Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How Much Salary to Buy Home: 25 लाखांचे घर खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असायला हवा? जाणून घ्या गणित

How Much Salary to Buy Home

Image Source : www.myjar.app

How Much Salary to Buy Home: स्वतःच्या घराचे स्वप्न गृहकर्जाच्या (Home Loan)मदतीने अनेकजण पूर्ण करतात. हेच गृहकर्ज घेताना वार्षिक उत्पन्नात पगाराचा घटक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्हाला मिळणाऱ्या वार्षिक पगारावर तुमच्या गृहकर्जाची रक्कम अवलंबून असते. जर तुम्ही 25 लाखांचे घर खरेदी करणार असाल, तर तुमचा पगार किती असायला हवा आणि त्यातून किती ईमआय (EMI) जाईल, याचे गणित समजून घ्या.

स्वतःचे घर खरेदी करावे की नाही, यावर वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. पहिल्या मतप्रवाहात स्वतःचे घर असावे अशा मताचे लोक येतात, तर दुसऱ्या मतप्रवाहात घर खरेदी करण्याऐवजी भाड्याने राहावे या विचाराचे लोक असतात. यासंदर्भात प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो. ज्या लोकांना स्वतःचे घर खरेदी करण्याची इच्छा असते, ते लोकं गृहकर्जाच्या (Home Loan) मदतीने गृहस्वप्न साकार करतात. घर खरेदी करताना एकरकमी एवढी मोठी रक्कम कोणाकडेही उपलब्ध नसते. त्यामुळे गृहकर्ज हा एक उत्तम पर्याय ठरतो.

गृहकर्ज देताना बँका तुमचे वार्षिक उत्पन्न किंवा वार्षिक पगार पाहतात. त्या आकड्यांवर आणि तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे तुमचा पगार हा अतिशय महत्त्वाचा घटक घर खरेदी करताना विचारात घेतला जातो. साधारण 25 लाखांचे घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पगार असायला हवा? त्यातून किती रुपयांचा ईएमआय बँकेत भरला जाऊ शकतो, याचे गणित समजून घेऊयात.

पगार किती असावा?

तुम्हाला मिळणाऱ्या वार्षिक पगारावर तुमच्या गृहकर्जाची रक्कम अवलंबून असते. जर तुमचा पगार कमी असेल, तर तुम्हाला कमी रकमेचे कर्ज मिळते. घर खरेदी करताना अर्थतज्ज्ञांच्या मते 20 टक्के रकमेचे डाऊनपेमेंट करावे, तर उर्वरित 80 टक्के रकमेचे बँकेकडून कर्ज घ्यावे. बँका देखील उमेदवाराला 80 टक्क्यांपर्यंत गृहकर्ज उपलब्ध करून देतात. अर्थतज्ज्ञांच्या मते गृहकर्जाचा हप्ता हा तुमच्या पगाराच्या केवळ 20 ते 30 टक्के इतकाच हवा. त्यापेक्षा जास्त नसावा.

सध्या गृहकर्जावर 8.5 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे. किमान 20 वर्षासाठी खरेदीदार गृहकर्ज घेतो.  या हिशोबाने तुम्हाला जर 25 लाखांचे घर खरेदी करायचे असेल, तर 8.5 टक्के व्याजदरानुसार  तुम्हाला मासिक 21,600 रुपयांचा ईमआय भरावा लागणार आहे.  याचा अर्थ तुमच्या मासिक पगारातून 21,600 रुपये कापले जाणार आहेत. ही रक्कम सोडता तुमचा मासिक घरघुती खर्च, वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणूका , बचत या सर्व घटकांचा विचार करणे गरजेचे आहे. वर सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या पगाराच्या केवळ 20 ते 30 टक्के ईमआय असेल, तर तुम्हाला मासिक 70 ते 80 हजार पगार असायला हवा.

घर खरेदी करताना बँका फक्त एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा विचार न करता कौटुंबिक उत्पन्नाचा विचार करून गृहकर्ज उपलब्ध करून देतात. यामध्ये जोडीदाराचे उत्पन्न देखील गणले जाते.  त्यामुळे तुम्हाला 70 ते 80 हजार पगार नसला आणि तुमचा जोडीदार वर्किंग असेल, तरीही तुम्ही 25 लाखांचे घर खरेदी करू शकता. मात्र अशा परिस्थितीत ईमआय आणि बचतीचा ताळमेळ घालता यायला हवा.

घराचा ईएमआय कमी करता येऊ शकतो का?

चालू व्याजदर आणि कालावधीनुसार घराचा ईमआय निश्चित केला जातो. मात्र तुम्हाला तुमचा ईएमआय कमी करायचा असेल, तर तुम्ही कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवू शकता. गृहकर्ज 20 वर्षापर्यंत घेतले जाते. मात्र तो कालावधी वाढवून जर तुम्ही 30 वर्ष केला, तर तुमचा ईमआय कमी होण्यासाठी मदत होईल. याशिवाय ज्या बँकेत गृहकर्जाचा व्याजदर कमी आहे, त्या बँकेत तुम्ही तुमचे कर्ज ट्रान्सफर करू शकता.

Source: hindi.news18.com