लाईफ इन्शुरन्स पॉलिसी हा इन्शुरन्स कंपनी (Insurer) आणि पॉलिसीधारक (Insured) यांच्या मधील लेखी करार असते. पॉलिसी खरेदी करणारी व्यक्ती, ही त्याच्या प्रिय व्यक्तींना, त्याच्या कुटुंबाला एखादी अनिश्चित घटनेच्या प्रसंगी आर्थिक सुरक्षितता मिळावी, या हेतूने इन्शुरन्स कंपनीसोबत करारबद्ध होते. पण समजा, कधी पॉलिसीधारकाने आत्महत्या केली तर? त्याच्या नॉमिनीला इन्शुरन्सची रक्कम मिळेल का? “आत्महत्या करणे” ही अनिश्चिततेची घटना मानली जाऊ शकते का? मग त्यामुळे लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचे कव्हर प्राप्त होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करुयात.
Table of contents [Show]
Suicide Death Cover म्हणजे काय?
बहुतेक इन्शुरन्स कंपनीज् एक वर्षाच्या कालावधीनंतर आत्मघाती मृत्यू संरक्षण (suicide cover) प्रदान करतात. पॉलिसीधारकाने जर पॉलिसी खरेदी केल्यानंतर एक वर्षाचा कालावधी (12 महिने) पूर्ण होण्यापूर्वी आत्महत्या केली, तर त्याच्या नॉमिनीला पूर्ण विम्याची रक्कम मिळण्याचा लाभ दिला जात नाही. तर पॉलिसीधारकाने भरलेल्या प्रीमियमच्या ठराविक टक्केवारीइतकाच लाभ नॉमिनीला दिला जाऊ शकतो. मात्र, पॉलिसी जारी केलेल्या तारखेपासूनच्या 12 महिन्यांनंतर, पॉलिसी कालावधीमध्ये पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास, त्याच्या नॉमिनीला “डेथ-बेनिफिट्स” दिले जातात.
इन्शुरन्स कंपनी Suicide Death Cover का प्रदान करते?
बहुतेक वेळा आत्महत्या करण्याचे कारण कर्ज, असह्य शारीरिक व्याधी किंवा भावनिक त्रास अथवा इतर काही असू शकते. मात्र अशा अविचारी कृतीमुळे पॉलिसीधारकाच्या पश्चात त्याचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालेले असते. तेव्हा अशा वेळी दिला गेलेला आर्थिक आधार केव्हाही आवश्यक ठरत असतो.
Suicide Death Cover साठी एक वर्षाची अट का?
अशी बरीच उदाहरणे असतात, ज्यामध्ये पॉलिसीधारक व्यक्तीने खूप मोठे कर्ज घेतलेले असते आणि मग त्याने लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केलेली असते. नंतर कर्जबाजारी असलेल्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या केलेली असते. पॉलिसीधारक व्यक्तीला असे गंभीर आणि टोकाचे पाऊल उचलण्याच्या मानसिकतेमधून बाहेर येण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी पर्याप्त असल्याचे मानले जाते. अशा प्रकरणांमध्ये 12 महिन्यांची मुदत संपण्यापूर्वी “डेथ क्लेम” देण्यावर निर्बंध असल्याने इन्शुरन्स कंपनीला संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी मदत होते.
आत्महत्येसंबंधीचे कलम - 2014 पूर्वीचे आणि नंतरचे
1 जानेवारी 2014 पूर्वी “suicide clause” पुढील प्रमाणे वाचला जात असे - "जर पॉलिसीधारकाने पॉलिसी जारी केल्यापासूनच्या 12 महिन्यांच्या आत किंवा नूतनीकरणाच्या तारखेच्या आत (Renewal date), आत्महत्या केली, मग तो विचारी असो वा वेडा, पॉलिसी अवैध होईल आणि कोणताही क्लेम कंपनीसाठी देय होणार नाही."
1 जानेवारी 2014 च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनंतर, “suicide clause” पुढील प्रमाणे वाचला जातो - "जर पॉलिसीधारकाने पॉलिसी जारी केल्यापासूनच्या 12 महिन्यांच्या आत किंवा नूतनीकरणाच्या तारखेच्या आत, आत्महत्या केली, तर नॉमिनी किंवा बेनिफिशिअरीना भरल्या गेलेल्या प्रीमियमच्या किमान 80 टक्के रक्कम दिली जाऊ शकते.”
पॉलिसीधारकाने (करारावर स्वाक्षरी करताना) इन्शुरन्स कंपनीला दिलेली कोणतीही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली असल्यास क्लेम रद्द करण्यात येतो. तसेच पॉलिसी ग्रेस पिरीएड मध्ये असताना आत्महत्येमुळे क्लेम आल्यास, देय थकबाकी प्रीमियमच्या कपातीनंतर इन्शुरन्सची रक्कम दिली जाईल.
आणि सरते शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे, आत्महत्या करणे, ही जीवनातील सर्वात अविचारी कृती आहे, जी तुमच्या कुटुंबाला भावनिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या देखील उद्ध्वस्त करते. जी क्लेमची रक्कम मिळावी म्हणून एखाद्या पॉलिसीधारकाने आत्महत्या केली आणि इन्शुरन्स कंपनीने नॉमिनीने केलेला "डेथ क्लेम" (Death Claim) कोणत्याही कारणास्तव नाकारला, तर काय परिणाम होईल, याची कल्पना न केलेलीच बरी.