Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: निवृत्तीचे आर्थिक नियोजन का महत्त्वाचे आहे? वेळोवेळी यात बदल करणे का करावा? वाचा

Retirement Planning

Image Source : https://www.freepik.com/

नोकरी करत असतानाच सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीचे आर्थिक नियोजन केल्यास पुढे जाऊन इतर समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. परंतु, हे देखील लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक लहान लहान गोष्टींचे नियोजन करणे योग्य ठरत नाही.

निवृत्ती खूप लांब आहे, या विचाराने अनेकजण आर्थिक नियोजन करणे टाळतात. मात्र, निवृत्ती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो व यामुळे आधीपासून यासाठीचे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.

नोकरी करत असतानाच सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीचे आर्थिक नियोजन केल्यास पुढे जाऊन इतर समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. परंतु, हे देखील लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक लहान लहान गोष्टींचे नियोजन करणे योग्य ठरत नाही. अनेकवेळा आयुष्यात अनपेक्षित घटना घडतात व यामुळे आर्थिक नियोजन बिघडते. त्यामुळे निवृत्ती नियोजन करताना नेहमीच लवचकिता व बदल स्विकारण्यास तयार असायला हवे. बदलत्या परिस्थितीनुसार आर्थिक नियोजनामध्येही बदल करण्याची क्षमता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

अनेकजण एकदा गुंतवणूक केली की पुन्हा त्याचे पुनरावलोकन करत नाही. त्यामुळे अचानक आलेला वैद्यकीय खर्च, नोकरी जाणे व जीवनशैलीमध्ये बदल अशा गोष्टींना सामोरे जाणे अडचणीचे ठरते. तुम्ही देखील निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालवण्यासाठी आर्थिक नियोजन करत असाल तर अनपेक्षित परिस्थितीशी जुळवून त्याप्रमाणे बदल स्विकारण्यास तयार असायला हवे. या लेखातून निवृत्तीच्या नियोजनात लवचिकता का गरजेची आहे? याचे नक्की फायदे काय आहेत व गरजेनुसार आर्थिक नियोजनात कसा बदल करू शकता? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

निवृत्ती नियोजन (Retirement Planning) म्हणजे काय? 

निवृत्ती नियोजन म्हणजे तुमच्या येणाऱ्या भविष्याला आतापासूनच आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे होय. वृद्धापकाळात उत्पन्नाचा मार्ग बंद झालेला असतो. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. वृद्धापकाळात कोणत्या परिस्थितीमध्ये पैशांच्या अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी आतापासूनच केलेली तयारी म्हणजे निवृत्ती नियोजन होय.

निवृत्ती नियोजनामध्ये तुमचे उत्पन्न, बचत व खर्च याचा विचार करणे गरजेचे आहे. बचतीचे ठराविक उद्दिष्ट समोर ठेऊन ते पूर्ण करण्यासाठीची योजना बनवणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नोकरी करत असतानाच जास्तीत जास्त बचत करायला हवी. ज्यामुळे निवृत्तीनंतर हीच गुंतवणूक तुमच्या उपयोगी येईल. 

अनेकजण नोकरी करताना सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष करतात. परंतु, निवृत्ती स्विकारल्यानंतर याचे महत्त्व पटू लागते. त्यामुळे आधीपासून विविध बचत योजना, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. निवृत्तीचे आर्थिक नियोजन करण्यासाठी तुम्ही सल्लागाराचीही मदत घेऊ शकता.

