Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Professional Indemnity Cover : कंपन्यांकडून देण्यात येणारे प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हर म्हणजे काय?

Professional Indemnity Cover

प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हर (Professional Indemnity Cover) त्या व्यवसायांच्या आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी कार्य करते जे कन्सल्टेशन आणि सर्व्हिस प्रदान करतात. आणि त्यासोबतच आपल्या ग्राहकाला झालेल्या नुकसानीमुळे कंम्प्लीट आणि हेवी कॉस्ट देखील भरतो.

प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हर (Professional Indemnity Cover) त्या व्यवसायांच्या आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी कार्य करते जे कन्सल्टेशन आणि सर्व्हिस प्रदान करतात. आणि त्यासोबतच आपल्या ग्राहकाला झालेल्या नुकसानीमुळे कंम्प्लीट आणि हेवी कॉस्ट देखील भरतो. विमा कंपनीने दिलेले कव्हरेज कंपनीच्या सेवेच्या अपयशावर लक्ष केंद्रित करते. यामध्ये सर्व्हिस फेल्युअरमुळे सर्व्हिस किंवा कंन्सल्टेशन मध्ये त्रुटी आणि चुकांमुळे उद्भवणारे आर्थिक नुकसान कव्हर करते. विमा कंपनी कन्सल्टेशन आणि आवश्यक सर्व्हिस प्रदान करण्यापूर्वी विश्लेषण करण्यासाठी त्यांच्या ग्राहकांचा गोपनीय डेटा आणि त्यांच्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टीला हँडल करते. अशा माहितीची गोपनीयता लक्षात घेऊन, व्यवसायासाठी प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हर (Professional Indemnity Cover) घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. काही कंपन्या कन्सल्टेशन सोबत व्यवसाय शोधतात. सर्व्हिस प्रोव्हायडरची मागणी आहे की लोक किंवा व्यवसायांना प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हरमध्ये समाविष्ट केले जावे. हे त्यांच्या सेवेच्या कार्यकाळात व्यावसायिक नुकसानीची भरपाई न मिळण्याचा धोका कमी करण्यासाठी आहे. लेखापाल, आर्थिक सल्लागार, हेल्थकेअर प्रोफेशनल, सॉलिसिटर, आर्किटेक्ट, चार्टर्ड सर्वेअर यांना प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हर आवश्यक आहे.

प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हरची आवश्यकता कोणाला आहे?

अनेक प्रकारच्या व्यवसायांना प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हरची आवश्यक असते. काही प्रकरणांमध्ये, क्लायंटकडे कॉन्टॅक्च्युअल क्लॉज असू शकतात ज्यासाठी व्यवसाय/प्रोफेशनल सर्व्हिस प्रोव्हायडरला त्यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हर असणे आवश्यक आहे. जे व्यवसाय थेट क्लायंटसोबत काम करतात त्यांना प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हरचा सल्ला दिला जातो. कारण क्लायंट व्यवसायावर दावा करू शकतात. आपल्याकडून कोणतीही चूक झालेली नसली तरीही, क्लायंट त्याच्या दृष्टीकोनातूनही दावा करू शकतो.

फायदे काय आहेत?

वेगवेगळे विमा प्रदाते प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हरसाठी ग्रुप पॉलिसी देतात. यामुळे सिंगल प्रोफेशनच्या सदस्याला कव्हरेज मिळते. या पॉलिसी ग्रुप स्कीम अंतर्गत जोडलेल्या ग्रुप सदस्यांच्या संख्येवर आधारित प्रीमियममध्ये सूट देखील देतात. प्रोफेशनल लिएबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी कोणत्याही व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे, चुकीमुळे किंवा त्रुटींमुळे उद्भवलेल्या थर्ड पार्टीच्या प्रॉपर्टीचे नुकसान किंवा स्वतःला आणि थर्ड पार्टीच्या इंज्युरीची लिगल लिएबिलिटीला कव्हर करते. पब्लिक लिएबिलिटी इन्शुरन्स कव्हरमध्ये संरक्षणासाठी केलेले सर्व खर्च समाविष्ट केले जातात. याचा अर्थ असा की कोर्टात तुमच्या बचावासाठी लागू होणारे सर्व शुल्क आणि शुल्काचे पेमेंट तुमच्या विम्याच्या रकमेतून दिले जातात.