Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market Order : शेअर मार्केटमध्ये ऑर्डर म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते?

What is Order in Share Market

Stock Market Order : आपल्याला हव्या असणाऱ्या शेअर्सची आपण ऑर्डर देतो खरं पण त्या ऑर्डरबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आहे का? ऑर्डर म्हणजे काय? त्याचे प्रकार किती असतात? ऑर्डर काम कशी करते? चला तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

आज आपण घरबसल्या सर्वकाही करू शकतो? जेवणापासून ते केस कापणाऱ्यापर्यंत सर्वांना घरबसल्या ऑनलाईन बोलावू शकतो. आधी जिथे मार्केटमध्ये जाऊन सामान आणायला लागत होते. तेच सामान आता घरबसल्या एका क्लिकवर घरपोच डिलिव्हर होते. इंटरनेटमुळे झालेली ही प्रगती सर्वच क्षेत्रात पाहायला मिळते. अशीच प्रगती शेअर मार्केटमध्ये सुद्धा झाली आहे . आधी ब्रोकरला फोन करून हा, “स्टॉक घे, तो स्टॉक विक” असे सांगायला लागत होते. पण आज आपण एका क्लिकवर शेअर मार्केटमध्ये स्टॉक खरेदी विक्री करू शकतो. आपल्या टर्मिनलवरून ऑर्डर जनरेट करायची व ती काही क्षणात एक्झीक्यूट होऊन आपल्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा होतात. आपल्याला हव्या असणाऱ्या शेअर्सची आपण ऑर्डर देतो खरं पण त्या ऑर्डरबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आहे का? ऑर्डर म्हणजे काय? त्याचे प्रकार किती असतात? ऑर्डर काम कशी करते? असे काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले आहेत का? नसतील तर या प्रश्नांसह त्याची उत्तरे आपण जाणून घेऊयात.

शेअर मार्केटमध्ये ऑर्डर म्हणजे काय?

सोप्या भाषेत ऑर्डर म्हणजे एक प्रकारचा आदेश जो आपण आपल्या ब्रोकरला देतो. या आदेशामध्ये स्टॉक विकत घेण्याचा किंवा विकण्याचा आदेश दिला जातो. हा आदेश देण्यासाठी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.


ऑर्डर्सचे किती प्रकार असतात?

मार्केट ऑर्डर (Market Order)

मार्केट ऑर्डर म्हणजे सध्याच्या बाजारभावानुसार शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याचा आदेश. हा आदेश दिल्यानंतर तो तात्काळ एक्झीक्युट केला जातो. मार्केट ऑर्डरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑर्डरच्या एक्झीक्युट होण्याची हमी देते. मात्र, ऑर्डर किती किंमतीला एक्झीक्युट होईल याची खात्री देता येत नाही. सोप्या भाषेत जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक 120 रुपयात विकत घेता तेव्हा तुम्ही ऑर्डर 120 रुपयांची जनरेट करता. जी लगेच एक्झीक्युट होते. परंतु तुम्हाला तोच स्टॉक 120 रुपयांनाच मिळेल असे नाही. मार्केटमध्ये अस्थिरता असल्याने किमतीमध्ये सतत बदल होत असतात. त्यामुळे तुम्ही दिलेल्या किमतीची ऑर्डर त्याच किमतीत एक्झीक्युट होईल याची हमी मार्केट ऑर्डरमध्ये देता येत नाही.  

लिमिट ऑर्डर (Limit Order)

लिमिट ऑर्डरमध्ये आपण मार्केटमध्ये जी किंमत चालू आहे. त्याच किमतीची ऑर्डर न देता आपल्याला हवी त्या किमतीची ऑर्डर देऊ शकतो. परंतु यात दिलेली ऑर्डर एक्झीक्युट होईलच याची हमी कोणी देत नाही. समजा एखाद्या स्टॉकची किंमत जर मार्केटमध्ये 50 रुपये चालू आहे तर ऑर्डर जनरेट करताना ती 48 रुपयांची ऑर्डर जनरेट करू शकतो. आणि हा शेअर 48 रुपयांनाच हवा असेल तर त्यानुसर लिमिट ऑर्डरसुद्धा टाकता येते. जर मार्केटमध्ये त्या शेअर्सची किंमत खाली येऊन 48 रुपयांपर्यंत आली तर लिमिट ऑर्डर एक्झीक्युट होईल किंवा जर कोणी 48 रुपयांना तो स्टॉक विकण्यास तयार असेल तरी ती लिमिट ऑर्डर एक्झीक्युट होईल. लिमिट ऑर्डरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ट्रेडर्सना ठरविक ट्रेंड फॉलो करणे गरजेचे नसते. लिमिट ऑर्डर काही दिवस काही आठवडे काही महिने तशीच राहू शकते.

_Share Market Order

स्टॉप ऑर्डर (Stop Order)

स्टॉप ऑर्डरमध्ये स्टॉकची किंमत ठराविक किमतीला पोहोचली की ती ऑर्डर एक्झीक्युट होते. या ठराविक किमतीला स्टॉप प्राईस (Stop Price) म्हटले जाते. ज्या किमतीवर स्टॉप ऑर्डर लावली आहे; आणि किंमत तिथपर्यंत येत नाही तोपर्यंत स्टॉप ऑर्डर एक्झीक्युट होणार नाही. जेव्हा किंमत त्या ऑर्डरपर्यंत पोहोचते तेव्हा स्टॉप ऑर्डर मार्केट ऑर्डर किंवा लिमिट ऑर्डर बनते व ते स्टॉक त्या किमतीला विकले जातात. 

स्टॉप ऑर्डरचा सर्वात जास्त वापर असे ट्रेडर्स करतात, जे दिवसभर स्क्रीनसमोर बसून मार्केट पाहू शकत नाहीत. एखादा स्टॉक घेताना फायदा व लॉस या दोन्ही शक्यतांचा विचार आपण करतो. फायदा झाला तर कोणाला प्रॉब्लेम होत नाही परंतु लॉसमध्ये सर्वानाच प्रॉब्लेम होतो. ट्रेडिंग दरम्यान किती लॉस सहन करू शकतो या कल्पनेनुसार स्टॉप लॉस किंवा स्टॉप ऑर्डर लावली जाते. जेव्हा किंमत आपल्या लॉसच्या रेंजपर्यंत पोहोचते तेव्हा स्टॉप ऑर्डर एक्झीक्युट होते.

कव्हर ऑर्डर (Cover Order)

कव्हर ऑर्डर ही मार्केट ऑर्डर आणि स्टॉप ऑर्डरचे कॉम्बिनेशन यामध्ये दोन ऑर्डर एकसाथ लावल्या जातात. तुम्ही दिलेली बाय ऑर्डर ही नेहमी मार्केट ऑर्डर असते व त्यासोबत तुम्हाला स्टॉप लॉस ट्रिगर प्राईस व लिमिट प्राईस सेट करावे लागतात. कव्हर ऑर्डर मुळे मार्केटमधली रिस्क कमी होते.