प्रवासाचा छंद जोपासायचा असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? सोलो, ॲडव्हेंचर, फॅमिली, फ्रेंड्स किंवा कपल ट्रिप असेल तर नेमक्या कोणत्या क्रमाने विचार करून प्रवास आणि ट्रिप सोपी-मजेशीर होऊ शकते? तुमच्या मनातील अशा सर्व प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आम्ही काही सोप्या टीप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यातून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील.
Table of contents [Show]
ट्रिप प्लॅनिंग (Trip Planning)
कुठेही फिरायला जाण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक आहे. योग्य हवामान, फिरण्याचे ठिकाण, कॉलेज-ऑफिसच्या सुट्ट्या, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसची उपलब्धता, हवामानानुसार कपड्यांची सोय, खाण्याच्या पदार्थांची यादी, राहण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींचे प्लॅनिंग फिरायला जाण्याआधी करणे गरजेचे आहे. समुद्रकिनारा, निसर्गस्थळ किंवा पर्वतरांगा यापैकी कोणती ट्रिप आयोजित करायची आहे याचा विचार ऋतूनुसार करावा. दिवसांच्या संख्येनुसार एक्स्ट्रा कपडे, हवामानाला अनुसरून लोशन्स, ब्लॅंकेट्स, आरोग्याच्या समस्या असतील तर औषधं आणि गरज पडली तर मेडिसिन बॉक्स सोबत ठेवावा. अशा पद्धतीने प्लॅनिंग केल्याने ट्रिप आणि प्रवास सुखकर होऊ शकतो.
पिकनिकचे बजेट (Budget for Trip)
फिरायला जाण्याचं प्लॅनिंग असेल तर ट्रिपचे बजेट अर्थात एकूण खर्च ठरवणे महत्त्वाचे आहे. फिरण्याचे ठिकाण, त्यानुसार ट्रान्सपोर्टची सोय, हॉटेल्सचे बुकिंग, खाण्याची सोय या गोष्टींची व्यवस्था बजेट ठरवून पूर्ण करता येईल. बजेट जितके असेल त्याप्रमाणे हॉटेल्स आणि ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ठरवता येईल. फ्लाईटच्या तिकिटाचा कमी-जास्त होणारा दर लक्षात घेऊन बजेटची आखणी केली पाहिजे. बजेटच्या अंदाजावरून किती दिवसांची ट्रिप प्लॅन करायची तसेच कोणत्या ठिकाणाची करायची हे निश्चित करता येईल.
बेस्ट ट्रान्सपोर्टेशन (Best Transportation)
फिरायला जाण्यासाठी ट्रान्सपोर्टचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. ट्रिपचे ठिकाण किती दूर आहे आणि किती दिवसांचे प्लॅनिंग आहे, त्यानुसार वाहनाची निवड करणे योग्य ठरु शकेल. 3 दिवसांची ट्रिप असेल तर प्रवासाचा वेळ वाचण्यासाठी फ्लाईटचा पर्याय योग्य ठरु शकतो. तसेच प्रायव्हेट ट्रॅव्हल बस, ट्रेन किंवा प्रायव्हेट टूव्हीलर- फोरव्हीलरचा प्रवास ही उपयुक्त ठरु शकतो. ट्रिपच्या ठिकाणानुसार ट्रान्सपोर्टच्या पर्यायाची निवड करून एक महिन्याआधी बुकिंग करणे अत्यावश्यक आहे. असे केल्याने येनवेळी वाढणारा तिकिटांचा अवाजवी खर्च टाळता येऊ शकतो.
गुगलबाबावर शोधाशोध (Picnic Research)
ट्रिपच्या ठिकाणाची माहिती काढून त्याचा अंदाज बांधणे गरजेचे आहे. त्या ठिकाणाची जुजबी माहिती, नकाशा, राहण्याचे विविध हॉटेल्स, गरज लागल्यास हॉस्पिटल्स, खाण्याची उत्तम जागा, फिरण्याचे ठिकाण आणि योग्य वेळ, तेथील महत्त्वाचे संपर्क क्रमांक, आकर्षक वस्तूंची खरेदी करण्यासाठी उपलब्ध असलेली बाजारपेठ-दुकानं या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्या. तसेच कोणत्या ठिकाणी जाणे धोक्याचे ठरू शकते या गोष्टीचे संशोधन करून माहिती मिळवणे आवश्यक आहे. यामुळे फिरतांना अडचणी न येता ट्रिपचा आनंद घेता येईल.
मोटीव्ह ऑफ ट्रिप (Motive of Trip)
निवडलेले ठिकाण का योग्य आहे? त्याच ठिकाणी ट्रीपला का जायचं आहे? या गोष्टीची स्पष्ट कल्पना तुमच्यासमोर असायला पाहिजे. ट्रिपचे ध्येय लक्षात घेऊन हव्या त्या ठिकाणी फिरायला सुरुवात करायची. असे केल्यामुळे प्लॅनिंगनुसार यादी केलेल्या आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक ठिकाणाला भेट देणे शक्य होऊ शकेल. मोटोव्हचा विचार करून उपलब्ध असलेल्या स्कुबा डायव्हिंग, बोटिंग, सफारी राईड्सची हौस पूर्ण केली तर ट्रिप यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            