आधी कर्जाच्या भानगडीत कोणी जास्त पडायचं नाही. मात्र, वेळ बदलत गेली आणि आता कर्ज घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही. आजमितीस घरापासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात कर्जाने प्रवेश केला आहे. जो-तो आपल्यापरीने कर्ज काढतो अन् फेडतो. पण, त्यात थोडा दिलासा मिळाला तर कोणाला नको आहे. जेव्हा आपण बॅंक किंवा गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांमधून (NBFC) कर्ज घेतो.
तेव्हा ते ठरलेल्या मुदतीत फेडावे लागते. त्यामुळे कर्जाचे ओझे थोडे कमी करण्यासाठी तुम्ही त्यावर टॅक्स बेनिफिट मिळवू शकता. तसेच, आपण कर्ज कोणते घेत आहो, त्यानुसार त्याचे वेगवेगळे लाभ असू शकतात. याचबरोबर करदाते कर्जापोटी भरलेले व्याज आणि मूळ रकमेवर टॅक्स बेनिफिटचा दावा करु शकतात.
Table of contents [Show]
गृहकर्ज
गृहकर्ज घ्यायचे म्हटल्यावर, तुम्हाला 2 लाखांपर्यंत टॅक्स कपात मिळू शकते. तसेच, इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 सेक्शन 80EEA अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत भरलेल्या व्याजावर टॅक्स बेनिफिट मिळू शकतो. तर ज्यांच्याकडे स्वत:ची दोन घरे आहेत त्यांना देखील 2 लाखपर्यंत सेक्शन 24(b) अंतर्गत टॅक्स कपात मिळते. तुमच्याकडे मालमत्ता असून तुम्ही जर ती भाड्याने दिली आहे, अशा स्थितीत गृहकर्जाच्या संपूर्ण व्याजावर काही अटींनुसार कपात म्हणून दिले जाते. तसेच, सेक्शन 80C अंतर्गत गृहकर्जाच्या मूळ रकमेवर 1.5 लाखांपर्यंत टॅक्स कपात मिळू शकते.
व्यवसाय कर्ज
ज्यांनी व्यवसाय कर्ज घेतले आहे, ते मूळ रकमेवर भरलेल्या व्याजावर टॅक्स कपात मिळवू शकतात. इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 नुसार, हा पैसा नफ्यासारखा नसतो त्यामुळे त्यावर टॅक्स कपातीची अनुमती आहे. तसेच, उपकरणे व तंत्रज्ञान, मालमत्तेचे नूतणीकरण आणि बांधकामासाठी कर्ज काढल्यास, त्यावरही टॅक्स बेनिफिटचा दावा केला जाऊ शकतो.
शैक्षणिक कर्ज
इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 च्या 80E नुसार शैक्षणिक कर्जासाठी भरलेल्या व्याजावरील टॅक्स कपातीसाठी करदात्यांना बेनिफिट मिळतो. फक्त यासाठी तिच व्यक्ती दावा करु शकते, जिच्या नावावर कर्ज आहे. या बेनफिटचा लाभ करदात्यांना 8 वर्षांपर्यंत घेता येतो.
वाहन कर्ज
कार लक्झरी वस्तूंच्या कॅटेगरीत येत असल्याने वैयक्तिक वापराच्या वाहन खरेदीसाठी कार किंवा ऑटो घेणार्यांना कोणतेही टॅक्स बेनिफिट मिळत नाही. पण, एखादी व्यक्ती स्वयंरोजगार करत असेल आणि त्याला व्यावसायिक कारणासाठी वाहन घ्यायचे असल्यास, ती वाहने सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स कपात बेनिफिट मिळवू शकतात.
त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्ज घेऊन, त्यावर एकाचवेळी टॅक्स बेनिफिट मिळवू शकता. फक्त कर्ज घ्यायच्याआधी कुठे जास्त डिस्काउंट मिळतोय, हे पाहून कर्ज घेतल्यास तुमचा फायदा होईल.