Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp Payment : व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही तुमचे बँक बॅलन्स तपासू शकता, प्रक्रिया घ्या जाणून

WhatsApp Payment

व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना युपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करते. याद्वारे UPI च्या मदतीने तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासोबतच तुम्हाला शिल्लक रक्कम किती? तेही समजू शकते. व्हॉट्सअॅप पेमेंट (WhatsApp Payment) कसे अँक्टिव्ह करायचे? ते जाणून घेऊया.

आजकाल जवळजवळ प्रत्येकजण व्हॉट्सअॅप वापरतो. हे प्रामुख्याने चॅटिंगसाठी वापरले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? की चॅटिंग व्यतिरिक्त याचे अनेक उपयोग आहेत. व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांना अनेक प्रकारच्या सेवा पुरवते, त्यापैकी एक म्हणजे व्हॉट्सअॅप पेमेंट (WhatsApp Payment). याद्वारे तुम्ही एखाद्याला पैसे ट्रान्सफर करू शकता तसेच तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना युपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करते. याद्वारे UPI च्या मदतीने तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासोबतच तुम्हाला शिल्लक रक्कम किती? तेही समजू शकते. व्हॉट्सअॅप पेमेंट (WhatsApp Payment) कसे अँक्टिव्ह करायचे? ते जाणून घेऊया.

WhatsApp पेमेंट्स असे अँक्टिव्ह करा

WhatsApp पेमेंट्स युपीआयवर आधारित इतर पेमेंट अॅप्सप्रमाणे काम करतात. तुमच्या फोनवर WhatsApp पेमेंट अँक्टिव्ह करण्यासाठी, WhatsApp उघडा आणि स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा. यानंतर 'पेमेंट'चा पर्याय निवडा. येथे 'Add Payment Method' वर क्लिक करा. यानंतर बँक तुमच्या मोबाईल नंबरची पडताळणी करेल. येथे बँकांची यादी तुमच्या समोर येईल. यामधून तुमचे बँक खाते निवडा आणि 'Done' वर क्लिक करा. आता तुमची नोंदणी झाली आहे.

बँक बॅलन्स कसे तपासायचे?

व्हॉट्सअॅपद्वारे तुमच्या बँक खात्यातील रक्कम तपासण्यासाठी, व्हॉट्सअॅप उघडल्यानंतर, सेटिंग्जमध्ये जा आणि More या पर्यायावर टॅप करा. Pay here निवडा आणि बँक खात्यावर क्लिक करा. त्यानंतर View Balance पर्याय निवडा आणि तुमचा UPI पिन टाका. यानंतर, तुमच्या खात्यात उपलब्ध असलेली रक्कम तुमच्या मोबाइल स्क्रीनवर दिसेल.

या गोष्टी लक्षात ठेवा

व्हॉट्सअॅप तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल नंबरद्वारे पैसे भरण्याची सुविधा देते. प्रायमरी बँक सेटअप दरम्यान, वापरकर्त्यांना फक्त पेमेंट अटी आणि गोपनीयता धोरण स्वीकारण्यास सांगितले जाते. व्हॉट्सअॅपच्या लिस्टमध्ये कोणत्याही बँकेचे नाव दिसत नसेल, तर तुमची बँक अद्याप त्याच्याशी जोडलेली नसण्याची शक्यता आहे. याशिवाय सुरक्षेसाठी तुम्ही नेहमी व्हॉट्सअॅपची नवीनतम आवृत्ती वापरावी.