निवृत्ती नियोजनाचे महत्त्व

सुरक्षित भविष्यनिवृत्ती नियोजन म्हणजे तुमच्या सुरक्षित भविष्याच्या दिशेने टाकलेले पाऊल होय. वयाची 60-65 वर्ष पूर्ण केल्यानंतर कोणतीही आर्थिक समस्या येऊ नये यासाठी निवृत्ती नियोजन महत्त्वाचे आहे.
वैद्यकीय खर्चवाढत्या वयानुसार वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. आधीपासूनच योग्य आर्थिक नियोजन केलेले नसल्यास संपूर्ण बचत हॉस्पिटलचे बिल भरण्यातच संपते. त्यामुळे विमा, पेन्शन योजनामध्ये गुंतवणूक केलेली असल्यास निवृत्तीनंतर वैद्यकीय खर्चाची काळजी राहत नाही.
आर्थिक सुरक्षिततानिवृत्तीनंतर नोकरी नसल्याने पगार थांबतो. अशावेळी आर्थिक नियोजन केलेले नसल्यास पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते अथवा कर्ज काढावे लागते. निवृत्ती नियोजनामुळे आर्थिक सुरक्षितता प्राप्त होते व पैशांची समस्या निर्माण होत नाही. 
इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाहीनोकरी करत असतानाच म्युच्युअल फंड, पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक केलेली असल्यास निवृत्तीनंतर पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याचे गरज पडत नाही. सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून नियमित पैसे मिळत राहतात. याशिवाय, नोकरी करत असतानाच उत्पन्नाचे इतर स्रोत निर्माण गरजेचे आहे.
चांगले आयुष्य व स्वप्न पूर्ण करण्यासाठीनिवृत्तीनंतर जीवनशैलीत मोठा बदल होतो. नोकरी करतानाचे व निवृत्तीनंतरच्या आयुष्यात मोठा फरक असतो व अनेकजण हा बदल स्विकारण्यास तयार नसतो. परंतु, योग्य आर्थिक नियोजन केलेले असल्यास निवृत्तीनंतरही सध्याची जीवनशैली टिकवून ठेऊ शकता. याशिवाय, आर्थिक नियोजनामुळे निवृत्तीनंतर प्रवास करणे, छंद जोपासणे अशी इतर स्वप्नही पूर्ण करणे शक्य होते.

निवृत्ती नियोजनात लवचिकता का गरजेची आहे?

सेवानिवृत्ती नियोजनता लवचिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला बदलत्या परिस्थितीनुसार आर्थिक नियोजनात बदल करता येतो व जीवनशैलीवर देखील कोणताही परिणाम होत नाही. नियोजनात लवचिकता असल्यास तुम्ही शांततेत व आनंदात निवृत्तीनंतरचे आयुष्य घालवू शकता.

समजा, तुम्ही नोकरी करत असताना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीचे अचूक नियोजन केले आहे. निवृत्तीनंतर दरमहिन्याला कोणत्या गोष्टींवर किती पैसे खर्च करायचे हे सर्व ठरवले आहे. मात्र, अचानक अनपेक्षित परिस्थितीमध्ये खर्चात वाढ झाल्यास? सेवानिवृत्ती योजनेतील लवचिकता महत्त्वाची ठरते. निवृत्तीच्या आर्थिक नियोजनात लवचिकता का गरजेचे आहे, हे समजून घेऊया.

अनिश्चितता तुम्ही कितीही चांगल्याप्रकारे आर्थिक नियोजन केलेले असले तरीही कधी कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही. अचानक उद्भवणारा आजार, वैद्यकीय खर्च, घर-गाडीची दुरुस्ती, कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदतीची गरज भासू शकते. अशा स्थितीमध्ये संपूर्ण आर्थिक बजेट कोलमडते. मात्र, लवचिक सेवानिवृत्ती योजना गरजेनुसार बजेटमध्ये बदल करण्यास मदत करते.
महागाई महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतात महागाई दर हा सरासरी 5 ते 6 टक्के आहे. महागाई व उत्पन्नातील फरक वाढत गेल्यास आर्थिक नियोजनावरही याचा परिणाम दिसून येतो. प्रामुख्याने निवृत्तीनंतर पगार बंद झालेला असतो, गुंतवणुकीवरील व्याजदरही कमी असते. अशावेळी एकाच आर्थिक नियोजनावर कायम राहिल्यास जीवनशैलीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, तुम्ही त्यात बदल केल्यास वाढत्या महागाईशी ताळमेळ साधू शकता.
आर्थिक परिस्थितीमध्ये बदलनिवृत्तीनंतर आरामात आयुष्य घालवता यावे यासाठी आपण म्युच्युअल फंड, सोने, स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो. परंतु, कोणतीही गुंतवणूक ही बाजारातील स्थितीवर अवलंबून असते. महागाईत वाढ, व्याजदर कमी, शेअर्सची मूल्य कमी होणे अशी स्थिती निर्माण होऊ शकते. अतिरिक्त उत्पन्नाचाही मार्ग बंद होऊ शकतो. त्यामुळे परिस्थितीनुसार आर्थिक नियोजनात बदल करावा.
जीवनशैलीत बदलनिवृत्तीनंतर जीवनशैलीत मोठा बदल होतो, तर दुसरीकडे पगार बंद झालेला असतो. पेन्शनच्या मदतीनेच आर्थिक गरजा पूर्ण कराव्या लागतात. निवृत्तीनंतर तुम्हाला गाडी-घर खरेदी करायचे असेल, प्रवास करायचा असेल अथवा नवीन छंद जोपासायचा असू शकतो. लवचिक निवृत्ती योजनाच्या मदतीने तुम्ही हे सर्व पूर्ण करू शकता.

