Get PF without UAN Number: तुम्ही जर नोकरी करत असाल तर प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (Provident Fund Organization) नियमांनुसार, दरमहा तुमच्या पगारातील काही रक्कम कापली जाते व ती 8.3 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत (Employee Pension Scheme)आणि 3.67 टक्के ईपीएफच्या स्वरूपात जमा होते. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज पडल्यास एेनवेळी UAN नंबर माहिती नसतो. अशावेळी टेंशन घ्यायचे नाही. कारण UAN नंबर माहित नसला तरी, तुम्ही तुमची पीएफची रक्कम पीएफ खात्यातून काढू शकता. या संबंधित सविस्तरपणे जाणून घेवुयात.
UAN नंबरशिवाय PF चेक करा (Check PF without UAN Number)
तुमच्याकडे जर UAN नंबर नसेल तर टेंशन नको. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पीएफ खात्यातील पैशांची रक्कम तपासू शकता किंवा ती रक्कम कशी काढायची यासंदर्भातदेखील तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-229014016 या नंबरवर मिस कॉल देऊन पीएफची रक्कम चेक करू शकता.
UAN नंबरशिवाय मिळवा पीएफ (Get PF without UAN Number)
UAN नंबरशिवाय पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला स्थानिक पोस्ट किंवा पीएफ ऑफिसमध्ये जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला एक नॉन कंपोझिट फॉर्म दिला जाईल, तो फॉर्म भरून तिथेच सबमिट करावा. या प्रोसेसनंतर तुम्ही तुमच्या PF खात्यातून पैसे काढू शकता. जर तुम्ही ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने पैसे काढणार असाल तर तुम्हाला UAN क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांकाची गरज पडेल. हे सर्व माहिती अपडेट केल्यानंतर, तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. ईपीएफओने (EPFO) पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे (Online Money) काढण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाइन रक्कम अशी काढा (Withdraw Amount Online)
सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in या लिंकवर क्लिक करा. यानंतर येथे ऑनलाइन सेवेवर (Online Services) क्लेम फॉर्म दिसेल, येथे तुम्हाला Form-31,19,10C आणि 10D हा फॉर्म पाहायला मिळेल, यावर क्लिक करा व त्यावरील सर्व माहिती अपडेट करा.