कामावरून निवृत्त होण्यास 15 ते 20 वर्ष शिल्लक राहिल्यानंतर उतारवयात तुम्ही फक्त भविष्य निर्वाह निधीवर अवलंबून राहू शकत नाही. ही रक्कम कदाचित तुमच्या गरजा भागवणार नाही. जर तुम्हाला निवृत्तीनंतर काय होणार याची चिंता सतावत असेल तर तुम्ही आतापासूनच स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. म्युच्युअल फंड हा त्यासाठी एक पर्याय आहे. मात्र, योग्य फंड कोणता यामध्ये तुमचा गोंधळ उडू शकतो. भविष्यात होणारी महागाई ध्यानात घेऊन तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे.
निवृत्तीसाठी योग्य इक्विटी म्युच्युअल फंड
जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करु इच्छित असाल तर तुम्ही लार्ज कॅप फंडमध्ये निवृत्ती होईपर्यंत म्हणजे पुढचे १५ ते २० वर्षाच्या काळापर्यंत गुंतवणूक केली पाहिजे. लार्ज कॅपमध्ये सुद्धा अॅक्टिव्ह लार्ज कॅप फंडात नव्हे तर पॅसिव लार्ज कॅप इंडेक्स फंडात गुंतवणूक करायला हवी. निफ्टी किंवा सेक्सेक्सच्या इंटेक्स फंडातील योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करायला हवी. त्यामुळे तुमचा धोकाही कमी राहील.
मात्र, तुम्हाला सगळ्या पर्यायांत समान पद्धतीने गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही लार्ज कॅप, मीड कॅप आणि फ्लेक्सी कॅप फंडातही गुंतवणूक करू शकता. लार्ज कॅप फंडात गुंतवणूक करताना निफ्टी इंडेक्स फंडात गुंतवणूक केलेले योग्य राहील. एकूण गुंतवणूकीपैकी सुमारे ४० ते ५० टक्के गुंतवणूक इंडेक्स फंडात योग्य राहील. आणि बाकीची सुमारे ५० टक्के गुंतवणूक फ्लेक्सी कॅप, मीड कॅप आणि लार्ज कॅप फंडात केलेली फायद्याची ठरू शकते.
जर तुम्ही काही प्रमाणात धोका पत्करु शकता आणि जास्त परतावा मिळवण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही इक्विटी गुंतवणूकीला प्राधान्य द्यायला हवे. मात्र, असे करता जोखीम किती आहे याची माहिती घ्या. यासाठी तुम्ही 30 टक्के रक्कम निफ्टी 50 + निफ्टी नेक्स 50 इंडेक्स फंडात तर ३० ते ४० टक्के रक्कम फ्लेक्सी कॅप फंड आणि राहिलेली ३० ते ४० टक्के रक्कम मीड कॅप आणि स्मॉल कॅप फंडात गुंतवू शकता. तुम्ही पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करणारे नसता तेव्हा अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य गुंतवणूकीचा पर्याय म्हणून योग्य ठरतील.
सोल्युशन ओरिएंटेड फंड
सोल्युशन ओरिएंटेड फंड ही म्युच्युअल फंडाची एक वेगळी श्रेणी आहे. सेबीने या फंडाची श्रेणी बाजारात आणली आहे. निवृत्तीचे योग्य नियोजन करण्यासाठी ही श्रेणी आहे. गुंतवणूकदाराच्या वयानुसार योग्य फंड निवडण्याचे स्वातंत्र्य फंड व्यवस्थापकाला यामध्ये असते. या फंडासाठी पाच वर्षाचा लॉक-इन पिरियड आहे. मात्र, जर यातील तुम्ही निवडलेल्या फंडातून पाहिजे तसा परतावा मिळाला नाही. तसेच लॉक इन पिरियड असल्याने तुम्हाला पाच वर्ष फंड दुसरीकडे हलवताही येणार नाही. त्यामुळे या फंडात गुंतवणूक योग्य ठरणार नाही. तुम्ही वर दिलेल्या इक्विटी फंडात गुंतवणूक केलेले योग्य राहिल.