Wheat production: बदलत्या वातावरणामुळे पिकांवर अनेक परिणाम होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी त्याचबरोबर कापूस या सर्व पिकांना वेगवेगळ्या वातावरणाची गरज असते. थंडी वाढल्याने हरभरा आणि गहू या पिकांसाठी अनुकूल असे वातावरण तयार झाले आहेत. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात वाढ (Increase in wheat production) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील हंगामात गव्हाच्या किमती भरपूर वाढलेल्या आपण बघितल्या. गव्हाच्या किमतीबरोबर आटा आणि चपातीच्या किमती सुद्धा भरपूर वाढलेल्या आहेत. गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारकडून सुद्धा भरपूर प्रयत्न केले जात आहे. तर जाणून घेऊया यावर्षीची गव्हाची आवक (Wheat arrivals) आणि किमती?
या वर्षी गहू लागवड क्षेत्र किती? (How much wheat planting area this year?)
2022- 23 मध्ये गव्हाचा पेरा वाढला असल्याने गव्हाच्या उत्पादनात वाढ (Increase in wheat production) होणार अशी माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेकडून (News Agency) मिळाली आहे. या वर्षी गहू लागवड क्षेत्र 332 लाख हेक्टर असून गव्हाचे उत्पादन 112 दशलक्ष टनांवर जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गहू उत्पादन 106 दशलक्ष टनांच्या घरात होते. म्हणजेच या वर्षी 6 टनपेक्षा जास्त गहू उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
नवीन वाणांचा वापर..
गव्हाच्या नवीन वाणांवर संशोधन करून कृषी तज्ञांनी ते वाण शेतकऱ्यांना पुरवले त्यामुळे यावर्षी गव्हाचा पेरा आणि उत्पादन दोन्ही वाढले असल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले आहे. भारतात (India) एकाच हंगामात गव्हाचे पीक घेतले जाते, ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये (October to December) गव्हाची लागवड केली जाते आणि मार्चनंतर काढणीला सुरवात होते. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी लागवडीत एक टक्क्याने वाढ नोंदवली आहे.
सरकार निर्यात बंदी हटवणार का? (Will the government lift the export ban?)
मार्चपासून नवीन गव्हाची आवक सुरू होणार, या वर्षी गव्हाची आवक वाढल्याने सरकार गव्हावरची निर्यात बंदी (Export ban) उठवण्याचा निर्णय घेऊ शकतील असाही अंदाज वर्तवला जात आहे. मार्च एप्रिलमध्ये निर्यात बंदी हटवण्यात येऊ शकते. परंतु याबाबत अजूनही अधिकृत माहितीसमोर आलेली नाही. अन्न महागाई निर्देशांक (Food Inflation Index) सतत वाढत आहे या निर्णयामुळे ती थोडी कमी होण्यास मदत होऊ शकते.