Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Work From Home: घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ सवलत

Work From Home: घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ सवलत

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 वर्तवलेल्या विविध फायद्यांपैकी, जे लोक वर्क फ्रॉम होम (Work From Home) काम करत आहेत त्यांच्यासाठी केंद्राकडून वर्क फ्रॉम होम भत्ता (Allowances) सुरू केला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. येत्या अर्थसंकल्पात नेमके काय असेल याची अनेकजण वाट पाहत आहेत. तज्ञांनी असा अंदाज लावला आहे की सामान्यांसाठी कर भरण्यात अनेक मोठे बदल आणि सवलती दिल्या जाऊ शकतात.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 वर्तवलेल्या विविध फायद्यांपैकी, जे लोक वर्क फ्रॉम होम (Work From Home) काम करत आहेत त्यांच्यासाठी केंद्राकडून वर्क फ्रॉम होम भत्ता (Allowances) सुरू केला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

देशात कोविड साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना Work From Home ची सुविधा दिली होती. ही सुविधा सुरू झाल्यानंतर वर्षभरात घरातून काम करण्यासाठी स्वतंत्र भत्ता दिला जावा अशी मागणी करण्यात आली होती आणि अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना कोविडपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हायब्रीड (Hybrid) किंवा डब्ल्यूएफएच मॉडेलची (WFH Model) निवड करण्यास सांगितले आहे.

WFH कर्मचार्‍यांसाठी कुठला भत्ता मिळणार?

जाणकारांच्या म्हणण्यानुसार जे लोक ऑफिसमध्ये न जाता घरातून काम करत आहेत त्यांना विशेष भत्ता आणि इतर सवलती दिल्या जाऊ शकतात.कायद्यानुसार अशा कर्मचाऱ्यांना थेट भत्ता दिला जाण्याची शक्यता नसल्यामुळे, WFH मॉडेलची निवड करणार्‍यांना कर-संबंधित सवलत दिली जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये वर्क फ्रॉम होम भत्ता मंजूर झाला आणि त्याची घोषणा झाल्यास, हायब्रिड किंवा WFH मॉडेलमधील कर्मचार्‍यांना काही प्रमाणात कर लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पगारातील मोठी रक्कम वाचविण्यात मदत होईल. केंद्राकडून अद्याप अधिकृतपणे काहीही दुजोरा देण्यात आलेला नसला तरी 2023चा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल, अशी अपेक्षा आहे.