Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Commercial Real Estate Property: व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

Commercial Real Estate Property

Commercial Real Estate Property: निवासी मालमत्ता वार्षिक 1 ते 2 टक्के परतावा देते, तर व्यावसायिक मालमत्ता वार्षिक 8-11 टक्के परतावा देण्यास सक्षम असते.

Commercial Real Estate Property: काही लोकांना सोने आणि चांदीसारख्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक(Jewellery Investment) करायला आवडते, तर काही लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक(Share Market Investment) करायला आवडते. पण असेही काही लोक आहेत जे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक(Real Estate Investment) करण्यास कायम तत्पर असतात. रिअल इस्टेटमध्ये निवासी मालमत्ता(Residential Property) आणि व्यावसायिक मालमत्ता(Commercial Property) असे 2 पर्याय उपलब्ध आहात. यामधील व्यावसायिक मालमत्तेमध्ये दुकाने(Shop), शोरूम(Showroom) इत्यादींचा समावेश होतो. आज आपण व्यावसायिक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. हे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की व्यावसायिक मालमत्तेत(Commercial Property) गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत.

पगारदार करतायेत व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक

ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तेच व्यावसायिक मालमत्ता(Commercial Property) खरेदी करू शकतात असा एक समज आहे. आजकाल पगारदार वर्गही व्यावसायिक मालमत्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करताना दिसतोय. व्यावसायिक मालमत्तेमध्ये(Commercial Property) गुंतवणूकदाराला नियमित परतावा देण्याची क्षमता असते. याशिवाय या मालमत्तेवर भाडे(Rent) देखील जास्त मिळते.

भाडे उत्पन्न मालमत्ता

निवासी मालमत्तेच्या तुलनेत व्यावसायिक मालमत्तेमध्ये भाडे(Rent) जास्त मिळते. निवासी मालमत्ता वार्षिक 1 ते 2 टक्के परतावा देते, तर व्यावसायिक मालमत्ता वार्षिक 8-11 टक्के परतावा देण्यास सक्षम असते. त्यामुळे जर तुम्हाला फक्त भाड्याचे उत्पन्न मिळवायचे असेल तर व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणे कधीही चांगला पर्याय आहे.

झिरो फर्निचर खर्च

व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देण्याआधी तिला फर्निचर(Furniture) करण्याची गरज नाही. अशाप्रकारे मालकाचा हा अतिरिक्त खर्च वाचतो.

भाडेकरूंशी कमी भांडण

दुकाने(Shop) किंवा शोरूम(Showroom) भाड्याने देणारे लोक कंपन्यांशी संबंधित असल्याने ते सामान्य भाडेकरू नाहीत. सामान्य भाडेकरूंपेक्षा त्यांचा अकाउंट बॅलेन्स चांगला आहे. त्यामुळे 6 महिने किंवा वर्षभराचे भाडे आगाऊ मिळते. भाड्याने व्यावसायिक मालमत्ता घेणाऱ्या कंपन्या दीर्घ काळासाठी (5-10 वर्षे) भाड्याने घेतात. त्यामुळे व्यवहार चोख असतो.

व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे

सर्वात मोठी गुंतवणूक

व्यावसायिक मालमत्ता(Commercial Property) ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, त्यामुळे याला तोटा म्हणता येणार नाही, पण मर्यादा नक्कीच म्हणून शकतो. यासाठी सुरुवातीला मोठी रक्कम गुंतवावी लागते, तर याउलट निवासी मालमत्तेमध्ये(Residential Property) सुरुवातीची गुंतवणूक खूपच कमी असू शकते.

महाग कर्जदर

व्यावसायिक मालमत्ता(Commercial Property) घेण्याची आणखी एक मर्यादा म्हणजे त्यावर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला जास्त व्याजदर द्यावा लागतो. व्यावसायिक मालमत्तेची कर्ज सामान्यतः महाग असतात. कर्जाचा दर कधीकधी मालमत्तेचा प्रकार, गुंतवणूकदाराचे प्रोफाइल, स्थान आणि परतफेडीच्या कालावधीवर देखील अवलंबून असतो.