Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ट्रीपला जाताना पैसे वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या!

Best way to Save Money while Travelling

Best way to Save Money while Travelling : फिरायला जाताना अगोदरच खूप खर्च झालेला असतो. त्यात प्रत्यक्ष ट्रीपमध्ये फिरताना वारेमाप खर्च होतो. त्यावर नियंत्रण राहत नाही. मग अशावेळी खर्चावर ताबा ठेवायचा कसा? चला तर जाणून घेऊ काही बेसिक टीप्स.

फिरण्याचा ट्रिप प्लॅन तर तयार आहे; खूप ठिकाणी फिरायचं आहे. शॉपिंग करायची आहे. वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे; पण बजेट कमी आहे. अशावेळी अतिरिक्त खर्च कसा टाळायचा? प्रवासात होणाऱ्या खर्चावर नियंत्रण कसे ठेवायचे? प्रवासादरम्यान येणारा खर्च कसा कमी करायचा? याची माहिती आपण घेणार आहोत.

तुमचा ट्रॅव्हल मोड कोणता? What is your mode of travel?

फिरायला जाण्याच्या साधनावर प्रवासाचा खर्च अवलंबून असतो. प्रवासाचे उपलब्ध असणारे वेगवेगळे पर्याय योग्यरित्या निवडून खर्च आटोक्यात आणता येऊ शकेल. रेल्वेसेवा, विमानसेवा, बससेवा, खासगी वाहन यांपैकी बजेटनुसार एखादा सोयीस्कर मार्ग निवडला तर खर्चाची आखणी करणे सोपे होते. ट्रिप प्लॅनच्या एक महिना आधीच तिकिटचे बुकिंग केले तर खर्च नियंत्रणात राहू शकेल. रेल्वेचा प्रवास अत्यंत स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो. त्यामुळे प्रवासाचा खर्च टाळायचा असेल तर रेल्वेचा प्रवास उपयुक्त ठरू शकेल. खडतर रस्त्याचा लांबचा पल्ला नसल्यास बाईकचा प्रवास उपयुक्त ठरू शकतो. निश्चितस्थळी पोहचल्यानंतर तेथील कमी अंतराचा प्रवास करायचा असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा.

आलिशान हॉटेल की हॉस्टेल? A luxury hotel or hostel?

कुठेही फिरायला जायचा प्लॅन असेल तर राहण्याची व्यवस्था हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. राहण्याच्या सोयीनुसार बजेटचा आकडा कमी-जास्त होऊ शकतो. जितके मोठे हॉटेल, जितकी चांगली सुविधा तेवढा खर्च जास्त. हॉटेलमधील रूममध्ये पुरवलेल्या सोयीनुसार खर्च आकारला जातो. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी ट्रीपला जायचं असेल तर राहण्यासाठी मोठे आलिशान हॉटेल्स, कॉटेज निवडण्यापेक्षा बोर्डिंग, बैठी घर किंवा आश्रमांची निवड करावी. अशा ठिकाणी सुद्धा राहण्याची उत्तम व्यवस्था केलेली असते. शिवाय, येथील रेट्स इतर ठिकाणांपेक्षा कमी असतात. हॉटेल्सपेक्षा हॉस्टेल्सची निवड केली तर निसर्गाचा आनंदही घेता येईल आणि खर्चही आटोक्यात राहील.


रेस्टॉरंटमध्ये खायचं की स्वतःच बनवायचं? Home Made or Restaurant Food?

फिरायला गेल्यानंतर तेथील वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही. पण अशावेळी खर्चाचा होणारा अपव्यय टाळायचा असेल तर घरातून प्रवासासाठी निघताना काही पदार्थ सोबत ठेवावे. ज्यावेळी भूक लागेल त्यावेळी त्या पदार्थांची मदत होऊ शकेल. पिण्याच्या पाण्यासाठी नेहमीच मिनरल वॉटर घेण्यापेक्षा शुद्ध पाण्याची सोय असेल तर ते प्यावे किंवा पाणी उकळून घ्यावे. राहण्याच्या काही ठिकाणी जेवणाची सोय केलेली असते. शिवाय, तेथे जेवण बनवण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध असते. म्हणूनच, होणारा अतिरिक्त खर्च नियंत्रणात ठेवायचा असेल तर भूक लागल्यानंतर कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारा एखादा पदार्थ तुम्ही बनवू शकता. यामुळे अन्नाची तसेच खर्चाची बचत होऊ शकेल.

शॉपिंग कुठून आणि कशाची करू? Where to do Shopping? 

ट्रीपला गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या वस्तू पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर स्वतःसाठी किंवा इतरांसाठी गिफ्ट घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अशावेळी स्थानिकांकडून किंवा इंटरनेटद्वारे चांगल्या आणि स्वस्त  वस्तू कुठून मिळतात याची माहिती घ्यावी. एखादी आकर्षक दुर्मिळरीत्या मिळणारी वस्तू जर आढळली तरच त्या वस्तूची खरेदी करावी. खूप मोठ्या आणि महागड्या दुकानात न जाता स्ट्रीट शॉपिंगवर लक्ष केंद्रित करावे. जितके शक्य असेल तेवढी किंमत कमी करण्याचा प्रयत्न करावा, यामुळे खर्च कमी होऊ शकतो तसेच वस्तू खरेदी केल्याचे समाधान मिळू शकते.

तुमची पेमेंट मेथड कोणती? What is your Payment Method?

हव्या त्या ठिकाणी पेमेंट करताना कोणत्या माध्यमाचा वापर करावा याचा विचार करणेही गरजेचे आहे. कॅश की ऑनलाईन पेमेंट हे ठरवून योग्य करंसीनुसार पेमेंट करणे आवश्यक आहे. सध्या ऑनलाइन पेमेंट पद्धतीला जास्त प्रमाणात महत्त्व लाभले आहे. ऑनलाइन पेमेंट पद्धतीचे योग्य ज्ञान असेल तर आणि ट्रीपच्या ठिकाणी ऑनलाइन पेमेंटची सोय उपलब्ध असेल तर पेमेंटचा हा मार्ग योग्य ठरू शकतो. ऑनलाइन पेमेंट केले तर सोबत असलेल्या कॅशची बचत होऊ शकते. एखाद्या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध नसेल तर अडचण येऊ नये म्हणून कॅशच्या रूपात पैसे सोबत असायला पाहिजेत.

अशाप्रकारे या टिप्सचा विचार केला तर प्रवासात होणारा अतिरिक्त खर्च टाळता येऊ शकतो.