1 मार्चपासून सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा बोजा आणखी वाढला आहे. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत (LPG Price Hike) वाढ झाली आहे. गेल्या 2 वर्षांच्या भावाढीवर नजर टाकली तर सिलिंडरच्या किमती सुमारे 400 रुपयांनी वाढल्या आहेत.
आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे आणखी त्रास सहन करावा लागू शकतो. दिल्ली, मुंबई, कलकत्ता यासह देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये 1 मार्च पासून नवे वाढलेले दर लागू झाले आहेत.
14.2 किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपयांवर पोहोचली आहे. यासोबतच 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1721 रुपयांवर पोहोचली आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 350 रुपयांची वाढ ही आतापर्यंतची एकाच वेळी झालेली दुसरी सर्वात मोठी वाढ आहे. याआधी 2014 मध्ये एकदाच व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 350 रुपयांनी वाढ झाली होती.
गेल्या 2 वर्षात ₹409 रुपयांनी वाढ
भारतात गेल्या 2 वर्षात एका सिलिंडरच्या किमतीत ₹409 रुपयांनी वाढ झाली आहे. मार्च 2021 मध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी सुमारे 2 वर्षे 2 महिन्यांनंतर 1103 रुपये झाली आहे.
फेब्रुवारीमध्ये, लोकसभेचे सदस्य कलानिधी वीरास्वामी (Kalanidhi Veeraswamy) यांनी पेट्रोलियम मंत्रालयाला (Petroleum Ministry) विचारले की भारतात एलपीजीच्या किमती सातत्याने का वाढत आहेत. उत्तरादाखल मंत्रालयाने भाववाढीचे श्रेय एलपीजीसाठी भारताचे आयातीवर अवलंबून राहणे आणि आखाती देशांसोबत झालेल्या कराराच्या सरासरी किंमतीला (Contract Prices) दिले आहे.
भारतात स्वयंपाकाच्या गॅसच्या किरकोळ किमती कशा ठरवल्या जातात?
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहक जे काही पैसे देतो त्यात तीन घटक असतात - एलपीजी किंमत (LPG Price), डीलरचे कमिशन (Dealer's Commission) आणि कर (Taxes). भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींपेक्षा, करांचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो. घरगुती स्वयंपाकाच्या गॅससाठी, सिलिंडरच्या किमतीत जवळपास 90 टक्के किंमत ही एलपीजीची असते. सिलिंडरच्या किरकोळ किंमतीवर 11 टक्के कमिशन आणि करांचा वाटा आहे.
एलपीजीची किंमत कशी मोजली जाते?
एलपीजी किंमत आयात समता मूल्य (An Import Parity Price Formula) सूत्राच्या आधारे मोजली जाते. LPG साठी भारताच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबित्व असल्यामुळे, किमती आंतरराष्ट्रीय FOB किमतींवर (फ्रीट ऑन बोर्ड) आधारलेल्या असतात.
पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस सेलच्या ( Petroleum Planning and Analysis Sale) आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय FOB किमती प्रति टन $650 आणि जानेवारीमध्ये $599 प्रति टन इतक्या होत्या. PPAC चा फेब्रुवारीचा डेटा अद्याप अपडेट करणे बाकी आहे, मंत्रालयाने म्हटले आहे की, सरासरी आखाती CP (Saudi Contract Price) फेब्रुवारी 2023 पर्यंत प्रति टन US$ 710 पर्यंत वाढले आहे.
अमेरिका, युरोपातील गॅसच्या किमती मात्र स्थिर...
यूएस आणि युरोपमधील नैसर्गिक वायूच्या किमती नुकत्याच नरमल्या आहेत. परंतु, एलपीजीचे भाव हे ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतींवर दिल्या जाणाऱ्या सवलतीनुसार बदलत जातात. मध्य पूर्वेतील आखाती देश हे भारताचे सर्वात मोठा एलपीजी पुरवठादार आहे आणि भारताच्या एलपीजी किमतीचे सूत्र सौदीच्या प्रोपेन (Propane) आणि ब्युटेनच्या (Butane) किमतींवर अवलंबून आहे. या दोन्ही केमिकल्सच्या दरात वाढ केली असल्याने पेट्रोलच्या दरातही वाढ झाली आहे. LPG दोन घटकांपासून बनते - 40 टक्के प्रोपेन आणि 60 टक्के ब्युटेन.
आखाती देश प्रोपेन आणि ब्युटेनच्या किमती का वाढवत आहे?
सरासरी आखाती CP ज्यावर घरगुती LPG किमती आधारित आहेत ते FY20 मध्ये $454 प्रति टन वरून FY22 मध्ये $693 प्रति टन इतके प्रचंड वाढले आहे. FY23 दरम्यान, सरासरी सौदी CP फेब्रुवारी 2023 पर्यंत $710 प्रति टन वाढला असल्याचे मंत्रालयाने गेल्या महिन्यात सांगितले होते.
जाणकारांचे म्हणणे आहे की, आशियाई बाजारातील सुधारित मागणीमुळे येणाऱ्या काळातही पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रोपेन हे पेट्रोकेमिकल्स फीडस्टॉक देखील आहे आणि आशियातील पेट्रोकेमिकल्सची जास्त मागणी यामुळे किंमत वाढली असावी, असेही म्हटले जात आहे.
LPG साठी भारताचे आयात अवलंबित्व किती आहे?
भारताच्या 60 टक्क्यांहून अधिक एलपीजी गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात. भारताने एप्रिल-सप्टेंबर 2022 मध्ये त्याच्या एकूण 13.8 दशलक्ष टन वापरापैकी 8.7 दशलक्ष टन एलपीजी आयात केले होते.
Unacademy layoffs: भारतातील E-Learning प्लॅटफॉर्म कंपनी 'Unacademy' ने 380 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे. नोकरकपात केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काही सुविधा दिल्या आहेत. ही कर्मचारी कपात करण्याचे कारण काय? आणि कोणत्या सुविधा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
Maruti Suzuki Sale: मारुती सुझुकी कंपनी सन 1986-87 पासून, परदेशी बाजारपेठेत मारुती कार निर्यात करण्यास सुरुवात केली. आता या कंपनीने 2.5 दशलक्ष कार विक्रीचा टप्पा पार केलेला आहे.
Tax Saving Options: चालू आर्थिक वर्ष संपणार असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत,जर तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे वाचवायचे असतील, तर तुमच्याकडे कर बचतीसाठी केवळ एक दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे, उशीर न करता, काही महत्त्वाची गुंतवणूक ताबडतोब करा, कारण कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे.