Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flexi Cap Funds: टॉप फ्लेक्सी कॅप फंड योजना; 10 वर्षातील गुंतवणुकीतून मिळाला कोट्यवधीचा परतावा

Top Flexi cap funds

Image Source : www.economictimes.indiatimes.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे अनेक पर्याय गुंतवणुकदारांपुढे आहेत. त्यापैकी फ्लेक्सी कॅप फंड हा देखील एक चांगला पर्याय आहे. (Top Flexi cap funds) मागील दहा वर्षांचा विचार करता काही ठराविक योजनांनी गुंतवणुकदारांना मालामाल केले. टॉप फ्लेक्सी कॅप योजना कोणत्या आहेत त्या आपण पाहूया.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी फ्लेक्सी कॅप फंड योजना हा देखील एक चांगला पर्याय आहे. (Top Flexi cap funds) मागील दहा वर्षांचा विचार केला असता काही योजनांनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 

फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडच्या काही योजनांचा मागील 10 वर्षांतील सरासरी परतावा 17% पर्यंत राहिला आहे. Association of Mutual Funds in India (AMFI) च्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली आहे.

जर एखाद्या व्यक्तीची 25 हजार रुपयांची एसआयपी (SIP) असती तर कमीत कमी व्याजदरासह दहा वर्षामध्ये 79 लाख रुपये राशी जमा झाली असती. तर सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेतून 1.13 कोटी रुपये राशी जमा झाली असती. सर्वाधिक परतावा देणाऱ्या आठ योजना कोणत्या ते पाहू.

फ्लेक्सी कॅप फंड म्हणजे काय? (What is flexi cap fund)

सर्वप्रथम फ्लेक्सी कॅप फंड म्हणजे काय ते समजून घेऊ. (Top Flexi cap funds) ज्या फंड योजना लार्ज, मीड आणि स्मॉल भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात. कमीत कमी 65% गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे फ्लेक्सी कॅप योजनांना अनिवार्य आहे. अशा फंड्सला फ्लेस्की कॅप फंड म्हणतात.

क्वांट फ्लेक्सी कॅप फंड (Quant Flexi Cap Fund)

क्वांट फ्लेक्सी कॅप फंडच्या डायरेक्ट योजनेने मागील दहा वर्षात 22.60% परतावा दिला आहे. तर रेग्युलर योजनेने 21.69% परतावा दिला आहे. हा फंड निफ्टी 500 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे. 

पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड 

या योजनेच्या डायरेक्ट योजनेने 19.46% परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनने 18.61% इतका परतावा दिला. ही योजना NIFTY 500 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे. 

JM फ्लेक्सी कॅप फंड 

JM फ्लेक्सी कॅप फंडच्या डायरेक्ट योजनेतून मागील दहा वर्षात सरासरी 18.36% परतावा मिळाला. तर रेग्युलर योजनेतून 17.19% परतावा मिळाला. ही योजना S&P BSE 500 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे. 

आदित्य बिर्ला सन लाइफ फ्लेक्सी कॅप फंड 

या फ्लेक्सी कॅप योजनेच्या डायरेक्ट योजनेने 18.01% इतका परतावा दिला. तर रेग्युलर योजनांतील गुंतवणुकीने 16.92% परतावा दिला. ही योजना NIFTY 500 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे. 

एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड 

एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनमधून मागील दहा वर्षात 17.33% परतावा मिळाला. तर रेग्युलर योजनेतून 16.48% इतका परतावा मिळाला. ही योजना NIFTY 500 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे. 

कोटक फ्लेक्सी कॅप फंड

या फंडच्या डायरेक्ट योजनेने 17.64% परतावा दिला. तर रेग्युलर योजनांनी 16.5% परतावा दिला. ही योजना NIFTY 500 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे. 

SBI फ्लेक्सी कॅप फंड 

या योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने 17.59% तर रेग्युलर योजनेने 16.53% परतावा मागील दहा वर्षांच्या कालावधीत दिला. ही योजना S&P BSE 500 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे. 

फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड 

या फंडाच्या डायरेक्ट योजनेतून 17.01% तर रेग्युलर योजनेतून मागील दहा वर्षात 15.98% परतावा मिळाला. ही योजना NIFTY 500 टोटल रिटर्न इंडेक्सवर आधारित आहे.