Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

डेथ इन्श्युरन्स क्लेम कसा दाखल करायचा?

Death Insurance Claim

डेथ इन्श्युरन्सच्या क्लेमची (Death Insurance Claim) संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईनच होते. यासाठी नॉमिनी किंवा वारसदाराला रितसर इन्श्युरन्स कंपनीकडे अर्ज करावा लागतो.

जर तुम्ही एखाद्या इन्श्युरन्स पॉलिसीचे (Insurance Policy) नॉमिनी असाल किंवा तुमची स्वत:ची पॉलिसी असेल आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नॉमिनी केले असेल तर तुम्हाला किंवा तुमच्या वारसदाराला इन्श्युरन्स क्लेमची प्रक्रिया ठाऊक माहिती हवी. पॉलिसीधारकाच्या निधनानंतर त्याचा वारसदार पॉलिसी फंडसाठी दावा करू शकतो. यासाठी पॉलिसी कंपनीला वारसदाराकडून काही कागदपत्रांची गरज भासते. यासाठी कंपन्यांनी नियम देखील आहेत.

क्लेमबाबत सर्वांत महत्त्वाची गोष्ट!

डेथ इन्श्युरन्स क्लेम (Death Insurance Claim) हा ऑफलाईनच करावा लागतो. त्याची संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईनच होते. याशिवाय ज्याच्याकडून पॉलिसी घेतली त्या इन्श्युरन्स एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसरची (Insurance Agent or Development Officer) सही लागते.

कोणत्या कागदपत्राची गरज लागते?

  1. पॉलिसीधारकाचे ओरिजनल मृत्यू प्रमाणपत्र (Original Death Certificate)
  2. पॉलिसीचे मूळ कागदपत्रे, बाँड (Original Document, Bonds)
  3. वारसदाराचे पॅनकार्ड आणि आयडी प्रुफ (Nominee’s Pan Card & ID Proof)
  4. डेथ इन्शुरन्स क्लेम फॉर्मवर विमाधारकाच्या विमा एजंटची किंवा विकास अधिकार्‍याची सही
  5. वारसदाराच्या बॅंकेच्या कॅन्सल चेकची कॉपी किंवा बँक पासबुकची कॉपी जमा करावी लागते. 
  6. वारसदाराचे संपूर्ण नाव, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड आदी माहिती लागते.


डेथ इन्श्युरन्सचा दावा कसा दाखल करायचा?

  • इन्श्युरन्सचा दावा दाखल करण्यासाठी नॉमिनीला सर्वप्रथम पॉलिसी कंपनीच्या होम ब्रँचमध्ये जावे लागेल. त्या ब्रँचला पॉलिसीधारकाच्या मृत्यूची माहिती द्यावी लागते. तिथे कंपनीच्या नियमानुसार आवश्यक अर्ज भरावे लागतात. एलआयसीच्या ब्रॅंचमध्ये अर्ज क्रमांक 3783, अर्ज क्रमांक 3801 आणि एनईएफटीचा अर्ज भरण्यास सांगितला जातो. एनईएफटीच्या अर्जात बँकेची माहिती अचूक भरावी लागते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वारसदाराच्या खात्यात पॉलिसी कंपनी क्लेमचे पैसे ट्रान्सफर करते.
  • पॉलिसीधारकाच्या मूळ मृत्यू प्रमाणपत्रासह पॉलिसी बॉण्डसोबत वारसदाराचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना किंवा पासपोर्ट यापैकी एखादे ओळखपत्र जमा करावे लागते. तसेच ही कागदपत्रे जमा करताना वारसदाराने ती सेल्फ अटेस्टेड करून देणं आवश्यक आहे.
  • अर्ज आणि कागदपत्रांसह एक इंटिमेशन लेटर देखील द्यावे लागते. हे कव्हर लेटर असते. त्यात पॉलिसीधारकाचा मृत्यू कुठे झाला? आणि त्याच्याशी संबंधित इतर माहिती द्यावी लागते.
  • एनईएफटी अर्जाबरोबरच नॉमिनीला कॅन्सल चेक, पासबूक इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतात. यापैकी एखादी प्रत दिली गेली नाही तरी तुमची कागदपत्रे नामंजूर होऊ शकतात.
  • सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडाव्या लागतात. पॉलिसी कंपनीच्या ऑफिसमध्ये क्लेमची प्रक्रिया करताना नॉमिनीला मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात. कारण शाखा अधिकारी मूळ कागदपत्राच्या आधारे खातरजमा करून क्लेमचा अर्ज पुढे पाठवू शकतात. त्यामुळे नेहमी सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.
    कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शाखा अधिकाऱ्याकडून एक्नॉलेजमेंट स्लिप (Acknowledge Slip) दिली जाईल. ती व्यवस्थित ठेवावी लागते. त्या स्लिपवरून अर्जाची स्थिती जाणून घेता येते.
  • संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिन्याभरात वारसदाराच्या खात्यात पॉलिसीचे पैसे जमा होऊ शकतात. पैसे मिळण्यास विलंब होत असेल तर त्या स्लिपच्या आधारे पॉलिसी कंपनीकडे चौकशी करता येऊ शकते.