“Good luck doesn't last forever but good insurance does” अर्थात “नशीब प्रत्येकवेळी साथ देईलच, असं नाही. परंतु चांगला विमा (इन्शुरन्स) नक्कीच क्षतिपूर्ती (नुकसान-भरपाई) कव्हर करेल”. मात्र हे तेव्हाच शक्य असेल, जेव्हा “Utmost Good Faith” म्हणजे इन्शुरर आणि इन्शुअर्ड (पॉलिसीधारक) यांच्यामध्ये असलेल्या “विश्वासाच्या कराराचे” दोघांकडूनही पालन केले गेले असेल. पॉलिसीधारकाने देखील इन्शुरन्स कंपनीला स्वतःविषयीच्या सर्व फॅक्ट्स, तथ्ये, माहिती अचूकपणे आणि प्रामाणिकपणे उघड केलेली असली पाहिजे. जर इन्शुरन्स कंपनीला जोखमीबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीत, किंवा भौतिक चुकीचे सादरीकरण (material misrepresentation) केले गेले असेल तर, इन्शुरर क्लेम नाकारू देखील शकतो.
लाईफ इन्शुरन्स कंपनी सर्व प्रकारचे मृत्यू जरी कव्हर करत असली, तरीदेखील काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये क्लेम नाकारण्याचा अधिकार देखील इन्शुररला आहे. पॉलिसी-टर्मच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला एकरक्कमी डेथ-क्लेम बेनिफिट्स दिले जातात. मात्र, भारतातील टर्म-इन्शुरन्स प्लॅन्स मध्ये समाविष्ट (included) असलेल्या प्रकारांबद्दल माहिती आणि इन्शुरन्स पॉलिसीच्या अटी / शर्तीबद्दल जागृती असलेली केव्हाही योग्य ठरेल.
Table of contents [Show]
- हत्या (Murder)
- आत्महत्या (Suicide)
- नशेमुळे मृत्यू आल्यास (Death due to Intoxication)
- बाळंतपणात मृत्यू आल्यास (Death due to Pregnancy and Childbirth)
- जुन्या आजारपणामुळे मृत्यू आल्यास (Death due to the pre-existing health condition)
- अनैसर्गिक आपत्ती / धोकादायक क्रीडाप्रकार (Unnatural Calamities / Dangerous Sports)
हत्या (Murder)
Homicide अर्थात नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीनेच पॉलिसीधारकाची हत्या केली असेल, तर इन्शुरर डेथ-क्लेम नाकारू शकतो. हत्येचे आरोप वगळले जाऊन माननीय न्यायालय जोपर्यंत नॉमिनीची निर्दोष मुक्तता करीत नाही, तोवर इन्शुरन्स कंपनी क्लेमची रक्कम देणार नाही. या व्यतिरिक्त पॉलिसीधारक स्वतःच गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतला असेल, आणि त्याचा मृत्यू झाला, तरी देखील इन्शुरर क्लेम नाकारतो. पॉलिसीधारकाचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यामध्ये झाला असल्यास डेथ-बेनिफिट्स दिले जात नाहीत.
आत्महत्या (Suicide)
जर पॉलिसीधारकाने पॉलिसी खरेदी केल्यापासूनच्या पहिल्या 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये आत्महत्या केली असल्यास इन्शुरन्स कंपनी क्लेमची रक्कम देत नाही. याला “Suicide Clause” म्हटले जाते.इन्शुरन्स कंपन्या पॉलिसी-टर्मच्या दुसऱ्या वर्षापासून आत्महत्येच्या मृत्यूसाठी कव्हरेज देतात.
नशेमुळे मृत्यू आल्यास (Death due to Intoxication)
पॉलिसीधारकाचा मृत्यू दारूच्या प्रभावाखाली वाहन चालवताना किंवा अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) अतिसेवनामुळे झाला, तर अशा परिस्थितीत, इन्शुरन्स कंपनी क्लेम नाकारते. भविष्यात संभाव्य डेथ-क्लेम नाकारला जाऊ नये, असे वाटत असल्यास पॉलिसीधारकाने पॉलिसी खरेदी करीत असतानाच पॉलिसी-प्रपोजल फॉर्ममध्येच स्वतःच्या ड्रिंकिंग हॅबिट्स किंवा ड्रग्स-सेवनाचा इतिहास उघड करणे महत्त्वाचे आहे.
बाळंतपणात मृत्यू आल्यास (Death due to Pregnancy and Childbirth)
टर्म इन्शुरन्स पॉलिसीधारकाचा गर्भधारणा-संबंधित समस्या किंवा बाळंतपणामुळे मृत्यू झाल्यास इन्शुरर नॉमिनीला वचन दिलेली डेथ-क्लेमची रक्कम देत नाही.
जुन्या आजारपणामुळे मृत्यू आल्यास (Death due to the pre-existing health condition)
पॉलिसीधारकाचा मृत्यू एखाद्या पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय स्थितीमुळे झाला असेल तर त्यांना टर्म इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्यापूर्वी आली असेल आणि त्यांनी खुलासा केला नसेल. तर अशा परिस्थितीत, किंवा एड्स सारख्या लैंगिक संक्रमित रोगांमुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास इन्शुरर क्लेम नाकारतो.
अनैसर्गिक आपत्ती / धोकादायक क्रीडाप्रकार (Unnatural Calamities / Dangerous Sports)
युद्ध, बंड, उठाव, नागरी गोंधळ (Civil War), दंगल, लष्करी उठाव, यांसारख्या अनैसर्गिक आपत्तींमुळे मृत्यू झाल्यास किंवा स्कायडायव्हिंग, ट्रेकिंग, माउंटनिंग, पॅराग्लायडिंग सारख्या तुलनेने धोकादायक (Risky) खेळांमधील सहभागामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू ओढावल्यास इन्शुरन्स कंपनी नॉमिनीचा केलेला क्लेम नाकारते. जीवितासोबत धोका अंतर्भत असलेल्या खेळांची आवड असल्यास किंवा असा खेळ व्यवसायाचा भाग असल्यास पॉलिसीधारकाने पॉलिसी-कव्हर खरेदी करीत असतानाच इन्शुरन्स कंपनीला त्याबद्दल कळविणे आवश्यक आहे.
मृत्यू हे सत्य आहे आणि तो आकस्मित देखील आहे. तेव्हा आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता म्हणजे “टर्म इन्शुरन्स प्लॅन” खरेदी करणे. आणि म्हणूनच इन्शुरन्स पॉलिसी डॉक्युमेंट्स मध्ये नमूद केलेल्या अटी आणि अपवाद (conditions and exclusions) यांची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. पॉलिसीधारकाला आणि त्याच्या कुटुंबियांना देखील.