Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड गुंतवणूकदार सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतात? जाणून घ्या सविस्तर

Mutual Fund Investment

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आहे. फेब्रुवारीमध्ये भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचे एकूण AUM 39.46 लाख कोटी रुपये होती. फेब्रुवारी 2013 मध्ये हा आकडा फक्त 8.14 लाख कोटी रुपये होता.10 वर्षात हा उद्योग 5 पट वाढला आहे. जाणून घेऊया गुंतवणूकदार कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात.

म्युच्युअल फंड प्रवाहात प्रचंड तेजी दिसून येत आहे. AMFI ने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण AUM (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) 39.46 लाख कोटी रुपये होती. फेब्रुवारी 2013 मध्ये हा आकडा फक्त 8.14 लाख कोटी रुपये होता. 10 वर्षात हा उद्योग 5 पट वाढला आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे का वाढला व ते सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतात? ते जाणून घेऊया.  

इक्विटीमध्ये 76% अधिक गुंतवणूक (76% More Investment In Equity)

व्हॅल्यू रिसर्चच्या अहवालानुसार, म्युच्युअल फंड गुंतवणूकदार इक्विटी आधारित योजनांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करत आहेत. फेब्रुवारी 2023 च्या अहवालानुसार, एकूण गुंतवणुकीपैकी 76% रक्कम इक्विटी फंडांमध्ये गुंतवण्यात आली आहे. यानंतर डेट फंडांचा क्रमांक लागतो. 12% गुंतवणूकदारांनी डेट फंडांच्या विविध स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे.

लिक्विड फंडात सर्वात कमी गुंतवणूक (Lowest Investment In Liquid Funds)

इक्विटी आणि डेटनंतर ईटीएफ आणि फंड ऑफ फंड म्हणजेच ‘एफओएफ’चा (Fund of Fund) क्रमांक येतो. जवळपास 5% गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणूक केली आहे. 4% गुंतवणूकदारांनी बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक केली तर 3% गुंतवणूकदारांनी कमीत कमी लिक्विड आणि मनी मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे.

गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडाची क्रेझ वाढली आहे

ICICI सिक्युरिटीजच्या संशोधन अहवालानुसार, FY19 आणि FY22 दरम्यान घरगुती बचतीमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा वाटा 2.4% वरून 6%पर्यंत वाढला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये, म्युच्युअल फंड उद्योगाची AUM 22.20 लाख कोटी होती ते काही वर्षातच वर्षांत दुप्पट होऊन सुमारे 40 लाख कोटी रुपये झाले आहे.

व्यक्तिगत मालमत्तेवर आधारीत म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक स्कीमचे प्रकार 

  • इक्विटी स्कीम 
  • डेब्ट स्कीम (कर्जावर आधारित)
  • हायब्रिड स्कीम 

गुंतवणूक करण्यापूर्वी विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. त्याचबरोबर गुंतवणुकीच्या वेळी तुमची गुंतवणुकीची उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

(Source- www.zeebiz.com )