Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड गुंतवणूक पोर्टफोलिओचा आढावा घेणं का गरजेचं आहे

म्युच्युअल फंड गुंतवणूक पोर्टफोलिओचा आढावा घेणं का गरजेचं आहे

Image Source : www.3cloudsolutions.com

mutual fund portfolio 2022 -म्युच्युअल फंड केवळ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यात मदत करत नाही, तर जीवनातील विविध उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्माण करण्यात मदत करतात. पण यासाठी वेळोवेळी पोर्टफोलिओचा आढावा घेणं आवश्यक आहे.

विविध प्रकारची अल्प (Short Term) आणि दीर्घकालीन (Long Term) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक हा एकमेव सोपा आणि कमी खर्चाचा मार्ग मानला जातो. म्युच्युअल फंड (Mutual Fund) फक्त तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यास मदत करत नाहीत, तर ते जीवनातील विविध प्रकारच्या उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्माण करण्यास ही मदत करतात. मात्र, यासाठी ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण होत आहे की नाही याचा वेळोवेळी आढावा घेणं आवश्यक आहे.

पोर्टफोलिओ म्हणजे काय? What is Portfolio?

आर्थिक क्षेत्रात पोर्टफोलिओ म्हणजे आर्थिक गुंतवणुकीच्या साधनांचा संग्रह, म्हणजेच शेअर्स, डिबेंचर्स, बाँड्स, म्युच्युअल फंडाचे युनिट्स, एक्सचेंज ट्रेडेड फंड याचा एक समूह म्हणजे पोर्टफोलिओ. 

म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ हा फक्त म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा संक्षिप्त आढावा देतो. याचा योग्य समतोल राखण्यासाठी पोर्टफोलिओमधील विविध प्रकारच्या साधनांचा उपयोग करणे गरजेचे आहे. जसे की, गुंतवणुकीच्या कालावधीनुसार अंदाज व्यक्त करणारी साधने आणि बाजारानुसार त्यावर रिअक्शन देणारी साधने यांचा वापर केला तर पोर्टफोलिओमधील गुंतवणुकीवर चांगले रिटर्नस मिळू शकतात. तसेच पोर्टफोलिओमध्ये किती निधी ठेवावा? या प्रश्नाचे उत्तर ही आपल्याला गुंतवणुकीतील वैविध्यातून ठरवण्यास मदत होते.

गुंतवणूकदार गरजेनुसार, लार्ज-कॅप (Large Cap), मिड-कॅप (Mid Cap), मल्टी-कॅप (Multi Cap) आणि स्मॉल-कॅप (Small Cap) फंड निवडू शकतात. प्रत्येक प्रकारच्या म्युच्युअल फंडची कामगिरी पाहणे आणि त्यांच्यातील फरक जाणून घेणं ही नियमित वाटणारी गोष्ट असली तरी ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यातील ग्राफिक्समधून जोखीमचा अंदाज लावणे आणि कोणती स्कीम सुरू ठेवायची याचा अंदाज लावण्यास मदत होते.

बचतीबरोबरच गुंतवणुकीतून नफा मिळवणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. एका फंडमधून नफा बूक करून दुसऱ्या फंडमध्ये प्रवेश घेताना मार्जिन तपासले पाहिजे, यासाठी पोर्टफोलिओमधील साधनांचा उपयोग होतो.