Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Pagadi System? पागडी सिस्टिममध्ये तुम्ही भाड्याने राहता, जाणून घ्या या जुन्या पद्धतीविषयी

Pagadi System, Pagadi Terms, Pagadi Rental Property

What is Pagadi System? भारतातील अनेक शहरांमध्ये आजही पागडी सिस्टिमने मालमत्ता भाड्याने वापरल्या जातात. तेव्हा पागडी सिस्टम म्हणजे काय, ही कुठे लागू होते याबाबत अधिक माहित जाणून घेऊया.

पागडी पद्धत कायदेशीर आहे की नाही? अशाप्रकारे पागडी सिस्टिमशी संबंधित काय नियमावली आहे, ते जाणून घेऊया. भारतात आजही अनेक भागांमध्ये पागडी सिस्टिम मालमत्तेचे व्यवहार करणे सुरू आहे. मालमत्ता भाड्याने देण्याच्या या प्रकारात भाडेकरू देखील मालमत्तेचा शिक मालक असतो. महाराष्ट्र, दिल्ली, कोलकातासारख्या प्रमुख शहरांमध्ये पागडी सिस्टमने मालमत्तांचा व्यवहार करणे सामान्य बाब आहे. खूप पूर्वी घेतलेली पगडी मालमत्ता विकायची असल्यास तुमच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? हे जाणून घेऊया.

पागडी सिस्टिमने घर भाड्याने देण्याची पद्धत भारतात फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. ब्रिटीश राजवटीत भारतात पागडी सिस्टिम खूप वेगाने विकसित झाली. मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये आजही पागडी सिस्टिम अस्तित्वात आहे.

पागडी सिस्टिम म्हणजे काय? (What is Pagadi System)

पागडी सिस्टिम हा एकप्रकारे मालमत्ता भाड्याने देण्याचाच एक प्रकार आहे. 1999 पूर्वी मालमत्ता भाडेतत्वावर घेताना मालकाशी करार करण्याची आवश्यकता नव्हती. फक्त सरळ भाडे आकारण्यात येत होते. महागाईचा सुद्धा कोणताही परिणाम या प्रकारच्या भाडेप्रकारावर झाला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे भाडे तेच राहीले.

पागडी पद्धत कायदेशीर आहे का? (Is Pagadi System Legal?)

1999 मध्ये महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आला. (Maharashtra Rent Control Act of 1999)  हा कायदा 31 मार्च 2000 पासून लागू करण्यात आला. यामुळे पागडी सिस्टिम ही या नवीन कायद्याच्या चौकटीत आली. यातील कलम 56 अंतर्गत पागडी सिस्टिमला कायद्याने मान्यता मिळाली. मुंबई आणि राज्यात १९१० पासून पागडीची पद्धत लागू आहे. 'पागडी'चा अर्थ जी जागा भाडेकरूला दिली जाते त्या जागेची त्यावेळची पूर्ण किंमत घरमालकाला दिली जाते व त्या जागेचा ताबा घेतला जातो. हा व्यवहार झाला याचा पुरावा म्हणजे नाममात्र भाड्याची पावती देणे.त्यामुळे भाडे हे कधीच जागेच्या वापराचा मोबदला म्हणून घेतले जातच नव्हते.भाडेपावती याचा अर्थ पागडी मिळाली असा होता.

भाडेकरु अंशतः मालक बनतो 

भाडेकरु किंवा भाडेकरुशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही जागेच्या त्याच्या कार्यकाळाच्या हस्तांतरणाची अट म्हणून दावा प्राप्त होतो. जमीन मालक किंवा जमीन मालकाच्या वतीने काम करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीला दंड, प्रीमियम, पैसे, ठेव किंवा अनुदान प्राप्त करण्याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला भाडेपट्टी हस्तांतरित करण्याचा किंवा मंजूर करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच जागेचा मालिक भाडेकरुला पैशांसाठी एकप्रकारे मालकी हक्क देऊ शकतो. या अंशतः मालकीचा अर्थ असा आहे की, भाडेकरुचा संपत्तीवर एक निश्चित अधिकार आहे. पण संपत्तीच्या जमिनीवर नाही. पागडी सिस्टिममध्ये मालमत्तेचा अंशतः मालकी जागा इतर कोणाला तरी भाड्याने देऊ शकतो. परंतु त्याला मिळणाऱ्या भाड्याची विभागणी ही मूळ मालक आणि पहिला भाडेकरु असलेला अंशतः मालक यांच्यामध्ये होते. यामुळे मूळ मालकाची अतिरिक्त कमाई होते.

पागडी पद्धतीमध्ये मालकीचे हस्तांतरण कसे होते?

पागडी अंतर्गत खरेदी केलेली मालमत्ता विकायची असल्यास ना हरकतीसाठी (NOC) घरमालकाला भरावे लागणाऱ्या शुल्काबाबत कोणताही विहित कायदा नसल्याचे या विषयातील तज्ज्ञ सांगतात. तुम्हाला तुमच्या भाडेकरुला मालमत्ता ट्रान्सफर करण्यापूर्वी घरमालकाची पूर्व संमती आवश्यक आहे. सहसा मालमत्तेचा अंशत: मालक विक्रीचा काही भाग मूळ मालकाला देतो. बाजार पद्धतीनुसार, 33% वाटा दयावा लागतो. पण ही रक्कम कमी किंवा अधिक असू शकते. याबाबत कोणताही कायदा नाही.