Home Loan After Retirement: स्वत:चं घर असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने धडपड करत असतो. काही जणांची उमद्या काळात ही उच्छा पूर्ण होते. काही जण आयुष्याची पन्नाशी उलटली तरी त्यांची घर घेण्याची उमेद संपलेली नसते.
घर घेणाऱ्यांमध्ये किंवा बँकेकडून सहसा टार्गेट केलेल्यांमध्ये 30 ते 50 वयोगटातील व्यक्तींचा समावेश असतो. या गटासाठी बऱ्याच सुविधा आणि संधी सुद्धा उपलब्ध असतात. पण पन्नाशीच्या पुढील किंवा निवृत्ती घेतलेल्या लोकांसाठी घर घेण्यासंदर्भात किंवा कर्ज घेण्यासाठी काही स्कीम आहेत, असे ऐकिवात नाही. पण खरंच नोकरीतून निवृत्त झालेल्या लोकांना होम मिळते का? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल आणि याचे उत्तर होय असे आहे. निवृत्त झालेल्या व्यक्तीला सुद्धा होमलोन मिळू शकते. पण याचे काही नियम आणि अटी आहेत. त्या नियमांना अधीन राहून ज्येष्ठ नागरिकांना त्याबद्दल आपण अधिक सविस्तर जाणून घेऊ.
Table of contents [Show]
कर्ज घेण्याची पात्रता
साधारणत: होमलोनच्या ईएमआयचे स्ट्रक्चर असे सेट केलेले असते की, कर्जदाराचे वय हे 70 ते 75 वर्षांपेक्षा अधिक नसावे. पण कर्ज देणाऱ्या बँका / संस्था 80 वर्षापर्यंत कर्ज फेडण्याचा कालावधी देतात. अशा केसेसमध्ये रिपेमेंटचा कालावधी हा 60 वर्षानंतर ठरवला जातो.
यामध्ये दुसरी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे क्रेडिट स्कोअर. जर कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त आहे आणि यापूर्वी त्या कर्जदाराने एकही ईएमआय चुकवलेला नाही. अशा अर्जदाराला निवृत्तीनंतरही कर्ज मिळू शकते.
रिपेमेंटचा कालावधी
अर्जदाराचा किंवा कर्जदाराचा रिपेमेंटचा कालावधी हा त्या व्यक्तीच्या वयाच्या 70 ते 75 वर्षांपेक्षा जास्त नसावा.म्हणजे निवृत्तीनंतर संबधित व्यक्तीने घेतलेले कर्ज फेडण्याचा कालावधी 15 वर्षांचा असतो. काही बँका हा कालावधी वाढवून कर्जदाराच्या 80 व्या वयापर्यंत वाढवून देतात.
सह-अर्जदारामुळे मिळू शकतो अधिक लाभ
ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या होमलोनसाठी बँका बहुतेक करून सह-अर्जदाराची मागणी करतात. सह-अर्जदार असण्याचे बरेच लाभ आहेत. जसे की, लोन अॅप्रूवल आणि कर्जाची रक्कम वाढवून मिळू शकते. तसेच कर्जाचा कालावधी देखील वाढवून मिळू शकतो. एक चांगला सह-अर्जदार असेल तर निवृत्त झालेल्या व्यक्तींना होमलोन मिळण्यास मदत होऊ शकते.
ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणारा व्याजदर
नियमित वयोगटातील लोकांच्या तुलनेत निवृत्त झालेल्यांना जो व्याजदर दिला जातो तो नियमित व्याजदरापेक्षा जास्त असतो. त्यामुळे कर्जासाठी अर्ज करताना त्या बँका नियमित आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या दराने कर्ज देतात, याची माहिती घेणे गरजेचे आहे. सध्या होमलोनचे व्याजदर किमान 8.4 टक्क्यांपासून सुरू होतात. त्याचे दर त्यापेक्षाही कमी-जास्त असू शकतात. तसेच त्याचा रिपेमेंटचा कालावधी, क्रेडिट स्कोअर याचेही रेट वेगवेगळे असू शकतात.
तसे पाहिले तर निवृत्तीनंतरचे जीवन हे आनंदाने जगण्याचा काळ असतो. पण यासाठी स्वत:चे घर असणे गरजेचे आहे आणि निवृत्तीनंतर स्वत:चे घर घेणे. हे सर्वांनाच शक्य नाही. पण ते अशक्य सुद्धा नाही. पण त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या नियमांची आणि अटींची पूर्तता केली तर होमलोनसाठी कर्ज मिळू शकते.