Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Form 16 : आयटीआर भरतांना लागणारा फॉर्म 16 चे इतके महत्व का? तो कसा मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

ITR Form 16

Image Source : Source: www.paisabazaar.com

Form 16 Important : आयटीआर रिटर्न भरण्यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म -16 दिला असेल. फॉर्म-16 हे एक प्रकारचे असे प्रमाणपत्र आहे, ज्यामध्ये सर्व कराबाबत माहिती दिली जाते. यामध्ये कर्मचाऱ्याला दिलेल्या पगाराचे आणि आर्थिक वर्षात किती टिडिएस कापल्या जाणार याचे सविस्तर वर्णन दिले असते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंन्ट (Income Tax Department) मासिक आधारावर तुमच्या पगारातून टीडीएस कापतो.

How Obtained Form 16 : ITR भरण्यासाठी फॉर्म -16 हे सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे. आणि हा Form-16 सर्व पगारदार वर्गासाठी आवश्यक आहे. कारण या फॉर्ममध्ये कर्मचाऱ्याच्या वार्षिक आर्थिक व्यवहाराशी संबंधित संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिली जाते. जसे की, तुम्हाला किती वार्षिक उत्पन्न मिळाले, किती कर कापला गेला, कोणत्या ठिकाणी तुम्ही कर वाचविला, ही सर्व माहिती फॉर्म -16 मार्फत दिली जाते. उत्पन्न, कर बचत, कर कपात आणि आपण गुंतवणूक केलेल्या स्त्रोतांवरील कर वजावट यासंबंधीचे सर्व तपशिल यात असतात.

फॉर्म -16 देणे बंधनकारक का ?

Income Tax Act, 1961 नुसार ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अश्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीने फॉर्म -16 देणे बंधनकारक आहे. प्रत्येक वर्षी मे किंवा जून महिन्यात कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 दिला जातो. एका वर्षात आपण ज्या-ज्या कंपनीमध्ये काम करु, त्या-त्या कंपनीचा फॉर्म-16 कर्मचाऱ्याला Income Tax भरण्यास लागत असतो.

फॉर्म 16 म्हणजे काय?

फॉर्म-16 हे एक प्रकारचे असे प्रमाणपत्र आहे, ज्यामध्ये सर्व कराबाबत माहिती दिली जाते. यामध्ये कर्मचाऱ्याला दिलेल्या पगाराचे आणि आर्थिक वर्षात किती टिडिएस कापल्या जाणार याचे सविस्तर वर्णन दिले असते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंन्ट (Income Tax Department) मासिक आधारावर तुमच्या पगारातून टीडीएस (TDS) कापतात.

फॉर्म 16 ची आवश्यक्ता का आहे?

फॉर्म-16 मध्ये कर्मचाऱ्याच्या वार्षिक आर्थिक व्यवहाराशी संबंधित संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिली जाते. जसे की, तुम्हाला किती वार्षिक उत्पन्न मिळाले, किती कर कापला गेला, कोणत्या ठिकाणी तुम्ही कर वाचविला, ही सर्व माहिती फॉर्म -16 मार्फत दिली जाते. उत्पन्न, कर बचत, कर कपात आणि आपण गुंतवणूक केलेल्या स्त्रोतांवरील कर वजावट यासंबंधीचे सर्व तपशिलवार वर्णन त्यामध्ये असते. फॉर्म-16 मध्ये सर्व बाबींचे तपशीलवार वर्णन भरण्यासाठी वेगवेगळे कॉलम दिलेले असते. फॉर्म 16 हा तुम्ही सरकारकडे कर भरला की नाही याचा पुरावा म्हणून काम करतो. फॉर्म 16 मध्ये फॉर्म- 16A आणि फॉर्म- 16B असे दोन भाग असते.