रिअल इस्टेटचा गुंतवणूकीसाठी अनेक जण विचार करत असतात. यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात. यात गुंतवणूकीसाठी रिटचा पर्याय देखील उपलब्ध असतो. यामध्ये रिट चा पर्याय निवडावा की स्वत:ची प्रॉपर्टी खरेदी करावी, असा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यादृष्टीने याचा विचार करूया.
Table of contents [Show]
गुंतवणूकीसाठी पैसे किती आहेत?
तुमच्याकडे गुंतवनणूकीसाठी पैसे किती आहेत, हा REIT vs Own property याविषयी निवड करताना महत्वाचा मुद्दा ठरतो. स्वत:ची प्रॉपर्टी घेण्यासाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असणे आवश्यक आहे. किवा कर्जाचा पर्याय देखील उपलब्ध असतो. अशा वेळी कर्ज, त्यावरील व्याज आणि मिळणारा परतावा याचा विचार करावा लागतो. याचवेळी रिट (Real Estate Investment Trust) मध्ये गुंतवणूक’ करताना तुमच्याकडे मोठी रक्कम असण्याची आआवश्यकता नाही. 10 ते 15 हजार इतकी रक्कम सुद्धा रिटच्या माध्यमातून तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवनणूक करण्याची संधी देते. सेबीने सुरुवातीला 2 लाख रुपये असणारी ही रक्कम हळूहळू कमी केली आहे. यामुळे तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी किती पैसे उपलब्ध आहेत, हा REIT vs Own property याविषयी निर्णय घेण्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. यादृष्टीने रिट आकर्षक दिसते.
स्वत: सर्व ठिकाणी लक्ष देऊ शकता का?
जेव्हा तुम्ही रिअल इस्टेटमधील गुंतवनणूकीसाठी स्वतची प्रॉपर्टी घेण्याचा विचार करता तेव्हा तेव्हा ती सगळी प्रक्रिया तुम्हाला स्वत:ला पार पाडावी लागते. जागा शोधणे, भविष्यात किमती कशा वाढतील, भाड्याचे उत्पन्न किती मिळेल याचा विचार करावा लागतो. मेंटेनस ठेवावा लागतो. पण REIT (ESTATE INVESTMENT TRUST REIT) मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा गुंतवणूकदारांकडून पैसे उभारून रिटेल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली जाते. यावर सेबीचे देखील नियंत्रण असते. यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी किती वेळ आहे यादृष्टीने देखील REIT हा योग्य पर्याय ठरताना दिसतो.
फार पैसे नसणे आणि स्वत:ला सखोल अभ्यास करायला न लागणे या दृष्टीने रिट अधिक योग्य पर्याय दिसत असल्याचे आपण बघितले. याचप्रमाणे स्वतची प्रॉपर्टी असण्याचेही 2 फायदे आहेत ते बघूया.
प्रॉपर्टीचा उपभोग घेता येतो
स्वत:ची प्रॉपर्टी असेल तर आपण तिचे पूर्णत: मालक असतो. यामुळे भाड्याने जागा न देता किवा 2 भाडेकरूंच्या दरम्यान आपण त्या जागेचा वापर करू शकतो. आपल्याला पाहिजे असेल तेव्हा त्याची आपण आपल्या जागेची विक्री देखील करू शकतो. रिटच्या तुलनेत स्वतची प्रॉपर्टी असण्याचा हा महत्वाचा फायदा आहे.
स्वत:चा निर्णय घेता येणे
आपण जेव्हा स्वत: एखादी प्रॉपर्टी घेतो तेव्हा त्यात कसा नफा मिळवायचे आहे. याचे स्वत:ला नियोजन करता येते. भाड्याने द्यायचा आहे की विक्री करायची आहे ते ठरवता येते. आपल्या आर्थिक उद्दिष्टाप्रमाणे आपण याविषयी निर्णय घेऊ शकतो.
REIT vs Own property यापैकी कोणता पर्याय निवडावा ते अशा काही मुद्यांच्या आधारे ठरवत येते. दोन्हीमध्ये काही चांगल्या बाबी आहेत. आपल्या आर्थिक क्षमता आणि उद्दिष्टे यांचा सरासर विचार करून निर्णय घेणे योग्य ठरते.