Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Yojana News: पीएम किसान योजनेत लाभार्थ्यीचा मृत्यू झाल्यास, 2 हजार रूपयांच्या हप्त्यासाठी कोण असणार पात्र?

PM Kisan Yojana

PM Yojana: पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने जमा होते. पण जर या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर यासाठी कोण असणार पात्र?

PM Yojana Update: पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) ही साधारणपणे 2018 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ देशात लाखो शेतकरी घेत आहेत. तसेच या योजने अतंर्गत देशात अनेक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 6000 हजार रूपये जमा होतात. ही रक्कम टप्प्या-टप्प्याने जमा केली जाते. पण या योजनेच्या लाभार्थीचा जर मृत्यू झाला तर या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, याबाबत पाहूयात. 

कोण असेल पात्र? (Who would be Eligible)

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा ((PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ जर एखादा शेतकरी घेत असेल, पण अचानक त्याचा मृत्यू झाला तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकऱ्याचा ‘वारस’ पात्र असेल. फक्त त्या वारसाने पोर्टलवर याबाबत स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच सरकारच्या वारसदार बाबतच्या सर्व अटी व नियमांच्या यादीत तो बसत असेल, तर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर तो लाभ वारसदार  घेवू शकतो.  

कशी करावी नोंदणी? (How to Register)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in भेट द्या. 'नवीन शेतकरी नोंदणी' या पर्यायावर क्लिक करा. मग त्यानंतर तुमचा आधार क्रमांक अपडेट करा व कॅप्चा कोड टाइप करा आणि तुमच्या राज्याची निवड करा. 

मदतीसाठी संपर्क (Contact for Help)

पीएम किसान योजनेसंबंधी काही अडचणा आल्यास, जसे की पीएम योजनेचा हप्ता जमा झाला नाही किंवा आणखी काही समस्या आली तर, शासनाव्दारे देण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबर-1555261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 वर काॅल करा. हे नंबर टोल फ्री आहेत. यासोबतच तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत ईमेल आयडीवर pmkisan-ict@gov.in वर देखील ईमेल करू शकता.