निवृत्ती नियोजनात वेळोवेळी बदल करणे का गरजेचे आहे?

निवृत्ती नियोजनात लवचिकता असल्यास गरजेनुसार त्यात बदल करता येतो. मात्र, आर्थिक नियोजनाचे वेळोवेळी पुनरावलोकन करून त्यात बदल करणे देखील गरजेचे आहे. लवचिकतेमुळे तुम्हाला अनपेक्षित स्थितीला सामोरे जाण्यास मदत होते, तर बदल स्विकारल्यामुळे नवीन संधी निर्माण होऊन त्यानुसार योजना आखता येते.

समजा, तुम्ही निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी सर्वोत्तम योजना आखली आहे. परंतु, अचानक गुंतवणुकीची नवीन संधी निर्माण झाली तर? त्यामुळे नियोजनात वेळोवेळी बदल करून अनपेक्षित संधींचा फायदा घेता येणे देखील गरजेचे आहे.

नवीन संधी आजुबाजूला सातत्याने होणाऱ्या बदलांना स्विकारून संधीचे सोने गरजेचे असते. नोकरी, व्यवसाय, गुंतवणुकीशी संबंधित संधी सातत्याने निर्माण होत असतात. नवीन तंत्रज्ञानाबाबत जाणून घेणे देखील आवश्यक आहे. निवृत्तीनंतरही उत्पन्नासाठी पार्ट टाइम नोकरी अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजनात वेळोवेळी बदल स्विकारल्यास आर्थिक सुरक्षा प्राप्त होते.
उद्दिष्टांमध्ये बदलनिवृत्ती नियोजनामध्ये भविष्याचा विचार करून अनेक गोष्टींची योजना आखण्यात आलेली असते. निवृत्तीनंतरचा वैद्यकीय खर्च, कर्जाचे हफ्ते, प्रवासाचा खर्च व दैनंदिन खर्चाचा विचार केलेला असतो. याशिवाय, ठराविक उद्दिष्ट समोर ठेऊन गुंतवणूक करण्यात आलेली असते. मात्र, भविष्यात उद्दिष्टांमध्ये बदल होऊ शकतो. निवृत्तीनंतर कौटुंबिक स्थितीत बदल होऊ शकतो. नवीन छंद जोपासायची आवड असू शकते. यामुळे आर्थिक गणित बिघडू शकते. अशावेळी निवृत्ती योजनांमध्ये बदल करण्यास तयार राहावे.
दीर्घायुष्य भारतातील व्यक्तींचे सरासरी आयुर्मान हे जवळपास 72 ते 75 वर्ष आहे. तर सर्वसाधारणपणे वयाच्या 60-65 व्या वर्षी निवृत्ती स्विकारली जाते. निवृत्तीनंतरची पुढील आयुष्य आरामात जगता यावे यासाठीच नियोजन केले जाते. मात्र, निवृत्तीच्या काळात तुमच्या गरजा आणि प्राधान्यक्रम बदलण्याची शक्यता असते. निवृत्तीनंतर खर्चात देखील वाढ होत जाते. अशावेळी, गरज पडेल त्यानुसार निवृत्ती योजनेत बदल करायला हवा. 

तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनात गरजेनुसार बदल कसा कराल?

