Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: चिंतामुक्त रिटायरमेंटची पंचसुत्री; आत्ताच मनावर घ्या अन्यथा उतारवयात होईल पश्चाताप

Retirement Planning

निवृत्ती हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही रिटायरमेंट टाळू शकत नाही. नोकरी करताना महिन्याला पगाराच्या स्वरुपात निश्चित उत्पन्न मिळते. मात्र, निवृत्तीनंतर तुमची आवक एकदम बंद होते. तर निवृत्तीनंतर येणारं प्रत्येक वर्ष महागाईच्या रुपात जास्त खर्च घेऊन येते. तसेच तुमच्या निवृत्तीनंतर इतरही अनेक गरजा असू शकतात.

Retirement Planning: निवृत्ती हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही रिटायरमेंट टाळू शकत नाही. नोकरी करताना महिन्याला पगाराच्या स्वरुपात निश्चित उत्पन्न मिळत असते. मात्र, निवृत्तीनंतर तुमची आवक एकदम बंद होते. निवृत्तीनंतर येणारं प्रत्येक वर्ष महागाईच्या रुपात जास्त खर्च घेऊन येते. तसेच निवृत्तीनंतर तुमच्या इतरही अनेक गरजा असू शकतात.

महागाईचा दर दरवर्षी वाढत असताना वैद्यकीय खर्चातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे जर तुम्ही आणखी 20 वर्षानंतर जर निवृत्त होणार असाल तर आज जेवढा खर्च होते त्याच्या कितीतरी पट जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे निवृत्तीचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे. उतारवयात कोणापुढेही हात पसरवण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर तरुण वयातच रिटायरमेंट प्लॅनिंगला लागा. जसं कार लोन, होम लोन, पर्सनल लोन तुमच्या विविध गरजांसाठी आता मिळू शकतं तसं निवृत्तीसाठी लोन असा पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे सध्याच्या उत्पन्नातून निवृत्तीसाठी बचत आणि गुंतवणूक करा. 

निवृत्तीचं प्लॅनिंग करण्यासाठी स्मार्ट टिप्स

1) निवृत्तीला एक आर्थिक ध्येय समजा 

तरुण वयात निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं असेल हा विचार सहसा केला जात नाही. पुढचे पुढे पाहू असा निष्काळजीपणा दिसून येतो. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनचा समावेश तुमच्या आर्थिक ध्येयामध्ये करा. कारण, ही गोष्ट तुम्ही टाळू शकत नाही. एक दिवस ती वेळ येणारच. त्यामुळे बचत आणि गुंतवणूक करताना रिटायरमेंट फंड ध्यानात घेऊनच निर्णय घ्या. 

2) निवृत्ती प्लॅनिंगला लवकरात लवकर सुरुवात करा 

निवृत्तीला आणखी खूप वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे आत्ता काळजी करायची गरज नाही, हा विचार डोक्यातून काढा. अशी विचारधारा तुम्हाला आर्थिकदृष्या पंगू बनवू शकते. जेवढे जास्त वर्ष गुंतवणूक कराल तेवढा चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल. त्यामुळे लवकर सुरुवात करण्यास पर्याय नाही. थोडीशी रक्कमही दीर्घकाळात मोठा परतावा मिळवून देते. 

3) विविध ठिकाणी गुंतवणूक करा

पारंपरिक विचारसरणी असलेले नागरिक निवृत्तीसाठी पब्लिक प्रोविडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अशा योजनांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करतात. मात्र, पहिला पगार झाल्यापासून निवृत्तीसाठी म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक जास्त फायद्याची ठरू शकते. पारंपरिक गुंतवणुकीचे पर्याय महागाईचा भस्मासुराला हरवू शकत नाहीत. त्यामुळे निवृत्तीनंतर पुरेसा फंड साठणार नाही. महागाईच्या माऱ्यापुढे ही रक्कम अपुरी पडेल. 

4) SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा 

तरुण असताना जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते. तुमचे वय कमी असते. कमावण्यासाठी भरपूर वर्ष शिल्लक असतात. त्यामुळे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात संपत्ती निर्माण होईल. अनेक वर्ष गुंतवणूक करून बाजारातील चढ-उतार पाहिल्यानंतर चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. निवृत्ती हे दीर्घकालीन ध्येयामध्ये येते. त्यामुळे निवृत्तीसाठीची एसआयपी फायद्याची ठरेल.

उदाहरणार्थ, तुम्ही वयाच्या 25 वर्षी इक्विटी फंड योजनेत दरमहा 5,000 रुपये एसआयपी सुरू केली तर निवृत्तीपर्यंत म्हणजेच 35 वर्षानंतर 21 लाख रुपये ठेव जमा होईल. 15% परताव्याचा दर गृहित धरल्यास तुमच्याकडे निवृत्तीसाठी साडेपाच कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड जमा होईल. 

5) SIP टॉप-अप करा

तरुण वयापासून निवृत्तीसाठी एसआयपी सुरू करत असाल तर दरवर्षी एसआयपी टॉप-अप करू शकता. कारण, कमावत्या वयात तुमचे उत्पन्न वाढत जाईल. त्यानुसार गुंतवणूकही वाढायला हवी. वरील उदाहरण विचारात घेतले तर 5000 SIP चा दरवर्षी 5% जरी टॉपअप केला तरी परतावा 8 कोटींवर पोहचेल. 10% टॉपअप केला तर 13 कोटींपेक्षा जास्त फंड जमा होईल. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे दरवर्षी काही टक्के टॉप-अप करून तुम्ही अधिक सुरक्षा मिळवू शकता. निवृत्तीचे नियोजन लवकर सुरू करा आणि शिस्त बाळगा, मग उतारवयात नक्कीच पश्चाताप होणार नाही.