Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp Spamming : व्हॉट्सअॅपवरही 95% युजर्स स्पॅमिंगमुळे त्रस्त

WhatsApp Spamming

व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या हिरवी टिक असलेल्या मेसेजेसमुळे मोठ्या संख्येने वापरकर्ते बळी ठरत आहेत. यासाठी सरकार आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) काय करत आहे? ते पाहूया.

तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एखाद्या कंपनीकडून इनबॉक्स मेसेज आला तर तुम्ही ते गांभीर्याने घेत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की हा प्रमोशनल मेसेज आहे. पण त्याच पद्धतीने व्हॉट्सअॅपवर मेसेज (WhatsApp Spamming) येऊ लागले तर चिंतेची बाब आहे. कारण व्हॉट्सअॅपला (WhatsApp) लोकांच्या आयुष्यात प्रायव्हेट स्थान आहे. अनेकदा युजर्सच्या व्हॉट्सअॅपवर (WhatsApp Business) हिरवी टिक असलेल्या ब्रँडचे मेसेज येतात. हा व्हॉट्सअॅपचा एक नवीन बिझनेस फॉर्म्युला आहे ज्यातून कंपनी मोठी कमाई करते परंतु वापरकर्त्यांसाठी ते स्पॅमपेक्षा अधिक काही नसतं.

95% वापरकर्ते स्पॅमचे बळी 

व्हॉट्सअॅपने स्वीकारलेल्या या नवीन व्यवसाय धोरणामुळे, सुमारे 95 टक्के वापरकर्ते दररोज स्पॅमचे बळी ठरतात. व्हॉट्सअॅप सोशल मेसेजिंग साइटऐवजी व्हर्च्युअल शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बदलत असल्याबद्दल अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकल सर्कलने गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार, 95 टक्के व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना दररोज स्पॅम मेसेज मिळतात. सर्वेक्षणात 11,000 भारतीयांचा समावेश होता, त्यापैकी 44 टक्के लोकांनी स्वीकारले की त्यांना दररोज एक ते तीन स्पॅम मेसेज येतात. त्याच वेळी, 22 टक्के भारतीय वापरकर्त्यांनी सांगितले की त्यांना दिवसाला 8 किंवा अधिक स्पॅम मेसेज मिळतात.

ट्रायने यावर तोडगा काढावा

EaseMyTrip सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणतात की व्हॉट्सअॅप स्पॅमिंग ही एक गंभीर समस्या आहे आणि ती काळाबरोबर वाढत आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकार आणि व्हॉट्सअॅप दोन्हीही प्रयत्न करत आहेत. ते पुढे म्हणाले की टेलीकॉम आणि व्हॉट्सअॅपसह ट्राय लवकरच यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा आहे.

2018 मध्ये आले नवे अपडेट

व्हॉट्सअॅपने हे नवीन अपडेट 2018 मध्ये आणले होते, जेव्हा त्यांनी WhatsApp बिझनेस लाँच केले होते. या अपडेटमुळे ब्रँड्सना व्हॉट्सअॅपवर थेट ग्राहकांशी संपर्क साधता येईल. या अपडेटनंतर व्हॉट्सअॅप सर्व ब्रँडचे आवडते बनले.

व्हॉट्सअॅपसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ 

फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल साइट्ससाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. WhatsApp चे जगभरात 50 दशलक्ष वापरकर्ते आहेत, त्यापैकी 15 दशलक्ष वापरकर्ते भारतीय आहेत. Facebook (Meta) ने 2014 मध्ये जगातील सर्वात मोठे मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp 16 अब्ज डॉलर्सना विकत घेतले.