आजच्या काळात रिअल इस्टेट हे गुंतवणुकीचे सर्वात व्यवहार्य क्षेत्र आहे.लाइफस्टाइल सुधारावी आणि स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. पायाभूत सुविधांसह घर खरेदी करताना त्याकडे एक गुंतवणूक म्हणून बघणे देखील गरजेचे आहे. .
Table of contents [Show]
1. उत्पन्नाचा मौल्यवान स्रोत
सध्याची आर्थिक परिस्थिती बघता वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ आणि चलनवाढ याचा ताळमेळ साधने जिकीरीचे बनले आहे.अशा परिस्थितीत रिअल इस्टेट मालमत्तेला भाडे तत्वावर देऊन भांडवली कमाईचा एक मोठा स्रोत उभा राहू शकतो. मुंबई, पुणे, नाशिक या नागरी भागांत मोठ्या प्रमाणात भाडे तत्वावर दिली जाणाऱ्या घरांना मागणी आहे.
कोविड प्रादुर्भावानंतर घरांच्या भाड्याच्या किमती वाढल्या आहेत. रिअल इस्टेट गुंतवणूक आर्थिक उतार-चढावांच्या काळात संभाव्य तारण मालमत्ता म्हणून देखील उपयोगी पडू शकते.मालमत्ता कर आणि देखभाल शुल्काची अगोदरच व्यवस्थापन केले तर रिअल इस्टेट गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
2. सतत वाढत जाणारे बाजारमूल्य
मालमत्तेचे स्थान आणि तिची पायाभूत सुविधा काही वर्षांतच मालमत्तेचे भाव वाढवत असते. दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे रिअल इस्टेट गुंतवणूक फायद्यात आहे. तज्ञांच्या मते, रियल्टी मालमत्तेचे मूल्य दरवर्षी 6-8% वाढते. याचाच अर्थ जितकी जास्त काळ गुंतवणूक तितका अधिक नफा याद्वारे तुम्ही मिळवू शकता. रिअल इस्टेटची मालकी ही एक शाश्वत संपत्ती जमा करण्याचे स्त्रोत आहे, जे भविष्यातील पिढ्यांना देखील सुरक्षित करू शकते.
3. कर लाभ आणि उपाय
मालमत्तेच्या अवमूल्यनाच्या काळात, रिअल इस्टेट गुंतवणूकदार देखभाल आणि दुरुस्तीच्या खर्चातून कर सूट घेऊ शकतात. जे गुंतवणूकदार रिअल्टीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांनी या गुंतवणुकीचा नक्कीच विचार केला पाहिजे कारण इतर उद्योगांच्या तुलनेत अशी कर सवलत इतर गुंतवणुकीत दिली जात नाही.
4. मूर्त स्वरूपातील गुंतवणूक
रिअल इस्टेटमधील गुंतवणूक तुम्ही डोळ्यांनी बघू शकता. त्याची देखभाल, त्याचा विकास तुम्ही ठरवू शकता. मुदत ठेव, शेयर मार्केट आदी गुंतवणूकीत थेट तुमचा हस्तक्षेप नसतो. तुमच्या घराची खरेदी-विक्री तुम्ही स्वतः ठरवू शकता. त्यामुळे, रिअल्टी गुंतवणूक तुलनेने जोखीममुक्त असते आणि ती कमाईच्या अनेक प्रवाहात बदलली जाऊ शकते.
5. महागाईवर मात करण्यास सक्षम
वाढत्या महागाईच्या काळातही मालमत्तेचे मूल्य शाश्वत वाढीचे साक्षीदार आहे. चलनवाढीचा सामना करताना मालमत्तेच्या किमतीत अचानक वाढ होताना आपण पाहिली आहे, त्यामुळेच रिअल इस्टेट गुंतवणूकदार त्यांच्या मालमत्तेवर चांगले भाडे आणि परतावा मिळवू शकतात, ही जमेची बाजू आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय नियोजनासाठी किंवा कार्यक्षमतेसाठी प्राथमिक भांडवलाची पूर्तता आवश्यक असते. रिअल इस्टेटमध्ये जमीन हे भांडवल आहे. जमीन आणि जागेच्या कमतरतेमुळे रिअल इस्टेटची मागणी वाढली आहे आणि ज्यांच्याकडे जमीन आणि मालमत्ता आहेत असे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर भांडवल उभे करत आहेत. बाजारांमध्ये जमिनीचा तुटपुंजी पुरवठा आणि वाढती मागणी असल्यामुळे सध्या जमिनींच्या किमती वाढल्या आहेत अशा परिस्थितीत रिअल्टी गुंतवणूक ही नेहमीच हॉट फेव्हरेट गुंतवणूक असेल.