Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Power of Attorney : पॉवर ऑफ अॅटर्नी म्हणजे काय? किती प्रकार आहेत? याचा उपयोग कशासाठी होतो?

Power of Attorney

पॉवर ऑफ अॅटर्नी (Power of Attorney) हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते.

पॉवर ऑफ अॅटर्नी (Power of Attorney) हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते. मालमत्तेचा मालक किंवा एखादी व्यक्ती त्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करते. जेणेकरून ती व्यक्ती त्याच्या जागी आवश्यक निर्णय घेऊ शकेल. पॉवर ऑफ अॅटर्नी अंतर्गत नियुक्त केलेल्या व्यक्तीला प्रिन्सिपल,  डोनर किंवा ग्रँटर असे म्हणतात. अधिकृत व्यक्तीला एजंट किंवा पॉवर ऑफ अॅटर्नी एजंट म्हणतात. अटी व शर्तींच्या आधारे, अधिकृत एजंटला मालमत्तेशी संबंधित कायदेशीर निर्णय घेण्याचा अधिकार असतो.

कोणाला पॉवर ऑफ अॅटर्नी बनवले जाऊ शकते?

ज्या व्यक्तीवर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवू शकता, त्याला तुम्ही पॉवर ऑफ अॅटर्नी बनवू शकता. ती व्यक्ती जबाबदार, विश्वासार्ह, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची आणि निर्णय घेण्यात सक्षम असावी.

पॉवर ऑफ अॅटर्नीचे फायदे

याचा फायदा असा की तुम्ही परदेशात काम करत असाल तर तुमच्या देशात येणं-जाणं नेहमीच शक्य होत नाही. पण जर तुमची मालमत्ता असेल जी तुम्हाला विकायची असेल, तर तुम्ही एखाद्याला पॉवर ऑफ अॅटर्नी बनवले असेल, तर तो तुमच्या मालमत्तेशी संबंधित निर्णय घेऊ शकतो किंवा मालमत्ता विकू शकतो. याशिवाय टॅक्स रिटर्न भरणे, शेअर्सचे व्यवहार करणे, बँकिंगशी संबंधित कामे हाताळणे. वृद्ध किंवा खूप आजारी लोकांसाठी पॉवर ऑफ अँटर्नी खूप फायदेशीर ठरू शकते.

पॉवर ऑफ अॅटर्नीचे 4 प्रकार

भारतात फक्त पॉवर ऑफ अॅटर्नी कायदा-1982 अंतर्गत पॉवर ऑफ अॅटर्नी जारी केला जातो. या अंतर्गत 4 प्रकारचे पॉवर ऑफ अॅटर्नी जारी करण्याची तरतूद आहे.

कन्व्हेंशनल पॉवर ऑफ अॅटर्नी

याला जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी (GPA – General Power Of Attorney) असेही म्हणतात. या इन्स्ट्रुमेंट अंतर्गत व्यक्तीची नियुक्ती विशिष्ट जबाबदारीसाठी केली जाते जी केवळ विशिष्ट वेळेसाठी वैध असते.

ड्युरेबल पॉवर ऑफ अॅटर्नी

हे लाईफटाइमनुसार निवडले जाते. ग्रँटर अनफिट असतानाही त्याच्या अंडर एजंटला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. ग्रँटरचा मृत्यू होईपर्यंत किंवा त्याच्या वतीने प्लँन रद्द होईपर्यंत असे पॉवर ऑफ अॅटर्नी (POA) चालू ठेवले जातात. उदाहरणार्थ,  ग्रँटर त्याच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी एजंट नियुक्त करू शकतो.

स्प्रिंगिंग पॉवर ऑफ अॅटर्नी

एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी, तारखेसाठी किंवा स्थितीसाठी स्प्रिंगिंग पॉवर ऑफ अॅटर्नी हे वापरले जाते. विशेषत: जेव्हा ग्रँटर निर्णय घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, निवृत्त लष्करी व्यक्ती अपंग झाल्यास पॉवर ऑफ अॅटर्नी (PoA) एजंट नियुक्त करू शकते.

मेडिकल पॉवर ऑफ अॅटर्नी 

मेडिकल पॉवर ऑफ अॅटर्नी स्प्रिंगिंग आणि ड्युरेबल पॉवर ऑफ अॅटर्नी अंतर्गत येते. या प्रकारचे इन्स्ट्रूमेंट सामान्यतः आरोग्यसेवेशी संबंधित बाबींमध्ये वापरले जाते. परंतु ही नियुक्ती करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती निरोगी असणे आवश्यक आहे.