असंघटित कामगार म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीचे काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर कामगारांचा यात समावेश होतो. ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी कामगाराचं वय 16 ते 59 च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. तसेच इन्कम टॅक्स भरणारे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO), कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) चा सदस्य असलेली व्यक्ती यासाठी नोंदणी करू शकणार नाही.
असे बनवता येईल ई-श्रम कार्ड

- eshram.gov.in या संकेतस्थाळावर जावे.
- Register on e-shram नावाचा रकाना दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे.
- आधार कार्डासोबत लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाने रजिस्ट्रेशन करावे.
- वैयक्तिक माहिती भरा. यात वैवाहिक माहिती, वडिलांचे नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे.
- नॉमिनीच्या डिटेल्समध्ये, नॉमिनीचं नाव, त्याची जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबतचं म्हणजे अर्जदारासोबतचं नातं याचा उल्लेख करायचा.
- सध्याचा आणि कायमचा पत्त्यासंदर्भात माहिती भरायची आहे.
- त्यानंतर शैक्षणिक माहीत भरायची आहे.
- सध्या काय व्यवसाय करता. किती वर्षांचा अनुभव आहे. अजून दुसरा व्यवसाय करत असाल तर ते सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये सांगायचं आहे.
- त्यानंतर बँकेची माहिती द्यायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर सर्वांत शेवटी तुम्हाला तुमचं ई-श्रम कार्ड स्क्रीनवर दिसेल. स्क्रीनवरील उजवीकडच्या Download UAN कार्डवर क्लिक केलं की ई-श्रम कार्ड डाऊनलोड करता येईल.
या पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेलं ई-श्रम कार्ड दिलं जातं. ज्याला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर सुद्धा म्हणतात. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जातं. या योजनेद्वारे संबंधित कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आणि आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.