठकांचे उद्दिष्टच हे आहे की जगापुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी कशा प्रकारे उपायोजना करता येतील. त्याच प्रमाणे ही नियोजित बैठक गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी काय पाऊले ऊचलता येतील या अनुषंगाने महत्वाची आहे. या बैठकीमध्ये गरिबी निर्मूलनसारख्या जागतिक आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी श्वासत उपाय आणि धोरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची प्रतिक्रिया जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी व्यक्त केले आहे.
समाजातील प्रतिष्ठितांना संधी-
या बैठकीमध्ये विकसनशील देशासाठी सकारात्मक ठरतील अशा व्यावहारिक दृष्टिकोणांवर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये मुख्यत्वे रोजगार निर्मिती, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, वातावरणातील बदलांसदर्भात उपाययोजना करणे, या मुद्यांचाही बैठकीमध्ये उहापोह केला जाणार आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय बँकांचे अधिकारी, सरकारी मंत्री, खासगी क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, समाजाते प्रतिनिधित्व करणारे नागरिक, तसेच विधिज्ञ अभ्यासक यांचाही या बैठकीमध्ये सहभाग असणार आहे.
या बैठकीमध्ये गरिबी निर्मुलन आणि इतर मुद्द्यावर होणाऱ्या चर्चेचे ऑनलाईन लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे. इंग्रजी, अरबी, फ्रेंच यासह इतर भाषांमध्ये हे प्रसारण केले जाणार आहे. जागतिक बँक आणि नाणे निधीच्या या वार्षिक बैठकीमध्ये भाग घेऊन अनेकांना गरिबी निवारण आणि शाश्वत विकासासंदर्भात मार्गदर्शन करून योगदान देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.