तरूणपणीच करा नियोजनाला सुरुवात कोणताही आर्थिक सल्लागार तुम्हाला तरूणपणीच निवृत्ती नियोजनास सुरुवात करण्याचा सल्ला देईल. याचे कारण म्हणजे चक्रवाढीचा मिळणार फायदा. नोकरी लागल्यावर पहिल्या पगारापासूनच आर्थिक नियोजन व बचत करणे गरजेचे आहे. तरूणपणीच नियोजनास सुरुवात केल्यास निवृत्तीच्या वेळेस आर्थिकदृष्ट्या स्थिती खूपच चांगली असेल. विशेष म्हणजे यामुळे तुम्हाला परिस्थितीनुसार आर्थिक नियोजनात बदलही करता येईल. तसेच, तुमच्या बचतीमध्ये सातत्य असणेही तेवढेच गरजेचे आहे.
गुंतवणुकीत हवी विविधतासर्वसाधारणपणे भारतीय व्यक्ती गुंतवणूक करताना मुदत ठेवीला प्राधान्य देते. परंतु, गुंतवणुकीसाठी इतरही पर्यायांचा विचार करायला हवा. तुमच्या गुंतवणुकीत विविधता असणे गरजेचे आहे. सोने, स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, बाँड्स, रिअल इस्टेट अशी गुंतवणुकीत विविधता असल्यास नुकसानीची शक्यता कमी होते. गुंतवणुकीमुळे निवृत्तीनंतरचे आयुष्य जगताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही. महत्त्वाचे म्हणजे सेवानिवृत्ती नियोजनात बदल करणेही शक्य होते. 
आर्थिक सल्लागाराची घ्या मदत निवृत्ती हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. आयुष्यभर व्यक्ती निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगता यावे, यासाठी मेहनत घेत असते. त्यामुळे निवृत्ती नियोजन हा महत्त्वाचा भाग ठरतो. योग्यप्रकारे निवृत्ती नियोजन करण्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. तुमचे उत्पन्न, जोखीम स्विकारण्याची क्षमता व निवृत्तीनंतरचे उद्दिष्ट यानुसार आर्थिक बजेट तयार करू शकता.
वेळोवेळी करा पुनरावलोकनसेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनात गरजेनुसार बदल करण्यासाठी त्याचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. बदलत्या परिस्थितीनुसार निवृत्ती नियोजनात बदल करायला हवा. गुंतवणूक योजना, पेन्शन-विमा योजना याचेही पुनरावलोकन करून बदल करणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतरही उत्पन्नाचा मार्ग शोधणे गरजेचे आहे. उत्पन्न सुरू असल्यास आर्थिक नियोजन करणे सोपे जाते.

निवृत्ती नियोजनात लवचिकता व सातत्याचे फायदे

निवृत्तीच्या आर्थिक नियोजनाचा मूळ उद्देश हा वृद्धापकाळात उर्वरित आयुष्य कोणत्याही समस्येशिवाय निवांत जगता यावे हा असतो. निवृत्ती नियोजनातील लवचिकता व सातत्यामुळे अनपेक्षित घटनांना सामोरे जाऊन निवांत जीवन जगता येते. नियोजनामुळे अनावश्यक खर्च टाळून गरजेच्या गोष्टीवर खर्च करण्यास मदत होते. विशेष म्हणजे यामुळे आर्थिक सुरक्षा प्राप्त होते. 

थोडक्यात, लवचिकता व वेळोवेळी बदल स्विकारणे हा यशस्वी निवृत्ती योजनेचा पाया आहे. खर्च करण्यापासून ते गुंतवणुकीपर्यंत, सर्वांचा मार्ग हा निवृत्ती योजनेच्या माध्यमातूनच जातो. आर्थिक नियोजनामध्ये लवचिकता असल्याने वृद्ध लोक आत्मविश्वासाने अनपेक्षित घटनांना सामोरे जाऊ शकतात. त्यामुळे नोकरी करत असतानाच निवृत्ती नियोजनाचा पाया रचणे गरजेचे आहे. सोबतच, वेळोवेळी त्यात बदल करून वयाच्या 60-65 वर्षानंतरचे आयुष्यात आनंदात घालवा.