कोरोना महामारीमुळे अनेक जणांचे रोजगार गेले. छोटे-मोठे उद्योगधंदे बंद झाले. काही छोट्या व्यावसायिकांना आपला उद्योग बंद करावा लागला. अशा लोकांना पुन्हा आपला व्यवसाय उभा करायचा असेल तर सरकारद्वारे सुरु असलेल्या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचे नाव आहे, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना (Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojna). या योजनेचा लाभ घेऊन पुन्हा आपला व्यवसाय सुरु करता येईल. या योजनेमुळे अनेकांना नोकऱ्या तर मिळतीलच त्याशिवाय कोणाला स्वतःचा नवीन व्यवसाय उभा करायचा असेल अशा त्यासाठीही मदत होईल. तर चला जाणून घेऊया या योजनेबद्दल.
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना काय आहे?
जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करून बेरोजगारांना नोकरी देत असाल तर सरकार तुमच्या कंपनीत कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक मदत करते. कायम ठेवलेल्या कर्मचाऱ्याचा ईपीएफ (EPF) आणि पीएफ (PF) कंपनीने जमा केलेल्या रकमेइतकी रक्कम सरकारकडून कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केली जाईल. सरकार नवीन कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये (PF) पगाराच्या 8.33 टक्के रक्कम देईल. यामुळे कंपनी येथे अधिकाधिक कर्मचारी ठेवेल आणि त्यांना त्याचा लाभ मिळेल. यासोबतच अधिकाधिक लोकांना नोकऱ्यांचा लाभही मिळणार आहे.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (Employees' Provident Fund Organisation EPFO) म्हणून नोंदणीकृत असलेल्या कंपनीला या योजनेचा लाभ मिळतो. यासोबतच श्रम सुविधा पोर्टल अंतर्गत कामगार ओळख क्रमांक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. ओळख क्रमांकाशिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच ओळख क्रमांक आधारशी जोडणे आवश्यक आहे. यासह, कर्मचार्यांचे पगार 15,000 रुपयांपेक्षा जास्त नसावेत.
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना पात्रता
- या योजनेचा लाभ 18 ते 35 वर्ष वयोगटातील लोक घेऊ शकतात.
- महिलांसाठी, एससी/एसटी, पूर्व सैनिक आणि अपंगांसाठी 10 वर्ष वयाची सूट देण्यात आली आहे.
- उत्तर पूर्व राज्यांतील लोकांसाठी वयाची अट 18 ते 40 वर्ष आहे.
- या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी कमीत कमी 3 वर्ष आपल्या क्षेत्राचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे.
- तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार 8 वी पास असणे गरजेचे आहे.
- शासकीय मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थेत किमान 6 महिन्यांकरिता प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य आहे.
- अर्जदारासह पती / पत्नी आणि पालक यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाखाहून अधिक नसावे.
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- LIN क्रमांक (Labour Identification Number)
- शिधापत्रिका
- जन्म प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- मोबाईल नंबर
- उत्पन्न प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://pmrpy.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
होम पेजवर Login वर क्लिक करावे लागेल
पेजवर तुमचा LIN/PF कोड आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता.
रजिस्ट्रेशन हे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत झाले पाहिजे नाही तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
बेरोजगारांच्या हितासाठी आणि लहान उद्योगांना पुन्हा उभारी यावी यासाठी सरकारने प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेची सुरूवात केली आहे.