Ratan Tata shared a photo from his memory closet and the talk of his younger brother Jimmy Tata started: स्वयंपाकघरापासून आकाशापर्यंत, रस्त्यापासून समुद्रापर्यंत, ज्या टाटा कंपनीचा डंका वाजतो, त्याला यशाच्या शिखरावर नेण्याचे श्रेय रतन टाटा यांना जाते. आपल्या सामाजिक कार्यामुळे आणि सौम्य स्वभावामुळे रतन टाटा केवळ देशातच नाही तर जगभरात खूप लोकप्रिय आहेत. सर्वच उद्योजक त्यांना आपला आदर्श मानतात. सगळ्यांना रतन टाटांविषयी अनेक गोष्टी माहिती आहेत, पण त्यांचा धाकटा भाऊ जिमी टाटांविषयी फारच कमी जणांना माहिती आहे, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.
रतन टाटा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलतात. फार कमी लोक असतील ज्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे. अलिकडेच, त्याने त्याचा धाकटा भाऊ जिमी टाटासोबतचा बालपणीचा फोटो त्याच्या इंस्टाग्रॅम पेजवर शेअर केला. 1945 सालातल्या त्या चित्रात स्वत: रतन टाटा, त्यांचा भाऊ जिमी हे त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबत आहेत. हा फोटो शेअर करताना रतन टाटा यांनी एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे. टाटांच्या बोलण्यातून त्यांची भावना सहज लक्षात येते. रतन टाटा यांनी लिहिले, 'ते आनंदाचे दिवस होते. आमच्यामध्ये काहीही आले नाही.' त्यांच्या धाकट्या भावासोबतचा त्यांचा जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करताना रतन टाटा यांनी भावस्पर्श शब्द लिहिले.
जिमी टाटा कोण आहेत? (Who is Jimmy Tata?)
हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2022 नुसार, रतन टाटा यांच्याकडे 3 हजार 500 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांची गणना देशातील श्रीमंतांमध्ये केली जाते, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रतन टाटा यांचे धाकटे बंधू जिमी टाटा हे विस्मृतीचे जीवन जगतात. रतन टाटा यांचे बंधू अतिशय साधी जीवनशैली जगतात. टाटा आडनाव असलेले जिमी सामान्य माणसांसारखे जीवन जगतात. अनेकवेळा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनाही तो रतन टाटा यांचा भाऊ आहे हे कळत नाही.
2 खोल्यांचे घर, टीव्ही नाही, मोबाईल नाही (2 room house, no TV, no mobile)
जिमी नवल टाटा मुंबईतील कुलाबा येथे 2 बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतात. कुठलाही दिखावा न करता ते सामान्यपद्धतीने आपले आयुष्य घालवत आहे. त्याच्या घरात ना टीव्ही आहे, ना मोबाईल आहे. ते वृत्तपत्रातून देशाच्या आणि जगातील घडामोडी, बातम्या समजून घेतात, यासाठी ते टिव्ही किंवा मोबाईल वापरत नाहीत. मात्र रतन टाटा आणि टाटा सन्स विषयीच्या सर्व अपडेटसे ते ठेवतात. ते प्रवास करतानाही सोबत मोबाईल घेऊन जात नाही. जिमी हे टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. त्यांचे वडील नवल टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांना हे पद दिले आहे. नवल टाटा यांना सर रतनजी टाटा यांच्या पत्नी नवाजबाई यांनी दत्तक घेतले होते.
रतन टाटा प्रमाणेच जिमी टाटा यांनीदेखील लग्न केलेले नाही. निवृत्तीपूर्वी त्यांनी टाटासन्समध्ये विविध पदांवर काम केले, परंतु आता ते आपले जीवन साधेपणाने आणि अज्ञातवासात जगत आहेत. त्यांना स्क्वॉश खेळायला खूप आवडते, ते या खेळात चॅम्पियन आहेत, ही माहिती आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटद्वारे दिली आहे.
सध्या, रतन टाटा यांनी आपल्या भावासोबतचा फोटो शेअर केल्यावर नागरिकांचे लक्ष पुन्हा एकदा जिमी टाटा यांच्याकडे वळले आहे.