Green Homes: प्रत्येकालाच स्वतःच्या स्वप्नातील घर(Dream Home) सत्यात उतरवायचे असते. बऱ्याच वेळा हे ड्रीम होम आपण कुठेतरी पाहिलेलं असतं. आजही ड्रीम होममध्ये निसर्गाचा(Nature) समावेश कायम आहे. भरपूर झाडं(Plants & Trees), आजूबाजूला हिरवाई, मुबलक प्रकाश, सूर्याची कोवळी किरण(Sun light) असं बरच काही आपण आपल्या ड्रीम होममध्ये पाहत असतो आणि ज्यावेळी वेळ येते त्यावेळी याच गोष्टींची अपेक्षा करतो. सध्या घर बांधताना विचारात घेतली जाणारी ग्रीन होम(Green Home) संकल्पना अतिशय गाजतीये. ही संकल्पना नक्की काय आहे, चला या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
ग्रीन होम संकल्पना नक्की काय आहे?
या संकल्पनेत निसर्गाने दिलेल्या गोष्टींचा वापर करतात. म्हणजेच हवा(Air), सूर्यप्रकाश(Sunlight) ही निसर्गाने दिलेली देणगी घरांसाठी मुबलक वापरायची आणि प्रदूषण कमीत कमी करायचे असा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे. पण वेगवेगळ्या लोकांनी याच्या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या व्याख्या केल्याचेही पाहायला मिळत आहे. ग्रीन होम्स(Green Home) ही आपल्या नेहमीच्या बांधकामापेक्षा शाश्वत टिकणाऱ्या साधनांच्या मदतीने वापरलेली आणि कमीतकमी ऊर्जा(Energy) वापरून बांधलेली घरे असतात.
ग्रीन होम्सचं महत्त्व का वाढतंय?
उन्हाळा आला की वीज भरपूर वापरली जाते त्यामुळे वीजेचं बिल(Light Bill) देखील वाढतं. घरांची दारं-खिडक्या बंद करून एसी(AC) सुरु केले जातात, यामुळे खर्चही वाढतो. मात्र ग्रीन होम्समध्ये नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर केला जातो. या नव्या यंत्रणेमध्ये सौर ऊर्जेचा(Solar Energy) वापर करुन तयार झालेली वीज मोठ्या प्रमाणात वापरली जाते. रेन वॉटर हार्वेस्टींग(Rain water Harvesting) करुन भूजल पातळी वाढवण्यात येते. पावसाचे पाणी वाचवून त्याचा उपयोग दैनंदिन वापरासाठी करता येतो. ज्यामुळे तुमच्या वीजेच्या बिलावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यात 20 ते 30 टक्के बचत होऊ शकते.
आरोग्यासाठी फायदा होतो का?
नैसर्गिक साधनांचा जास्त वापर केल्यामुळे याठिकाणी हवेशीर आणि उत्तम प्रकाश व्यवस्थेची योजना केलेली असते. नैसर्गिक हवेचा उपयोग, हवा शुद्धीकरणासाठी नैसर्गिक उपायांचा वापर, झाडांचा अधिकाधिक वापर, खिडक्यांमधून प्रकाश जास्त यावा अशी केलेली योजना, सौर चिमणी, एक्झॉस्ट फॅनचा वापर(Exhaust Fan Use), नैसर्गिक रंगांचा(Natural Color) वापर यामुळे तुमचे राहणीमान आरोग्यवर्धक राहण्यास मदत होते.
इको फ्रेंडली वस्तूंचा जास्त वापर
हल्ली निसर्गाला वाचवायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच इको फ्रेंडली(Eco Friendly) वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात करायला हवा. या वस्तूंचा वापर घरामध्ये केल्यामुळे तुमची जीवनपद्धती निसर्गाशी एकदम पूरक होते. सोप्या भाषेत सांगायचं तर, ग्रीन होम्समध्ये बांबूचा वापर(Bamboo), क्ले प्लॅस्टर(Clay Plaster), इको फ्रेंडली फर्निचर(Eco Friendly Furniture), बांबूचे फर्निचर(Bamboo Furniture), फिक्या रंगाची अंतर्गत सजावट केल्यामुळे एकूण जीवनशैली सुधारण्यास मदत होते व निसर्गाला हानी ही होत नाही.