Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investors : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना एयुएमबद्दल माहिती असणे महत्त्वाचे का आहे?

Mutual Fund Investors

एयुएम म्हणजे असेट्स अंडर मॅनेजमेंट (AUM – Asset Under Management). म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे एकूण बाजारमूल्य असते. गुंतवणूकदारांनी त्या फंडात किती पैसे गुंतवले आहेत ते दाखवते.

एयुएम म्हणजे असेट्स अंडर मॅनेजमेंट (AUM – Asset Under Management). म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे एकूण बाजारमूल्य असते. गुंतवणूकदारांनी त्या फंडात किती पैसे गुंतवले आहेत ते दाखवते. मात्र, एयूएमची व्याख्या आणि सूत्र सर्व मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMCs) मध्ये भिन्न असू शकतात. आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या एयूएमबद्दल माहिती देणार आहोत.

म्युच्युअल फंडाचा आकार दर्शविते

एयुएम सहसा म्युच्युअल फंडाच्या आकाराबद्दल सांगते. फंडाची एयूएम जितकी जास्त असेल तितकच चांगलं असतं कारण अधिक लोक त्यांचे पैसे फंडात गुंतवण्यास तयार असतात. जेव्हा अधिक गुंतवणूकदार फंडात पैसे गुंतवतात, तेव्हा त्याची AUM वाढू शकते.

कॅलक्युलेशन कसे केले जाते?

काही वित्तीय संस्था एयुएमच्या कॅलक्युलेशनमध्ये बँक ठेवी, म्युच्युअल फंड आणि रोकड यांचा समावेश करतात. या व्यतिरिक्त, काही संस्था फक्त कंपनीने फंडसाठी वाटप केलेली रक्कम म्हणजेच त्या फंडात गुंतवलेली एकूण रक्कम फंडाचे एयुएम मानतात.

गुंतवणूकदारांच्या रकमेवर अवलंबून आहे

कोणत्याही म्युच्युअल फंडाचे एयुएम हे गुंतवणूकदारांच्या पैशांवर अवलंबून असते. म्हणजेच, गुंतवणूकदार जितके जास्त पैसे गुंतवतील तितके फंडाचे एयूएम जास्त असेल. याशिवाय, फंडामध्ये दररोज चढ-उतार होऊ शकतात, कारण मोठ्या संख्येने गुंतवणूकदार दररोज कोणत्याही फंडात पैसे काढतात आणि गुंतवणूक करत असतात. याशिवाय, फंडाची कामगिरी (असेट परफॉर्मन्स), भांडवलाची वाढ आणि गुंतवणूकदारांकडून लाभांशाची पुनर्गुंतवणूक यामुळेही फंडाचा एयूएम वाढतो.

स्किममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एयुएम तपासले पाहिजे का?

गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाची एयूएम तपासली पाहिजे. यावरून फंडात किती पैसे गुंतवले आहेत याची कल्पना येते. जास्त पैसा म्हणजे लोकांचा विश्वास चांगला आहे. म्युच्युअल फंडाची निवड करताना एयूएमला सर्वाधिक महत्त्व देणे योग्य ठरू शकत नाही, कारण एयूएम जास्त असल्याने फंड अधिक चांगला होऊ शकतो यामागे कोणतेही तर्कशास्त्र नाही. याउलट, एखाद्या लहान फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला असेल तर तो मोठ्या फंडापेक्षा चांगले काम करू शकतो. त्यामुळे एयूएमच्या बाबतीत 'मोठा आहे म्हणजे चांगला आहे' हे सूत्र लागू करू नये.

मोठे एयुएम असलेले फंड देखील सुस्त असू शकतात

सामान्यतः, लहान फंडांपेक्षा मोठ्या फंडांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानले जाते. मात्र, मोठे एयुएम कदाचित चांगल्या कामगिरीची हमी देऊ शकत नाही कारण फंडाची कामगिरी बाजारातील परिस्थितीसह अनेक घटकांवर अवलंबून असते. बाजारात असे अनेक मोठे फंड आहेत जे चांगली कामगिरी करत नाहीत. दुसरीकडे, अनेक छोटे फंड अपवादात्मकरित्या चांगले काम करत आहेत. त्यामुळे, समंजस गुंतवणूकदारांनी मोठ्या एयुएमच्या दिशाभूलीला फसू नये. वास्तविक, हा एक भ्रम आहे, जो मोठ्या फंडच्या वितरकांनी पसरवला आहे, कारण यामुळे त्यांना त्यांच्या फंडला प्रमोट करणे त्यांच्यासाठी सोपे जाते.

मोठा एयुएम समस्यासुद्धा बनू शकतो

काहीवेळा इक्विटी फंडाच्या एयूएमचा मोठा आकार हा नुकसानीचा व्यवहार ठरु शकतो. स्टॉक मार्केटमध्ये दीर्घकाळापर्यंत घसरण झाल्यास या फंडांना अधिक फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत, त्यांचे मूल्य लहान फंडांपेक्षा कमी होऊ शकते.