तज्ज्ञांच्या मते, कोणताही व्यवसाय अचूक माहितीवर बर्याच अंशी आधारित असतो. जितकी सूक्ष्म माहिती मिळेल, तितका फायदा व्यवसायात होतो. या बाबतीतही ब्लॉकचेनला महत्त्व प्राप्त होते. ब्लॉकचेनमुळे व्यवसायासाठी आवश्यक असलेली माहिती त्वरित उपलब्ध होते.
* आणखी एक महत्त्वपूर्ण बाब अशी की, ब्लॉकचेनवर शेअरविषयक माहिती पारदर्शक पद्धतीने मिळू शकते आणि त्या ठिकाणी नोंदविलेले व्यवहार कधीच बदलता येऊ शकत नाहीत. ऑर्डर, पेमेन्ट, अकाउंट याव्यतिरिक्त ब्लॉकचेनच्या आधारे अन्य गोष्टींबद्दलही माहिती मिळविता येऊ शकते. या माध्यमातून सभासद एन्ड-टू-एन्ड व्यवहाराचीही तपासणी करू शकतात.
* ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आभासी चलनाच्या वापरासाठी आज आपल्याला माहीत झाले असले तरी ते आजचे नाही. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उल्लेख 1991 मध्ये स्टुअर्ट हबर आणि डब्ल्यू स्कॉट स्टोर्नेटो यांनी केला होता. या तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश डिजिटल डॉक्युमेन्ट्स ‘टाइमस्टॅम्प’ करणे हा होता. याच कारणामुळे डिजिटल करन्सीमध्ये कोणतीही छेडछाड करता येत नाही. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल करन्सी मात्र आली ती 2009 मध्ये सतोशी नाकामोतो यांनी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बिटकॉइनची निर्मिती केली.
* या सर्व पार्श्वभूमीवर, भारतातील डिजिटल चलन कसे असणार याची माहिती घेणे महत्त्वाचे ठरेल. भारतात बिटकॉइन किंवा अन्य कोणत्याही डिजिटल चलनाला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. अर्थात तरीही या आभासी चलनांच्या माध्यमातून देवाणघेवाण केली जाते. भारतात आता जे डिजिटल चलन जारी केले जाईल, ते थेट रिझर्व्ह बँक या आपल्या मध्यवर्ती बँकेकडून जारी केले जाईल. म्हणूनच त्याला सीबीडीसी (सेंट्रल बँक डिजिटल करन्सी) असे म्हटले गेले आहे. यालाच आपण ‘डिजिटल रुपया’ही म्हणू शकतो.
* सीबीडीसी किंवा डिजिटल रुपया हे एक वैध चलन असेल. हे चलन कागदी नोटांप्रमाणेच असेल आणि कोणत्याही कागदी नोटांशी त्याची अदलाबदल केली जाऊ शकेल. म्हणजेच, दोन हजारांची डिजिटल नोट देऊन कागदी नोट घेता येईल.
* डिजिटल रुपया अन्य व्हर्च्युअल चलनांच्या तुलनेत खूपच वेगळा असेल. एक म्हणजे हे चलन रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येईल. म्हणजेच त्याला सरकारची अधिमान्यता असेल. डिजिटल रुपयाचे रूपांतर सॉवरेन करन्सीमध्ये करता येऊ शकेल.
* मान्यता नसलेल्या डिजिटल चलनाचे रूपांतर अशा प्रकारे नेहमीच्या नोटांमध्ये करता येत नाही.
* डिजिटल रुपयाच्या स्वरूपात केलेली गुंतवणूक अन्य आभासी चलनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत सुरक्षित मानली जात आहे.
Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Home
पर्सनल फायनान्स
कसा असेल डिजिटल रुपया?

भारतातील डिजिटल चलन कसे असणार याची माहिती घेणे महत्त्वाचे ठरेल
संबंधित पोस्ट
संबंधित पोस्ट
-
राज्यात ८१ हजार कोटींची गुंतवणूक; ४० हजार रोजगारनिर्मिती होणार
20 Sep, 2025 14:53 237 -
आयकर परतावा (ITR): कसा भरावा आणि उशिरा भरल्यास किती दंड?
24 Sep, 2025 14:44 46 -
विमा सखी योजना | Finance | MahaMoney
01 Sep, 2025 13:58 276 -
वेगवेगळ्या PF खात्यांमुळे गोंधळलात का? आता PF एका क्लिकमध्ये मर्ज करा फक्त 2 मिनिटांत! |
11 Sep, 2025 13:51 977 -
डिजिटल ID कार्ड | True ID V Card | Finance | MahaMoney
11 Sep, 2025 13:34 976
आपला ब्राऊझिंगचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी आमच्या कुकीज् धोरणाला सहमती द्या.
कुकीज् धोरण