Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR वेळेत न भरल्यास किती दंड होतो? करपात्र उत्पन्न नसेल तर नियम काय?

ITR filling

आर्थिक वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. जर ही तारीख तुम्ही विसरलात तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. 31 जुलै नंतर ITR भरत असाल तर किती दंड होतो? करपात्र उत्पन्न नसेल तर दंड होतो का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Penalty for missing ITR Filing: आर्थिक वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. जर ही तारीख तुम्ही विसरलात तर तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो. आयकर विभागाद्वारे आयटीआर वेळेन न भरणाऱ्यांवर दंडात्मक कारावाई केली जाते. या लेखात जाणून घेऊया ITR भरण्यास उशीर केल्यास करपात्र आणि करपात्र नसणाऱ्या नागरिकांवर काय कारवाई होऊ शकते.

किती दंड होऊ शकतो?

आर्थिक वर्ष 2019-20 पर्यंत मुदतीच्या आत आयटीआर न भरल्यास 10 हजार रुपयापर्यंत दंड आकारला जात होता. मात्र, आर्थिक वर्ष 2020-21 (मूल्यांकन वर्ष 2021-22) पासून दंडाची रक्कम निम्म्याने कमी केली आहे. जर 31 जुलैनंतर आयटीआर फाइल करत असाल तर आता 5 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

करपात्र उत्पन्न नसेल तर दंड होतो का?

व्यक्तीचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर ITR भरण्यास दिरंगाई झाल्यास दंड आकारला जात नाही. (Penalty for missing ITR Filing) म्हणजेच 31 जुलै नंतरही अशा व्यक्तींनी आयटीआर भरल्यास दंड घेतला जाणार नाही. दरम्यान, या नियमासही काही अपवाद आहे. आयकर विभागाच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती मिळू शकते.

अल्प करदात्यांना किती दंड भरावा लागेल?

एका आर्थिक वर्षात उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नसेल आणि अत्यंत अल्प प्रमाणात कर भरावा लागत असेल तर तुम्हाला 1 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. अल्प करदात्यांनी 31 डिसेंबर या तारखेनंतरही रिटर्न फाइल केला तरी 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. 

penalty-for-not-filing-itr-on-time-1.png

दंडाची रक्कम निम्म्याने कमी का केली?

2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने आयटीआर फाइल करण्यासाठीची मुदत 3 महिन्यांनी कमी केली. आयटीआर भरण्याचा कालावधी कमी केल्याने सरकारने दंडाची रक्कमही निम्म्याने खाली आणली. (Penalty for missing ITR Filing) आयकर कायदा 1961 च्या कलम 234F यासंबंधी बदल करण्यात आले. त्यानुसार 10 हजार दंडाची रक्कम 5 हजार रुपयांवर आणली. 2019-20 पर्यंत नागरिकांना आर्थिक वर्ष संपेपर्यंत आयटीआर भरण्याची मुदत दिली जात होती. म्हणजेच 31 मार्चपर्यंत आयटीआर फाइल करता येत होता. मात्र, मुदत संपल्यानंतर 10 हजार रुपये दंड आकारण्यात येत होता.

31 जुलै नंतरही आयटीआर भरता येईल का?

31 जुलै आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर आयटीआर भरत असाल तर दंड भरावा लागेल. ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर सरकारकडून मुदतवाढ मिळाली तरच आयटीआर भरता येईल. 

आर्थिक वर्ष 2019-20 पर्यंत ITR भरण्यास उशीर झाल्यास दोन प्रकारे दंड घेतला जात होता. 31 डिसेंबर पर्यंत भरत असाल तर 5 हजार रुपये आणि 1 जानेवारी ते 31 मार्च या दरम्यान आयटीआर भरत असाल तर 10 हजार रुपये दंड होता. हा नियम आता रद्द करण्यात आला असून 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबरच्या आत रिटर्न फाइल करत असाल तर 5 हजार रुपये पर्यंत दंड होऊ शकतो.