Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD Interest Rate : जाणून घ्या कोणत्या बँकाचा एफडी दर आहे सगळ्यात जास्त

FD Interest Rate

Highest FD Rate : मुदत ठेवींच्या (Fixed Deposit) व्याजदरात गेल्या काही महिन्यांपासुन प्रचंड वाढ झालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पासून ते एचडीएफसी बँकेपर्यंत, सर्व मोठ मोठ्या बँका मुदत ठेवींवर सुमारे 7 टक्के व्याज देत आहेत. तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे एफडी मध्ये गुंतवायचे असेल तर, कोणती बँक किती टक्के व्याज देत (Highest FD Rate) आहे? जाणून घ्या.

FD Interest Rate :  आरबीआयने रेपो दर (Repo Rate) कायम ठेवल्यानंतरही एफडीच्या व्याजदरांवर परिणाम दिसुन येत आहे. बँकांमध्ये मुदत ठेवी (FD) करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी 2023 हे वर्ष खूप चांगले आहे. कारण बँका मे 2022 पासून FD व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत (Bank FD Rate Hike).

एसबीआय बँक (SBI BANK)

एसबीआय बँकेत दोन आणि तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर ग्राहकांना 7 टक्के व्याजदर मिळू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांना दोन आणि तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी 0.5 टक्के अतिरिक्त व्याजदर मिळू शकतो.

एचडीएफसी बँक (HDFC BANK)

एचडीएफसी बँक 15 ते 18 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 7.10 टक्के व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना 15 ते 18 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 7.6 टक्के व्याजदर देते. तसेच 18 महिने ते 10 वर्षे मुदतींच्या ठेवींसाठी बँका 7 टक्के व्याजदर देतात. तर समान कालावधीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्के व्याजदर दिला जाऊ शकतो. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवर लागू  आहेत.

आयसीआयसीआय बँक (ICICI BANK)

आयसीआयसीआय बँक 15 महिने ते दोन वर्षांच्या कालावधीत मुदत ठेवींसाठी 7.1 टक्के व्याजदर देते. तर ज्येष्ठ नागरिकांना समान कालावधीकरीता 7.6 टक्के व्याजदर देते. तसेच एक, दोन आणि पाच वर्षांच्या मुदतीच्या ठेवींसाठी बँका 7 टक्के व्याजदर देते. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवर लागू आहेत.

कोटक महिंद्रा बँक (KOTAK MAHINDRA BANK)

कोटक महिंद्रा बँक 390 दिवस आणि 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीसाठी 7.2 टक्के व्याजदर देते. खाजगी क्षेत्रातील बँका 365 दिवस ते 389 दिवसांच्या दरम्यानच्या मुदतीच्या एफडीसाठी 7 टक्के व्याजदर देते. कोटक महिंद्रा बँक दोन आणि तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीसाठी 7 टक्के व्याजदर देते. तर ज्येष्ठ नागरिकांना समान कालावधीसाठी 0.5 टक्के अतिरिक्त व्याजदर मिळणार आहे.

येस बँक (YES BANK)

येस बँक मध्ये 15 महिने ते 36 महिन्यांच्या कालावधीतील एफडीसाठी 7.5 टक्के व्याजदर दिला जातो. एक वर्ष ते 15 महिन्यांच्या मुदतीच्या एफडीसाठी खाजगी बँक 7.25 टक्के व्याजदर देते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जाऊ शकतो. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींसाठी उपलब्ध आहे.