रेस्टॉरंट मध्ये जेवायला सर्वानाच आवडत. पण दिवसेंदिवस वाढत चालेल्या महागाईने खवय्यांना बजेट बघून हॉटेल निवडता. आता रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर सर्व्हिस चार्ज (Restaurant Service Charges)भरावा लागणार नाही. उपाहारगृहे ग्राहकांना जबरदस्तीने सेवा शुल्क भरण्यास भाग पाडत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 2 जून रोजी नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) ची बैठक बोलावली आहे.राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) वर ग्राहकांनी नोंदवलेल्या मीडिया रिपोर्ट्स आणि तक्रारींची दखल घेत मंत्रालयाने ही बैठक बोलावली आहे.
फूड डिलिव्हरी कंपन्यांना बैठकीचे आमंत्रण
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित सिंग असणार आहेत. या बैठकीत एनआरएआयलाही (NRAI) याशिवाय झोमॅटो( Zomato), स्विगी (Swiggy), झेप्टो (Zepto), ओला (Ola), उबर (Uber) सारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांनाही या बैठकीत बोलावण्यात आले आहे. या बैठकीत अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
सामान्यांवर सर्व्हिस चार्जचा परिणाम
अलीकडच्या काळात रेस्टॉरंटमध्ये कुटुंबाबरोबर, मित्रांबरोबर जेवायला जाणे हा बऱ्याच जणांचा शनिवार-रविवारचा कार्यक्रम असतो. दिवसेंदिवस रेस्टॉरंटमधील जेवण महाग होत चालल्याने ग्राहकांच्या खिशावर मोठाच ताण पडतो आहे. मात्र आता रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नसल्याचे ग्राहकांच्या खिशावरील बोझा कमी होणार कि नाही हे 2 जूनच्या बैठकीत समजणार आहे. जर हा सर्व्हिस चार्ज बंद केला तर रेस्टोरंट मधील जेवण स्वस्त होऊ शकत.
2 जूनला होणाऱ्या बैठकीत सर्व्हिस चार्ज संदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे. जर सर्व्हिस चार्ज बंद झाला तर महागाईत सर्वसामान्यांना थोडा-फार दिलासा मिळेल.