ATM Transaction: प्रगत तंत्रज्ञानामुळे हल्ली सगळ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आपल्या घाई गडबडीचा काळात आपल्याला पैसे काढायचे असतील तर आपण लगेच एटीएमकडे(ATM) धाव घेतो. पण बऱ्याच वेळा एटीएममधून(ATM) पैसे काढताना अनेकदा फाटलेल्या नोटा येतात.आता या फाटलेल्या नोटा आल्यानंतर काय करायचं? असा प्रश्न पडतो. दुकानात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी अशा नोटा घेण्यास आपल्याला सऱ्हास नकार दिला जातो. अशावेळी घाबरून जाण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे ही अशा फाटलेल्या नोटा असतील, तर तुम्ही त्या सहज बँकेत बदलून घेऊ शकता आणि त्यासाठी कोणतेही चार्जेस(Without Charges) तुम्हाला द्यावे लागणार नाहीत.
रिझर्व्ह बँकेचा यासंदर्भात काय नियम आहे?
जुलै 2016 बदलून देण्यासाठी नकार दिला, तर बँकेला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. हा नियम सर्व बँकांच्या ब्रांचसाठी लागू होतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(RBI) ATM मधून आलेल्या फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी काही नियम(Rules) बनवून दिले आहेत. या नियमांनुसार, कोणतीही बँक एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलून देण्यासाठी नकार देऊ शकत नाही. या सहजपणे बदलता येऊ शकतात. यासाठी कोणत्याही वैतागवाण्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.
- रिझर्व्ह बँकेच्या(RBI) नियमानुसार, जर ATM मधून खराब नोट आली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी बँकेची असते
- नोटेमध्ये कोणतीही खराबी असेल, तर त्याचा तपास बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून केला जावा
- याशिवाय जर नोटेवर सीरियल नंबर(Serial Number), महात्मा गांधींचा वॉटरमार्क(Mahatma Gandhi Watermark) आणि गव्हर्नरची सही(Governor Signature) दिसत असेल, तर बँकेला कोणत्याही परिस्थितीत ती नोट बदलून द्यावी लागेल
- रिझर्व्ह बँक वेळोवेळी फाटलेल्या नोटांसंदर्भात सर्कुलर(Circular) जारी करत असते अशाप्रकारच्या नोटा तुम्ही बँकेच्या कोणत्याही ब्रांचमध्ये(Branch) किंवा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात(RBI Office) जाऊन बदलून घेऊ शकता
- मात्र या नोटा बदलण्यासाठीची एक मर्यादा आहे. RBI च्या नियमांनुसार, एक व्यक्ती एका वेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलू शकतो
- त्याशिवाय नोटांची एकूण किंमत 5000 रुपयांपेक्षा जास्त असू नये
- अतिशय वाईट प्रकारे जळलेल्या, तुकडे झालेल्या नोटा ग्राहकांना बदलून देता येणार नाहीत
- अशा अतिशय खराब असणाऱ्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात
बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी काय करावं लागेल?
- ज्या बँकेच्या एटीएममधून तुम्ही पैसे काढले आहेत त्याच बँकेतून तुम्हाला या नोटा बदलता येणार आहेत
- त्या बँकेत जाऊन तुम्हाला तेथे एक अर्ज लिहून त्या संदर्भातील माहिती लिहावी लागेल
- त्या अर्जासोबत एटीएममधून काढण्यात आलेली ट्रान्झेक्शन स्लिपही जोडावी लागेल जर स्लिप काढली नसेल, तर मोबाईलवर आलेल्या ट्रान्झेक्शन डिटेल्सची(Transaction details) माहिती बँकेला द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला नोटा बँकेतून बदलून दिल्या जातील