• 02 Oct, 2022 08:28

ITR-6 हा फॉर्म कोणासाठी आहे? तो कसा भरायचा?

INCOMETAX RETURN

इन्कम टॅक्स कायद्यातील (Income Tax Act) कलम 11 अंतर्गत सूट मिळवण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांनी आयटीआर-6 फॉर्म (ITR-6 Form) दाखल करणे आवश्यक आहे.

इन्कम टॅक्स कायद्यातील (Income Tax Act) कलम 11 अंतर्गत सूट मिळवण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांनी ITR-6 Form दाखल (ITR Return file) करणे आवश्यक आहे.

कलम 11 अंतर्गत कोणत्या कंपन्या सूट मिळवण्यासाठी दावा करू शकतात?

ज्यांच्या मालमत्तेतून किंवा इतर स्त्रोतातून आलेले उत्पन्न धर्मादाय किंवा धार्मिक हेतुसाठी राखीव असते, त्या संस्था/कंपन्या कलम 11 अंतर्गत सूट मिळवण्याचा दावा करू शकतात.

ITR-6 फॉर्मची रचना काय आहे?

आयटीआर-6 फॉर्म हा भाग-अ आणि भाग-ब अशा दोन भागांमध्ये आणि 42 शेड्युल्समध्ये विभागला आहे. भाग अ मध्ये सर्वसाधारण माहिती तर भाग ब मध्ये एकूण उत्पन्नाची नोंद करायची आहे. तर 42 शेड्युल्सद्वारे संस्था/कंपन्यांचे उत्पन्न, कर, दायित्व अशी माहिती भरावयाची आहे.


ITR-6 फॉर्म भरण्यास कोण पात्र नाही?

  • कोणतीही वैयक्तिक व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन (AOP), बॉडी ऑफ इंडिव्हिज्युल (BOI), स्थानिक प्राधिकरण आणि आर्टीफिशिअल ज्युडिशिअल पर्सन. 
  • कलम 11 (धर्मादाय किंवा धार्मिक हेतूंसाठी ठेवलेल्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न) अंतर्गत सवलतीचा दावा करणाऱ्या कंपन्या.

ITR-6 फॉर्ममधील महत्त्वाचे बदल

आर्थिक वर्ष 2021-21 मध्ये आयटीआर-6 फॉर्ममध्ये बदल करण्यात आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत.

  • सिक्युरिटी ट्रान्सॅक्शन टॅक्सला (STT) उत्तरदायी असलेल्या ट्रस्टच्या इक्विटी किंवा युनीट्सच्या विक्रीवर दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या नोंदीसाठी 112A हे शेड्युल वापरावे लागणार आहे.
  • कलम 92CE (2A) अंतर्गत ट्रान्सफर केलेल्या रकमेवरील कराचे तपशील द्यावे लागणार आहेत.
    1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 या दरम्यान केलेली गुंतवणूक किंवा बिलं किंवा खर्च केलेल्या रकमेवरील कर कपातीच्या दाव्याचे तपशील द्यावे लागणार आहेत.

ITR-6 फॉर्म कसा भरू शकतो?

आयटीआर-6 फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने ई-फाईल करणं अनिवार्य आहे. यासोबत कोणतीही कागदपत्रे जोडायची आवश्यकता नाही. टीडीएस प्रमाणपत्रही जोडण्याची गरज नाही. पण रिटर्न फाईल करण्यापूर्वी संबंधित करदात्यांनी कर क्रेडिट स्टेमेंट फॉर्म 26AS (Tax Credit Statement Form 26AS) च्या मदतीने कापला गेलेला किंवा जमा झालेल्या टॅक्सची पडताळणी करून घेणं आवश्यक आहे.

ITR-6 फॉर्म FY 2021-22 भरण्याची शेवटची तारीख काय आहे?

आर्थिक वर्ष 2021-22 आणि असेसमेंट वर्ष 2022-23 साठी आयटीआर-6 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर, 2022 आहे. तर आर्थिक वर्ष 2020-21 आणि असेसमेंट वर्ष 2021-22 साठी सुधारित अंतिम तारीख 15 फेब्रुवारी, 2022 होती.